एक फुलपाखरू दुविधेत टाकून गेलं...
हे असं का? ते तसं का?
या द्विधा मनस्थितीत,
प्रत्येकालाच लिहावं लागतं
कधी कंपूबाजांसारखं,
कधी मालकाविरुद्ध
धुडगूस करत,
विडंबन पाडत रहावं लागतं
कंपूविरुद्ध लिहीताना,
आणिबाणीची बंधनं झुगारून,
शुद्धलेखनाची चौकट ओलांडून
पुढची लाईन पाडावीच लागते,
कारण....
कवड्यांच्या दमड्या होऊन
भरघोस मानधन मिळण्यासाठी
आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं............
प्रतिक्रिया
12 Dec 2009 - 12:26 pm | संजा
सुंदर कवीता. मनाची नेमकी अवस्था पकडलीय.
आपले मनःपुर्वक अभिनंदन
12 Dec 2009 - 12:40 pm | jaypal
12 Dec 2009 - 7:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणिबाणीची बंधनं झुगारून,
शुद्धलेखनाची चौकट ओलांडून
पुढची लाईन पाडावीच लागते,
कारण....
कवड्यांच्या दमड्या होऊन
भरघोस मानधन मिळण्यासाठी
आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं
क्या बात है ! एक वास्तववादी कविता. आणिबाणी, शुद्धलेखन, चौकट, लाईन, कवड्या, दमड्या, मानधन,[एकाच शब्दासाठी वापरलेले पर्याय केवळ सुंदर] या शब्दांनी कविता वाचकांना एक उंचीवर घेऊन जाते. कवीतेतील तरंग पोहचले. :)
चालू दे, अजून येऊ दे, .. पुढील रचनेसाठी शुभेच्छा..!
-दिलीप बिरुटे
[गोंधळलेला,खाडखोड वाचक]
13 Dec 2009 - 6:24 pm | दशानन
छान छान !
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
13 Dec 2009 - 7:57 pm | नंदन
-- जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे?
विडंबन मस्तच.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
14 Dec 2009 - 9:39 am | निखिल देशपांडे
वर नंदनने योग्य शब्दात लिहिले आहे.
विडंबन आवडले
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
14 Dec 2009 - 12:35 pm | श्रावण मोडक
तुमच्या प्रतिभेला असेच धुमारे फुटत राहोत!!!
14 Dec 2009 - 3:34 pm | धमाल मुलगा
परंतु, म्हणावे तसे नाही जमले. आपली योग्यता लक्षात घेता ह्यापेक्षाही सरस दर्जा आपण गाठू शकता, नव्हे पुर्वी गाठला आहे ह्याची आठवण प्रकर्षाने झाली.
माफ करा, परखडपणेच बोललो, परंतु, जे वाटले ते बोललो.
ह्याउप्पर बोलायचे तर
कवड्यांच्या दमड्या होऊन
भरघोस मानधन मिळण्यासाठी
आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं....
हे काही नीटसे नाही पटले. सर्वत्र असे असतेच असे नाही.ओघ अविरत असु शकतो त्यासाठी कुठे जाण्याची गरज पडावी न पडावी!
14 Dec 2009 - 6:10 pm | परिकथेतील राजकुमार
अदिती-जी
कविता कळली नाही. पण तुम्ही आमच्या प्रत्येक लेखाला प्रतिक्रीया देता म्हणुन प्रतिक्रीया देत आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
14 Dec 2009 - 7:10 pm | चतुरंग
'इकडे' 'तिकडे' उडणारं तुमच्या मनाचं फुलपाखरु लवकरच एका ठिकाणी स्थिर बसेल अशी आशा करतो! :W
बाकी विडंबन एकदम टुन्न!! ;)
(कोषातला)चतुरंग
14 Dec 2009 - 11:42 pm | श्रावण मोडक
अट्टल संपादकीय कमेंट हो!!!