'केशवा' अजब तुझे अवतार!

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
29 Mar 2008 - 6:32 pm

मि.पा.चे विडंबनाचार्य केशवसुमार ह्यांनी दोन दिवस मि.पा.करांना अत्यवस्थ करुन सोडले आणि नंतर पुन्हा झकास विडंबनाने एंट्री मारुन एक सुखद धक्का दिला त्याबद्दल त्यांना हे विडंबन सादर!
शब्दप्रभू गदिमांचे शब्द 'उध्दवा अजब तुझे सरकार' ही आमची प्रेरणा!

'केशवा', अजब तुझे अवतार!
सुनवी राजा, प्रजा ओरडे, होऊ नको तडीपार!

इथे 'कवींना' मरण जन्मता, 'विडंबना'तुनि चिरंजीविता
काय बावळे उगाच होती, विडंबनी बेजार!

लबाड तरि ते देति दुगाण्या, गुणवंतांना मात्र झोडण्या
प्रतिभेच्याही गळ्यात धोंडा, दुर्दैवी आचार!

घरभेदे हे इथेच बसले, जालावरचे सख्य नासले
येता कविता विडंबुनी ती देशी तू साभार!

चतुरंग

हे ठिकाण

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

29 Mar 2008 - 6:35 pm | सर्वसाक्षी

अप्रतिम!
केशवशेठ पुनरागमनात स्वागत असो.
चतुरंग,
अभिनंदन.
साक्षी

स्वाती राजेश's picture

29 Mar 2008 - 6:51 pm | स्वाती राजेश

चतुरंग विडंबन छान झाले आहे.
'केशवा', अजब तुझे अवतार!
सुनवी राजा, प्रजा ओरडे, होऊ नको तडीपार!

ह्या ओळी अगदी चपखल..

सुधीर कांदळकर's picture

29 Mar 2008 - 8:25 pm | सुधीर कांदळकर

उठून दिसणारे सुंदर विडंबन.

धन्यवाद.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

बेसनलाडू's picture

30 Mar 2008 - 1:10 am | बेसनलाडू

आवडले. शेवटचे कडवे मस्त.
(वाचक)बेसनलाडू

फटू's picture

30 Mar 2008 - 5:58 am | फटू

आहे विडंबन. चालू द्या.

सतीश गावडे
आमची इथेही शाखा आहे ->मी शोधतो किनारा...

प्रशांतकवळे's picture

30 Mar 2008 - 9:34 am | प्रशांतकवळे

सुंदर विडंबन

प्रशांत

विसोबा खेचर's picture

30 Mar 2008 - 12:57 pm | विसोबा खेचर

रंगा,

प्रसंगानुरुप, परंतु अतिशय दर्जेदार विडंबन...!

'केशवा', अजब तुझे अवतार!
सुनवी राजा, प्रजा ओरडे, होऊ नको तडीपार!

वा वा! क्या बात है...

तात्या.

अविनाश ओगले's picture

30 Mar 2008 - 8:26 pm | अविनाश ओगले

अप्रतिम विडंबन!
दोन ओळींची भर टाकावीशी वाटते...
काव्य, विडंबन इथे पोसले, टीका टोमणे सर्व सोसले
`मिपा'वाचून अशा लिखाणा सांग कुठे आधार?

प्रा सुरेश खेडकर's picture

31 Mar 2008 - 3:05 pm | प्रा सुरेश खेडकर

इथे 'कवींना' मरण जन्मता, 'विडंबना'तुनि चिरंजीविता
आवडले. अभिनंदन

क्रेमर's picture

22 Jul 2010 - 11:08 pm | क्रेमर

मजेदार शिजलेय!!!

-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.