गाभा:
बीएसई वेबसाइट आता मराठीतूनही...
मराठी गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढल्याने आता बीएसई ने त्यांची वेबसाइट इंग्रजी, गुजराथी आणी हिंदी नंतर आता मराठीतही लाँच करायचे ठरवलेय.
सर्व मराठी गुंतवणूकदारांना याने भरपूर सोय होणारे.......त्यांचे अभिनंदन.......
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सात दिवसांचा ‘ आवाज ’ दिल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ही वाचण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
21 Nov 2009 - 11:07 pm | jaypal
घेउन गुंतवणुक करीन म्हणतो.(फुकट चा सल्ला देतील काय?)
लाखाचे १२००० करणारा जयपाल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
21 Nov 2009 - 11:06 pm | एकशुन्य
बीएसई ने कारण काही देवो..पण कर्म केले या बद्दल अभिनंदन ..
मनसे ने उठवलेल्या आवाजाने कान उघडले.
मनसेला पण धन्यवाद. ( सोनारानेच कान टोचावे..:))
" स्वराज्य आले..सुराज्य?? "
21 Nov 2009 - 11:06 pm | विकास
नवीन संकेतस्थळास शुभेच्छा! आता मराठी माणसाची गुंतवणूक पण वाढूंदेत आणि ज्यामधे गुंतवणूक करता येतील असे स्वतःचे उद्योगधंदेपण वाढूंदेत ही शुभेच्छा!
22 Nov 2009 - 9:50 am | अवलिया
असेच म्हणतो.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
22 Nov 2009 - 11:13 pm | धनंजय
गुंतवणूक आणि व्यापारात प्रगती होवो.
21 Nov 2009 - 11:23 pm | शाहरुख
बाकी ७ दिवसात संकेतस्थळ चालू होत असेल तर साहेबांच्या आवाजात दम आहे..
आमच्या प्रोजेक्ट टीमला पण आवाज देण्याबद्दल त्यांना विनंती करू का ??
22 Nov 2009 - 11:08 pm | बट्ट्याबोळ
हा हा हा !! लय भारी !!
23 Nov 2009 - 8:36 am | llपुण्याचे पेशवेll
आमच्या प्रोजेक्ट टीमला पण आवाज देण्याबद्दल त्यांना विनंती करू का ??
नको बट्ट्याबोळ होईल. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
21 Nov 2009 - 11:42 pm | विसोबा खेचर
येस्स! जय मनसे...
तात्या.
22 Nov 2009 - 10:06 am | सुनील
चांगली बातमी. पण एखादे संकेतस्थळ केवळ सात दिवसात तयार होऊ शकते यावर विश्वास नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Nov 2009 - 11:54 am | आण्णा चिंबोरी
जय मनसे.
राज ठाकरेच्या धमकीचा बराच फायदा झाला म्हणायचा. चला आता बीएसईचे संकेतस्थळ मराठीत पाहता येईल.
न्यूयॉर्क ष्टाक एक्सेंजचे संकेतस्थळ मराठीत नसल्यास तेथील महाराष्ट्र मंडळांना किंवा अक्षयभाषा या संस्थेला त्यासाठी प्रयत्न करता येतील असे वाटते. अर्थातच हा अनाहूत सल्ला आहे.
22 Nov 2009 - 12:04 pm | देवदत्त
बातमी चांगली आहे.
पण फक्त ७ दिवस? अरे, आमच्या सारख्या ते बनविणार्यावर आणि नंतर ते तपासून पाहणार्यांवर दया करा रे ;)
22 Nov 2009 - 6:07 pm | अजय भागवत
चांगली बातमी. जगातील पहिल्या दहा भाषांपैकी एक मराठी आहे. तिला योग्य तो मान आता मिळू लागल्याची ही सुचिन्हे आहेत.
22 Nov 2009 - 6:20 pm | स्वाती२
चांगली बातमी. मनसेचे अभिनंदन!
22 Nov 2009 - 9:20 pm | मदनबाण
चला उत्तम झाले...आता मराठीतुन माहिती वाचायला आणि त्याचा (बाजाराचा)अभ्यास करायला मदतच होईल. :)
मदनबाण.....
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् |
23 Nov 2009 - 2:43 am | चतुरंग
स्टाक एक्चेंज री वेबसाईट मराठीमा देऊने बीएसई रो निर्णय मने घनो चोखो लागे! ;)
(जय रामजीकी)चतुरंगलाल
6 Dec 2009 - 10:09 pm | देवदत्त
१५ दिवस झाले की? :(
काही नवीन खबर?
7 Dec 2009 - 1:08 am | प्रभो
नाय झालेली अजून मराठीत..
अजूनही फक्त हिंदी आणी गुजराथीतच आहे. :(
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
17 Dec 2009 - 1:05 pm | देवदत्त
कधी सुरू केले ते नेमके माहित नाही. पण आज मित्राने सांगितल्यावर पाहिले तर मराठीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ह्या दुव्यावर BSEचे संकेतस्थळ पाहता येईल.
मनसे ला धन्यवाद.
17 Dec 2009 - 8:21 pm | प्रभो
सगळ्यांचे अभिनंदन..
बी एस ई आणी मनसे चे आभार...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!