(सवयीने मंद)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
9 Dec 2009 - 12:38 am

ही प्रेरणा माझ्या मंदपणाची!

टवाळीची साद घालून जाणारे
विविध लेखकूंचे एकोळी धागे...
काही लिंकाळे, आणि विचारहीन मठ्ठ
काही अस्ताव्यस्त
काही सुस्त
काही दळण तेच तेच दळणारे फक्त
कधी पाडलेले, निष्कारण विडंबलेले सामान्य कवितेचे कंद ...
तरीही एकूणएक धागे उचकटून वाचणार कंटाळलेला मंद ...

करुणविडंबन

प्रतिक्रिया

वात्रट's picture

9 Dec 2009 - 1:27 am | वात्रट

विडंबन आवडले...:W

निमीत्त मात्र's picture

9 Dec 2009 - 4:12 am | निमीत्त मात्र

फारच छान! जियो *अदिती!!

प्रत्येक ओळीला त्या त्या धाग्याची लिंक दिली असती तर अजून मजा आली असती.

(श्रेय अव्हेर: *शब्दप्रयोग तात्यांचा आहे.)

चतुरंग's picture

9 Dec 2009 - 6:29 am | चतुरंग

छान विडंबन! चालू दे..

(दळण दळ्या)चतुरंग

नंदन's picture

9 Dec 2009 - 9:02 am | नंदन

उत्तम विडंबन!

काही अस्ताव्यस्त
काही सुस्त
काही दळण तेच तेच दळणारे फक्त

- क्या बात है! अचूक निरीक्षण. बाकी तेच तेच दळण तर सोडाच पण दळून आणलेलं पीठ पुन्हा दळायला द्यावं, असे लेख प्रसवणार्‍या भद्र लेखकुंना दळ-भद्री म्हणावं काय? :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

9 Dec 2009 - 7:38 pm | श्रावण मोडक

+१

विजुभाऊ's picture

9 Dec 2009 - 9:44 am | विजुभाऊ

कधी पाडलेले, निष्कारण विडंबलेले सामान्य कवितेचे कंद ...
तरीही एकूणएक धागे उचकटून वाचणार कंटाळलेला मंद ...

वा वा वा !
अतीशय तरल वास्तववादी कविता.
जिची वीण क दर्जाची असते ती कविता असे एका समिक्षककाकानी म्हंटलेले आहे. ते येथे खोटे पडतानाचा प्रत्यय शब्दाशब्दातून दिसतोय.
विडंबन हा काव्यप्रकार परोपजिवी आहे असे विद्वानांचे मत आहे परंतु अनेक विद्वानांत याबाबत दुमत आहे.
प्रस्तुत कविता हे विडंबन आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे.
ऋग्वेदात आणि सामवेदात काव्याच्या गेयते संदर्भात अठ्ठाविसाव्या सामाच्या तिसर्‍या ओळीत या विषयी एक समर्पक दाखला दिलेला आहे
या नुसार काव्याची ( काव्य..... कावा नव्हे) गेयता ही ऐकणार्‍याच्या श्रवणशक्तीनुसार आणि उपलब्ध भौतीक तसेच मानसीक अवस्थेनुसार बदलत असते.
काव्याची गेयता मोजण्यासाठी छांदोग्य उपनिषदात स्पष्टपणे एक श्लोक उपलब्ध आहे.त्या नुसार
काव्याची गेयता= { (३.१४२८५७ * त्या काव्याची घनता )+ शब्दाचे वजन) + वर्गमुळात ( ऐकणाराचे वजन * ऐकणाराची बैठकीची भौमितीक स्थिती) }
परंतु मोघलकालीन तसेच शक आणि हुणांच्या सांस्कृतीक आक्रमणांत मूळ वांङ्मयातील बरेचसे दुवे नष्ट झाल्याने ही गेयता कोणत्या एककांत मोजायची याचा उलगडा होत नाही.
नवीबच उपलब्ध झालेल्या एका प्रबंधनुसार काव्याची गेयता ही एककात मोजण्यापेक्षा एकांतात मोजली असता बराच फरक पडतो असे आढळून आले आहे.
एकांत कशाला म्हणावे याबद्दल बरेच प्रवाद आहेत. बौद्ध आणि जैन मतांनुसार अनेकांत देखील अप्राप्य असला तरी ग्राह्य आहे.
कण्णकच्या " धण्णकट्ट्खंडीत धुंडपट्टकणीका " या पाली ग्रंथात म्हंटल्याप्रमाणे विडंबन हे नेहमी सुडंबन च असते. सांप्रतकाळी काव्याच्या रसोत्पतीसाठी विडंबनात बीभत्स हा रस वापरला जायचा . काव्याच्या प्रेरणेसाठी होळीच्या वसंतोत्सवाच्या मुहुर्त साधून "गालीप्रदान" यासारखे जोडमहोत्सव अनेक दानशूर लोक आयोजीत करत असत.
भाषेच्या उत्कर्षाला प्रोत्साहन देणे आणि भाषेची जोपासना करणे हा या जोडमहोत्सवाचा उद्देश्य असे.
भाषा ही केवळ प्रस्थापित प्रकांडप्रचूर विद्वत्जड शब्दानी वर्धीत होते या पारंपरीक मताला छेद देत विडंबन या काव्यप्रकाराने कविता आणि भाषा जनसामान्यांपर्यन्त पोहोचवल्या.
प्रस्तुत कविता ही त्याच परंपरेच्या मुशीत तयार झालेली असून परंपरेचा झेंडा खांद्यावर नाचवत आहे. हे पाहुन खूपच संतोष पावला.

प्रशु's picture

10 Dec 2009 - 4:17 pm | प्रशु

ठार मेलो......

विविध लेखकूंचे एकोळी धागे...
काही लिंकाळे, आणि विचारहीन मठ्ठ

वा वा वा ...

एकूणएक धागे उचकटून
अंमळ उचकटून काढावे लागले ब्वॉ हे विडंबन , क्रमवारीत जरा खाली सरकले होते.

बाकरवडी's picture

9 Dec 2009 - 10:15 pm | बाकरवडी

वा वा क्या बात हे
--गटारझन

:B :B :B बाकरवडी :B :B :B

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Dec 2009 - 10:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जियो* बाकरवडी! याला म्हणतात जिंदादिली! टारझनाशी भांड भांड भांडल्यावर शेवटी त्याचीच स्टाईल मारून स्वत:चं नाव लिहिलं, गटार-झन! बाकरवडी, तुमच्याबद्दल मला भरपूर आदर आहे!

असो. आता स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद लिहीत आहेच तर ... विजुभाऊ, बर्‍याच दिवसांनी काहीतरी क्वालिटी विनोदी लिहीलंत, त्याला दाद दिल्याशिवाय रहावत नाही आहे.

अदिती

*विसोबा खेचर एट एल, २००७, मिपा

टारझन's picture

9 Dec 2009 - 10:47 pm | टारझन

ह्याह्याह्या ! इथे जर बेडुकउडी ने स्वतःची स्वतः केली असती तर काही गैर नाही .
हॅहॅहॅ .. पण आमचीच सही उचलून इथे ? हॅहॅहॅ .. व्यंकटेश प्रसाद हातात बॅट घेऊन आल्यासारखा वाटतो. ही सहि इथनं ढापलेली आहे

असो .. चोरीचा बाळबोध प्रयत्न स्तुत्य :)

बाकी आदिती .. विडंबण जोरदार आहे .. जरा उषिराच्च वाचलं !!

=P~ =P~ =P~ ढेकुणकढी =P~ =P~ =P~

मेघवेडा's picture

9 Dec 2009 - 11:07 pm | मेघवेडा

हॅहॅहॅ .. व्यंकटेश प्रसाद हातात बॅट घेऊन आल्यासारखा वाटतो.

जबरा!! टारोबा फुल फॉर्म मध्ये!!!

अदितीतै, करूण रसातील विडंबण* झ्याक! मजा आली! एकोळी धाग्यांचा आणि त्यांच्या लेखकूंचा तीव्र निषेध!

* टारझन पी. एन. (२००९), 'सवयीने मंद', प्रतिसाद क्र. ११, मिपा. :)

--

('हारवर्ड संदर्भ' लिहायला शिकलेला) मेघवेडा.

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

विनायक प्रभू's picture

10 Dec 2009 - 10:13 am | विनायक प्रभू

मस्त मंद मडंबन

सहज's picture

10 Dec 2009 - 10:26 am | सहज

दाहक वास्तववादी काव्य!