आयुष्य तेंव्हा "सायरा बानो" सारखं असतं
इकडून तिकडे हिंडण्याचं चकाट्या पिटत फिरण्याचं
.....जेंव्हा आपलं वय "एक ते चार" असतं !
आयुष्य मग "गीता बाली" सारखं होतं
पुष्कळ वेळ बागडण्याचं, मग पुस्तकांशी झगडण्याचं
.....जेंव्हा आपलं वय "पाच ते आठ" असतं !
आयुष्य डोलणार्या "वहिदा" सारखं होतं
क्षणात गिरकी घेण्याचं , बर्याचदां फिरकी घेण्याचं
.....जेंव्हा आपलं वय " नऊ ते बारा " असतं !
आयुष्य आता "नूतन" सारखं होतं
प्रसंग कित्येक हसण्याचे, अपुर्या प्रयत्नांनी फसण्याचे
.....जेंव्हा आपलं वय " तेरा ते सोळा " असतं !
आयुष्य रसाळ , "शर्मिला" सारखं होतं
क्षण अन क्षण आवडण्याचं, कशाचीही भुरळ पडण्याचं
.....जेंव्हा आपलं वय " सतरा ते वीस " असतं !
आयुष्य आता "विद्या सिन्हा" सारखं होतं
प्रत्येक गोष्टीत गुरफटण्याचं , कुठेतरी टिकयला धडपडण्याचं
.....जेंव्हा आपलं वय " एकवीस ते पंचवीस " असतं !
यानंतरचं आयुष्य "मधुबाला" सारखं होतं
कधी अवखळ , कधी शांत , कधी "काय होईल?" याची भ्रांत
कधी हौसे मौजेनं मुरडण्याचं - तर कधी हौस गरजेपायी खुरडण्याचं
.....जेंव्हा आपलं वय "सहवीस ते कितीही" असतं !
प्रतिक्रिया
29 Mar 2008 - 6:20 pm | स्वाती राजेश
कविता छान आहे. पण सप्टेंबर २००५ ला लिहिली आहे, हे लिहिण्यात काय हेतु आहे ते कळाले नाही.
बाकी कविता उत्तम.
31 Mar 2008 - 9:21 am | उदय सप्रे
स्वाती राजेश,
माझी आणखीन एक कविता याच नावाने आहे (जी सध्ध्या मिळत नाहिये!) त्यामुळे संग्रही मी तशी नोंद केली होती.शिवाय कवितेवर तारीख - साढारण कालावधी लिहिण्याची जुनी सवय पण आहे.
जमल्यास "शिवरायांचे "८" वा वे रूप" हा मि.पा. वरील लेख पण वाचावा ही विनंती.
उदय सप्रे
30 Mar 2008 - 12:27 am | वरदा
आहे....कधी अवखळ , कधी शांत , कधी "काय होईल?" याची भ्रांत
ह्म्म्म्म.......ते खरं म्हणा....