विरोधाभास..
खूप शहरं पाहिली मी ह्या डोळ्य़ांनी.. मंबई असो वा कलकत्ता अथवा दिल्ली नाही तर दूर उत्तरेकडे वसलेले नैनीताल नाही तर सुदूर पसरलेल्या दक्षिणेतील एखादं शहर. इथल्या सगळ्यांची सुरवात एकाच विचाराने होते आज पोट कसे भरावे ? कोमजलेली सकाळ, घामेजलेली दुपार व थकलेली संध्याकाळ.. ह्याच्या पलिकडे काहीच नाही. राबराब राबण्यात एखाद्याचा जीव जरी गेला तरी मागे वळून पाहण्यासाठीही वेळ नाही कुणाकडे...राबण्याची जिद्द असते अतोनात पण एखाद्या मढ्यावर रडण्यासाठी थोडा ही वेळ नाही..
उंच उंच इमारतीमध्ये, थंडगार हवेमध्ये बसून एखाद्या राज्यासंबधी, एखाद्या शहरासंबधी, एखाद्या खेड्यासंबधी निर्णय घेणे एकदम सोपे आहे. कोणी जगावे व कोणी मरावे ह्याचा निर्णयदेखील आजकाल माणसं घेतात हे पाहून नवल वाटते. कधीकाळी ३५ रु. ला मिळणारा मॅकडीचा बर्गर आता २० रु. ला मिळतो, पिझा स्वस्त झाला म्हणून कंपनीवाले टिव्हीवर, रेडिओवर, टॉयलेटच्या भिंतीवर बोंबलत आहेत. खरोखर सर्वकाही स्वस्त झाले आहे ? चार रु. किलो कांदा मिळायचा ह्यावर मुलांचा विश्वासच नाही, तेल कधी तीस रु. किलो होते ह्या वाक्यावर तर मुले हसतात, खूप पुर्वीची गोष्ट नाही आताचीच काही वर्षापूर्वीचीच गोष्ट. भाव आकाशी भिडले हा वाक्यप्रचार आम्ही पुस्तकात वाचायचो.. आजकाल मुले ह्याची देही.. ह्याची डोळा पाहतात.. आकाश खूपच ठेंगणे झाले आहे. एकीकडे हजारो टन भाजीपाला आपल्याला रस्त्यावर फेकावा लागत आहे भाव मिळत नाही म्हणून व दुसरीकडे जेवायला एकवेळचे अन्न नाही म्हणून भूकबळी पडत आहेत ह्यात किती मोठा विरोधाभास आहे.
एखादी बातमी, एखादा चित्रपट, एखादी डॉक्युमेंट्री येते आणि हलकेच आपल्याला हळवी करुन जाते व आपण परत निर्लज्जासारखे आपल्या सरावलेल्या जगात परत जातो. एखादा आत्महत्या करतो, एखादा सहपरिवार आपली यात्रा संपवतो, आपण हळहळतो व परत आपल्या जगात सराईतासारखे वावरतो. काही जणांना लाखो रुपयेही नाही पुरत महिना काढण्यासाठी तर काहीजणांच्या घरामध्ये दिवसेंदिवस चूल पेटत नाही त्यांचा आपल्याला विसर पडतो. कुठेतरी निसर्ग बचाव आंदोलन चालू असते, कुठे वन्यजीव बचाव.. पण कुठेच सामान्य माणूस बचाव हे आंदोलन चालू आहे असे कधीच पाहण्यात येत नाही. पाळीव कुत्र्यांविषयी, बैलांविषयी माणसाला आपुलकी आहे. पण आपल्याच जात बांधवावर जरा ही दया नाही... अशी विचित्र जात मानवाची.
कुठेतरी देव असेल व तो पहात असेल हे सर्वकाही. आपण चुकत आहोत कुठे ना कुठे हे नक्की. सगळीच नेते मंडळी नाकर्ती आहेत असे नाही. नाही तर आपल्या देशाचादेखील पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. पण कुठे तरी एक समाज म्हणून आपण नक्की चुकतो आहोत. आज ना उद्या कधी ना कधी आपल्याकडे असलेले इंधन संपणार आहे, पर्यायी इंधनाचा अजून काहीच शोध लागला नाही, सूर्य ऊर्जा हा एक विकल्प आहे आपल्यासमोर पण कोणीच त्यावर योग्य पध्दतीने कार्य करत नाही आहे. प्रगत देशामध्ये काय होत आहे माहीत नाही पण भारतासारख्या असामान्य पण प्रगतशील देशात खूप मोठे अडथळे दिसत आहेत. शेती व्यवसायामध्ये खूप मोठी तफावत आहे. निसर्ग नेहमी प्रमाणे साथ देत नाही. जेव्हा पाऊस पडायला हवा तेव्हा दुष्काळ व जेव्हा नको तेव्हा महापुर अशी अवस्था आहे. अनिश्चित पाऊस हे दृश्य भारतासारख्या पावसावर अवलंबून असलेल्या देशाला नक्कीच हानीकारक आहे. वीजेचे तर काय गुण गावे.. जेथे दिल्लीसारख्या राजधानी मध्ये पूर्ण २४ तास आपण वीज देऊ शकत नाही तेथे सुदूर पसरलेल्या खेड्यांमध्ये आपण २४ तास वीज कशी देणार आहोत हेच मला अजून कळले नाहीए. एखाद्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपला देश खरोखर सज्ज आहे ? हे मागेच आलेल्या वादळावरुन समजले. माहितीच्या देवाण-घेवाणीमध्ये एवढी तफावत आहे की अनेकांचे जीव गेले तरी त्याविषयी संबंधित खात्याला आकडेवारीही माहित नसते.
एकविसावें शतक चालू होऊन पण आता नऊ वर्ष पूर्ण होत आलीत पण अजूनही आपण जातीव्यवस्था, आरक्षण व सबसिडीवर अवलंबून आहोत. रस्त्यावर चालणारे शेकडॊ हजारो लोक आपल्याला कुठल्या जातीचा माणूस स्पर्श करुन गेला हे पाहण्य़ासाठी मोकळे नसताना फक्त राजकीय कारणामुळेच आज जातीव्यवस्था टिकून आहे. राहुल गांधी दलिताच्या घरात एका रात्री जेवला ही आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज असते तर भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष केवळ जातीय राजकारणामुळेच पोसले जातात. सबसिडी व्यवस्था / आरक्षण व्यवस्था ही देश स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षात मागे घ्यावी अशी मागणी बाबासाहेबांनी केली असे कुठेतरी वाचले होते. आज देश स्वतंत्र होऊन ६० वर्ष झाली तरीही आपल्या खांद्यावर अजून ही आरक्षण / सबसिडी व्यवस्था जोखडासारखी तशीच आहे. आपण कुठेतरी नक्की चुकत आहोत हे आपल्याला कळतं. पण राजकीय इच्छाशक्तीची कमतरता व योग्य असा नेता नसल्यामुळे कुठेच काही फरक पडत नाही आहे.
काय होणार आहे काही कळत नाही. मी निराशवादी नाही पण समोर जे दिसत आहे, घडत आहे ते पाहून खरोखर मनामध्ये चलबिचल होते. बघू काय घडतं ते.. पण महासत्ता होण्याच्या नादात आपण कुठेतरी आपली जाणीव हरवून बसलो नाही म्हणजे झाले.
वाचने
7036
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
विरोधाभास...
श्री रा रा
मा. श्री. राजे जी!
खूप शहरं
In reply to खूप शहरं by परिकथेतील राजकुमार
असं का ?
In reply to असं का ? by छोटा डॉन
अरेरे,
In reply to अरेरे, by परिकथेतील राजकुमार
केवळ
In reply to केवळ by llपुण्याचे पेशवेll
माननीय
In reply to माननीय by परिकथेतील राजकुमार
श्री रा रा
In reply to श्री रा रा by अवलिया
माननीय
In reply to माननीय by परिकथेतील राजकुमार
राजे अज्याबात घाबरु नका
In reply to राजे अज्याबात घाबरु नका by विजुभाऊ
माननीय
In reply to खूप शहरं by परिकथेतील राजकुमार
भावी
मीही परा व
श्री.राजे,
मुळ लेखकाने
सहमत
श्री. राजे
In reply to श्री. राजे by निमीत्त मात्र
नाही....
सुरेख
याल जीवन ऐसे नांव
इटस अ वंडरफूल लाईफ
In reply to इटस अ वंडरफूल लाईफ by विकास
विकासराव, त
लिहिते रहा..
In reply to लिहिते रहा.. by शाहरुख
सहमत
In reply to लिहिते रहा.. by शाहरुख
"प्रचंड
स्वरूप पहा
टीकेविना
In reply to टीकेविना by तिमा
बरोबर
रा.रा
In reply to रा.रा by विनायक प्रभू
सहमत आहे
छान लिहिलं
दुनिया