कधी उन्मादाच्या भरात
तिला चंद्राची उपमा देतो
विसरतो सोयिस्कररित्या…
चंद्र..
तो स्वत:च शापित असतो !
कधी प्रेमाने तिलाही
गंगेसम निर्मळ ठरवतो
तिथली आत्मार्पणं पाहून…
मी ही…
शुद्धतेच्या व्याख्या विसरतो !
तुला चांदण्यांची फुले आणु?
उत्साहाने स्वप्ने पाहतो …
तुरडाळ शहाण्णव रुपये किलो?
आम्ही दोघे…
वास्तवाच्या चक्रव्युहात अडकतो !
विशाल.
प्रतिक्रिया
23 Nov 2009 - 8:01 pm | सूहास (not verified)
शेवटचे कडवे आवडले ...
सू हा स...
23 Nov 2009 - 9:19 pm | मदनबाण
मस्त कविता... ;)
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
23 Nov 2009 - 9:21 pm | प्राजु
व्वा!!
जोरदार!! शेवटंच कडवं सिक्सर आहे. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
23 Nov 2009 - 9:30 pm | प्रभो
मस्त...आवडली
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
23 Nov 2009 - 9:48 pm | गणपा
हा हा हा
स्वप्नाच्या दुनियेतुन एकदम धाडकरुन वास्तवात घुसली कविता..
मस्तच.
24 Nov 2009 - 3:44 am | पक्या
मस्त !
जय महाराष्ट्र , जय मराठी !
24 Nov 2009 - 7:25 am | उमराणी सरकार
"कात्रज च्या घाटात अडकतो" असे असते तर अधिक वास्तववादी वाटले असते.
असो, कवितेतला विषाद आवडला.
उमराणी सरकार
24 Nov 2009 - 9:08 am | विसोबा खेचर
हे बाकी मस्त रे! :)
तात्या.
24 Nov 2009 - 9:53 am | विशाल कुलकर्णी
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
24 Nov 2009 - 11:06 am | फ्रॅक्चर बंड्या
आवडली कविता...
शेवटचे कडवे भारी...
binarybandya™
24 Nov 2009 - 11:22 am | अवलिया
खरे आहे रे... !!!
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
24 Nov 2009 - 11:26 am | sneharani
मस्त... आवडली.