आमची प्रेरणा कवी अनिल यांची अप्रतिम रचना आज अचानक गाठ पडे...
आज अचानक लाथ पडे
नयन वळविता सहज कुठेतरि
दिसले अंतरपट उघडे
असता मनिमानसी 'तसे' मम
अवचित दृष्टिस दृष्ट भिडे
'गूढ खूण' मम कळुन लाजुनी
बघते ती इकडे तिकडे
निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा तिचा संकोच नडे
अयत्या वेळी अयत्या मेळी
घडले हे भलतेच गडे
दचकुनि जागा मी नीजेतून
भार्येने धरले नरडे
प्रतिक्रिया
31 Mar 2008 - 10:41 pm | ब्रिटिश टिंग्या
दचकुनि जागा मी नीजेतून
भार्येने धरले नरडे
तद माताय! केश्या तु म्हणजे 'हम नही सुधरेंगे' आहेस....
हा हा हा!!!! १ नंबर झालयं विडंबन!!!!
(केशाचा पंखा) टिंग्या ;)
31 Mar 2008 - 10:51 pm | ऋषिकेश
:)
:))
:)))
हा हा हा हा :))))))))))))))))) लई भारी!!!!!!!!!!!!!!!!!!!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
31 Mar 2008 - 11:00 pm | सर्किट (not verified)
केशा,
अंतरपटाचा ह्या सोझ्ज्वळ स्थळावर इतका स्पष्ट उल्लेख !
संपलास तू आता !
बाकी, विडंबन झक्कास !
- सर्किट
31 Mar 2008 - 11:20 pm | स्वाती राजेश
दचकुनि जागा मी नीजेतून
भार्येने धरले नरडे
:)))))))
भारी विडंबन
31 Mar 2008 - 11:52 pm | चतुरंग
अहो 'केशवसुमार' म्हणताम्हणता एकदम 'केशवदेमार' झालंय की विडंबन!;))
आवडलं पण!
(अवांतर - तसं देवादिकांचं गाणं नाहीये ना म्हणून प्रतिक्रीया तरी देता आली, नाहीतर लगेच बोंबाबोंब सुरुच झाली असती टेहळणी करुन सिलेक्टिव्ह प्रतिक्रीया देणार्यांची!:)
चतुरंग
31 Mar 2008 - 11:54 pm | सर्किट (not verified)
ह्यावरून आठवले,
प्रसंग असा: खूप घाईची लागली आहे.. पण पायजाम्याच्या नाडीची गाठ काही केल्या सुटत नाही...
"आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी, भलतीचकडे"...
- (घाईत) सर्किट
1 Apr 2008 - 9:12 am | उदय सप्रे
लय भारी राव !
1 Apr 2008 - 5:03 am | प्राजु
दचकुनि जागा मी नीजेतून
भार्येने धरले नरडे
या ओळी आवडल्या... :))))
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
1 Apr 2008 - 7:12 am | विसोबा खेचर
विडंबन सहीच रे केशवा! :)
अजूनही येऊ द्या..
तात्या.
1 Apr 2008 - 8:25 am | बेसनलाडू
विडंबन अजिबात आवडले नाही. अगदी इन्स्टन्ट प्रतिक्रिया 'बकवास' अशी होती. विषय वगैरे बाजूला ठवा; पण शब्दयोजनाही ओढूनताणून, एखादाच शब्द इकडेतिकडे करून/बदलून जुळवाजुळव केल्यासारखी झालीये. तुमच्या आधीच्या विडंबनांमध्ये शब्दयोजनेतला चपखलपणा तरी प्रशंसनीय असे. येथे त्याचा अभाव दिसला.
असो. चांगल्या विडंबनासाठी शुभेच्छा.
प्रा. म. रा. न.
(सपष्ट)बेसनलाडू
1 Apr 2008 - 9:37 am | केशवसुमार
बेसनशेठ,
आपल्याला आमची सगळीच विडंबने आवडावीत असे नाही.
पण कमीत कमी शब्द बदलून / इकडेतिकडे करून विडंबन करण्याची मजा काही औरच असते.. असो..
सपष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
(बकवास)केशवसुमार
1 Apr 2008 - 10:07 am | बेसनलाडू
तुमची सगळीच विडंबने आम्हांला आवडली नाही, तरी धोरणी प्रतिसादांच्या किंवा राजकारणी अंधानुयायी नि चाहत्यांच्या गराड्यात आम्हांला आपली जी विडंबने सर्वार्थाने, मनापासून आवडतात, तेथे आवर्जून पहिला (झालंच तर दुसरा-तिसरा) स्तुतीपर प्रतिसाद टंकतो, त्या विडंबनातले काय विशेषकरून फार आवडले हे लिहितो, हे कदाचित आपल्या नजरेस आले नसावे.
(सपष्ट)बेसनलाडू
1 Apr 2008 - 10:31 am | केशवसुमार
मात्र खरे बेसनशेठ...
पण हे आमच्या नजरेस आले नाही असे नाही.. म्हणूनच म्हणालो 'सगळीच विडंबने आवडतील ( म्हणजे काही विडंबने आवडलेली आहेत हे अधोरेखीत होते असे वाटले) असे नाही' असो..
(सपष्टिकरण देणार) केशवसुमार
अवांतरः आपला पहिला प्रतिसाद संपादित केलेला दिसतो ;)
2 Apr 2008 - 1:40 am | बेसनलाडू
अवांतरः आपला पहिला प्रतिसाद संपादित केलेला दिसतो ;)
'त्या' संपादित प्रतिसादाचे कारणच न उरल्याने संपादन केले :)
(स्पष्टीकारक)बेसनलाडू
1 Apr 2008 - 11:10 am | धमाल मुलगा
प्र.का.टा.आ.
1 Apr 2008 - 11:09 am | धमाल मुलगा
चला, एप्रिलफूल स॑पवून मुल्ला वापस मस्जीद लौटा!!!!!
बर॑ वाटल॑ केसुशेठ :-)))
आपला,
- मस्त'मौला' ध मा ल.
1 Apr 2008 - 11:49 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार !!
(आभारी) केशवसुमार
28 Dec 2014 - 6:36 pm | अत्रुप्त आत्मा
@आज अचानक लाथ पडे =)))))
'गूढ खूण' मम कळुन लाजुनी
बघते ती इकडे तिकडे =)))))
दचकुनि जागा मी नीजेतून
भार्येने धरले नरडे =))))) वारलो..वारलो...रे!!!!!!! =))
केवळ आणि केवळ महान आहे हे!! =))
28 Dec 2014 - 7:01 pm | तिमा
28 Dec 2014 - 10:15 pm | अत्रुप्त आत्मा
=))
जागा तीच आहे..फक्त बसलीये चुकिच्या ठिकाणी! =)) :p =))
29 Dec 2014 - 7:20 pm | सूड
हे वाचून एक अत्रुप्त कवी आठवले.