२६/११/२००९

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
24 Nov 2009 - 11:59 pm

अहवाल, समित्यांमागे वास्तव थंड केले
मेणबत्तीआड डोळ्यांतील विस्तव थंड केले

पाहुनी रण जेव्हा वळल्या मुठी जनांच्या
निषेध खलिता थोपवूनी हातांस थंड केले

जेव्हा उभे राहिले प्रश्नांमागूनी प्रश्न
एका कसाबमागे इतर प्रश्नांस थंड केले

रोखलेली बोटे होतील मुठी म्हणूनी
राजीनामे फेकून त्या बोटांस थंड केले

जेव्हा प्रयत्न केला त्या रात्रीच्या स्मरणाचा
मराठीच्या गदारोळात मेंदूस थंड केले

नव्या सरकारच्या आड 'ते'च जुने मंत्री
'मनसे' देऊन हाती मिडीयास थंड केले

धग चितेची आता उरली आहे स्मशानी
जन पेटणार कसे? त्यांच्या मनांस थंड केले

करुणकविता

प्रतिक्रिया

विकास's picture

25 Nov 2009 - 1:27 am | विकास

.

गणपा's picture

25 Nov 2009 - 1:38 am | गणपा

......

:(

प्राजु's picture

25 Nov 2009 - 3:42 am | प्राजु

...
काय बोलू?
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Nov 2009 - 10:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

.

मदनबाण's picture

25 Nov 2009 - 8:39 am | मदनबाण

जॅकेट होते त्यांनी घातलेले
ज्याचा दर्जा होता सुमार
गेला प्राण या वीराचा
अन् जॅकेट झाले गहाळ

( आर. आर. आबांचा राजिनामा? :--- http://www.misalpav.com/node/4897 )
मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

हेमंत करकरे यांचे बुलेटप्रुफ जॅकेट गहाळ
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=225...

विसोबा खेचर's picture

25 Nov 2009 - 8:42 am | विसोबा खेचर

....!

आशिष सुर्वे's picture

25 Nov 2009 - 9:49 am | आशिष सुर्वे

त्या हरामखोर क**ला जनतेच्या हवाली करावे
त्या भ**ची चामडी सोलून काढावीशी वाटतेय
हरामखोर साला

(त्याचे नावही लिहिवत नाहीये)
-
कोकणी फणस

चेतन's picture

25 Nov 2009 - 10:11 am | चेतन

इथे लिहलेस म्हणुन ठीक आहे.
ह्या कवितेवर दुसर्‍या ठीकाणी अशी प्रतिक्रिया दिली असतिस तर 'मवाली ' म्हणलं असतं प्रगल्भ आणि विचारवंत लोकांनी तुला

(विचारवंतांना फाट्यावर मारणारा) चेतन

अविनाशकुलकर्णी's picture

25 Nov 2009 - 10:07 am | अविनाशकुलकर्णी

सर्व धर्म सहभावाने राष्ट्रास थंड केले,
निधर्मी वादाने राष्ट्रास षंढ केले

चित्रा's picture

25 Nov 2009 - 10:13 am | चित्रा

कविता पोचली.

विशाल कुलकर्णी's picture

25 Nov 2009 - 10:16 am | विशाल कुलकर्णी

:-(

आशिष सुर्वे's picture

25 Nov 2009 - 10:27 am | आशिष सुर्वे

इथे लिहलेस म्हणुन ठीक आहे.
ह्या कवितेवर दुसर्‍या ठीकाणी अशी प्रतिक्रिया दिली असतिस तर 'मवाली ' म्हणलं असतं प्रगल्भ आणि विचारवंत लोकांनी तुला

(विचारवंतांना फाट्यावर मारणारा) चेतन

ह्या विचारांसाठी 'मवाली' म्हणून घेतलेले आवडेल
-
कोकणी फणस

एकलव्य's picture

25 Nov 2009 - 10:59 am | एकलव्य

नव्या सरकारच्या आड 'ते'च जुने मंत्री

वाहीदा's picture

25 Nov 2009 - 4:17 pm | वाहीदा

नव्या सरकारच्या आड 'ते'च जुने मंत्री
'मनसे' देऊन हाती मिडीयास थंड केले

त्या सर्व मंत्र्यांचापण Court Marshal व्हायलाच पाहीजे ...
Army Rule यायलाच पाहीजे

~ वाहीदा

स्वाती२'s picture

25 Nov 2009 - 6:03 pm | स्वाती२

:(

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Nov 2009 - 6:12 pm | बिपिन कार्यकर्ते

अस्वस्थ!!!

बिपिन कार्यकर्ते

सूहास's picture

25 Nov 2009 - 6:50 pm | सूहास (not verified)

ऋष्या !!

वास्तवदर्शी कविता !!

ते घटनेचा पुढचे भाग कधी लिहीणार आहेस ?

सू हा स...

ऋषिकेश's picture

29 Nov 2009 - 4:43 pm | ऋषिकेश

सर्व संवेदनशील प्रतिसादकांचे व वाचकांचे आभार

माझ्या उशीरा प्रतिसाद दिल्याने धागा वर येईल. त्याबद्दल क्षमस्व

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?