ऐक धरित्रे, तव उदरातील
गर्भांकुर ते नवे नव्हाळे
उमलून येता अंगांगावरी
बाहू तुझे गं लेकुरवाळे
ग्रीष्माचा गं अफ़ाट वणवा
थोडेसे तू सोस उन्हाळे
तुझ्याच साठी घेऊन येईन
मेघ अनोखे निळे सावळे
सचैल घालेन स्नान तुजला
बहरून येशिल राजस बाळे !
लेऊन घेशील साज आगळा
माणिक, पाचू, मोती पोवळे
तृप्त होऊनी, गीत तुझे मग
कडेकपारीतूनी झुळझुळे
इंद्रधनूच्या झुल्यावरी गं
घेशिल हलके तू हिंदोळे
आज लेऊनी घे गं तूही
सुर्याचे हे लखलख वाळे
उद्या पुन्हा मी बरसत येईन
पुरवेन आणिक तुझे डोहाळे
- प्राजु
प्रतिक्रिया
27 Nov 2009 - 10:58 am | ज्ञानेश...
चांगली आहे कविता!
27 Nov 2009 - 11:57 am | गणपा
साधी सरळ कविता आवडली प्राजुतै
27 Nov 2009 - 12:08 pm | अवलिया
छान !
--अवलिया
27 Nov 2009 - 12:22 pm | jaypal
चित्रमय कविता. वाचताना डोळ्या समोर चित्र उमटत गेली.
छान , ताजतवानं वाटल.(कविता वाचुन व्हीजुअलाईज करा. बघा आळस जातो कि नाही?)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
27 Nov 2009 - 12:28 pm | अरुण मनोहर
सुंदर कविता.
27 Nov 2009 - 12:37 pm | कानडाऊ योगेशु
कवितेला छान लय आहे.
इंदिरा संतांच्या बाभळीवरच्या कवितेची आठवण झाली.
लवलव हिरवी गार पालवी
काट्यांची वर मोहक जाळी.
घमघम करती लोलक पिवळी
फांदीतर काळोखी काळी.
-----------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
27 Nov 2009 - 1:42 pm | अमृतांजन
कवितेची मध्यवर्ती कल्पना खूपच आवडली.
ऐक धरित्रे, तुझ्या उरातील-
"उरात" च्या ऐवजी दुसरा समर्पक शब्द योग्य वाटला असता.
सगळ्यात चांगले कडवे-
आज लेऊनी घे गं तूही
सुर्याचे हे लखलख वाळे
उद्या पुन्हा मी बरसत येईन
पुरवेन आणिक तुझे डोहाळे
27 Nov 2009 - 6:36 pm | jaypal
"उदरातील" हा शब्द चालेल का?
27 Nov 2009 - 6:56 pm | अमृतांजन
ह्म्म, असाच काहीसा हवा. कारण उरात गर्भ हा अर्थ खटकतो.
27 Nov 2009 - 7:58 pm | प्राजु
धन्यवाद.
:)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
27 Nov 2009 - 8:35 pm | अमृतांजन
आता आम्ही विडंबन करायला मोकळे. ;-)
27 Nov 2009 - 4:51 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
27 Nov 2009 - 8:27 pm | क्रान्ति
प्राजूची कविता नेहमीच चित्रदर्शी असते आणि प्रसन्नही! :)
क्रान्ति
अग्निसखा
29 Nov 2009 - 9:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राजूची कविता नेहमीच चित्रदर्शी असते आणि प्रसन्नही!
-दिलीप बिरुटे
27 Nov 2009 - 8:41 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता सुंदर. प्रसन्न करून गेली.
क्रांतिताईशी सहमत.
बिपिन कार्यकर्ते
27 Nov 2009 - 8:44 pm | अमृतांजन
>>बाहू तुझे गं लेकुरवाळे
हा शब्दप्रयोग फारच वेगळा वाटला- अर्थातच छान!
(विडंबनाला सुरुवात केली आहे)
27 Nov 2009 - 10:41 pm | चन्द्रशेखर गोखले
आनंद देणारी कविता...!
27 Nov 2009 - 10:41 pm | चन्द्रशेखर गोखले
आनंद देणारी कविता...!
29 Nov 2009 - 9:32 pm | प्रभो
छान..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!