मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बीएसई वेबसाइट आता मराठीतूनही

प्रभो · · काथ्याकूट
बीएसई वेबसाइट आता मराठीतूनही... मराठी गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढल्याने आता बीएसई ने त्यांची वेबसाइट इंग्रजी, गुजराथी आणी हिंदी नंतर आता मराठीतही लाँच करायचे ठरवलेय. सर्व मराठी गुंतवणूकदारांना याने भरपूर सोय होणारे.......त्यांचे अभिनंदन....... राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सात दिवसांचा ‘ आवाज ’ दिल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ही वाचण्यात आले आहे. म टा धागा

वाचने 4222 वाचनखूण प्रतिक्रिया 20

jaypal Sat, 11/21/2009 - 23:07
घेउन गुंतवणुक करीन म्हणतो.(फुकट चा सल्ला देतील काय?) लाखाचे १२००० करणारा जयपाल *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

एकशुन्य Sat, 11/21/2009 - 23:06
बीएसई ने कारण काही देवो..पण कर्म केले या बद्दल अभिनंदन .. मनसे ने उठवलेल्या आवाजाने कान उघडले. मनसेला पण धन्यवाद. ( सोनारानेच कान टोचावे..:)) " स्वराज्य आले..सुराज्य?? "

विकास Sat, 11/21/2009 - 23:06
नवीन संकेतस्थळास शुभेच्छा! आता मराठी माणसाची गुंतवणूक पण वाढूंदेत आणि ज्यामधे गुंतवणूक करता येतील असे स्वतःचे उद्योगधंदेपण वाढूंदेत ही शुभेच्छा!

In reply to by विकास

अवलिया Sun, 11/22/2009 - 09:50
असेच म्हणतो. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

शाहरुख Sat, 11/21/2009 - 23:23
बाकी ७ दिवसात संकेतस्थळ चालू होत असेल तर साहेबांच्या आवाजात दम आहे.. आमच्या प्रोजेक्ट टीमला पण आवाज देण्याबद्दल त्यांना विनंती करू का ??

In reply to by शाहरुख

आमच्या प्रोजेक्ट टीमला पण आवाज देण्याबद्दल त्यांना विनंती करू का ?? नको बट्ट्याबोळ होईल. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

विसोबा खेचर Sat, 11/21/2009 - 23:42
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सात दिवसांचा ‘ आवाज ’ दिल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ही वाचण्यात आले आहे.
येस्स! जय मनसे... तात्या.

सुनील Sun, 11/22/2009 - 10:06
चांगली बातमी. पण एखादे संकेतस्थळ केवळ सात दिवसात तयार होऊ शकते यावर विश्वास नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आण्णा चिंबोरी Sun, 11/22/2009 - 11:54
जय मनसे. राज ठाकरेच्या धमकीचा बराच फायदा झाला म्हणायचा. चला आता बीएसईचे संकेतस्थळ मराठीत पाहता येईल. न्यूयॉर्क ष्टाक एक्सेंजचे संकेतस्थळ मराठीत नसल्यास तेथील महाराष्ट्र मंडळांना किंवा अक्षयभाषा या संस्थेला त्यासाठी प्रयत्न करता येतील असे वाटते. अर्थातच हा अनाहूत सल्ला आहे.

देवदत्त Sun, 11/22/2009 - 12:04
बातमी चांगली आहे. पण फक्त ७ दिवस? अरे, आमच्या सारख्या ते बनविणार्‍यावर आणि नंतर ते तपासून पाहणार्‍यांवर दया करा रे ;)

अजय भागवत Sun, 11/22/2009 - 18:07
चांगली बातमी. जगातील पहिल्या दहा भाषांपैकी एक मराठी आहे. तिला योग्य तो मान आता मिळू लागल्याची ही सुचिन्हे आहेत.

मदनबाण Sun, 11/22/2009 - 21:20
चला उत्तम झाले...आता मराठीतुन माहिती वाचायला आणि त्याचा (बाजाराचा)अभ्यास करायला मदतच होईल. :) मदनबाण..... आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् |

चतुरंग Mon, 11/23/2009 - 02:43
स्टाक एक्चेंज री वेबसाईट मराठीमा देऊने बीएसई रो निर्णय मने घनो चोखो लागे! ;) (जय रामजीकी)चतुरंगलाल

In reply to by देवदत्त

प्रभो Mon, 12/07/2009 - 01:08
नाय झालेली अजून मराठीत.. अजूनही फक्त हिंदी आणी गुजराथीतच आहे. :( --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

देवदत्त गुरुवार, 12/17/2009 - 13:05
कधी सुरू केले ते नेमके माहित नाही. पण आज मित्राने सांगितल्यावर पाहिले तर मराठीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ह्या दुव्यावर BSEचे संकेतस्थळ पाहता येईल. मनसे ला धन्यवाद.

In reply to by देवदत्त

प्रभो गुरुवार, 12/17/2009 - 20:21
सगळ्यांचे अभिनंदन.. बी एस ई आणी मनसे चे आभार... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!