कोडी-२

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
19 Nov 2009 - 1:33 pm

आमची प्रेरणा क्रान्तिताईंची सुरेख कविता कोडी

ओळख करून देतो अमुची तुम्हास थोडी
काढू नका कधी ही अमुची चुकून खोडी

साधे, सरळ कधी ही जमते न बोलण्याला
उद्धार खानदानी तोंडी नि लावण्याला
भाष्या सदैव असते तोंडात शालजोडी

बोलून संकटाला आमंत्रणे कशाला
चिखलात दगड आधी अन् मारणे कशाला
मग बोलता अता का "पळण्या भुईच थोडी!"

उघडून तोंड तुमचे नुकसान फार झाले
आम्ही म्हणून तुमच्या पाठीत वार केले
आता कळेल तुम्हा मौना मधील गोडी

तुमच्या फुल्या फुल्यांचे अर्थ काय होते?
जावे जिथे, तिथे का लफड्यात पाय होते?
घालू नका अम्हाला असली भिकार कोडी!

"केश्या" मुळात तू हे खरडायला हवे का?
निवॄत्त छान होता, सांगायला हवे का?
नाहीच का मनाची तुज सांग लाज थोडी?

विडंबन

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Nov 2009 - 5:51 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह वाह वाह.! वेलकम ब्याक केसुशेठ.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

प्रभो's picture

19 Nov 2009 - 8:27 pm | प्रभो

वाह वाह वाह.! वेलकम ब्याक केसुशेठ.

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

प्रभो's picture

19 Nov 2009 - 8:28 pm | प्रभो

प्रकाटाआ

चेतन's picture

19 Nov 2009 - 5:52 pm | चेतन

दणक्यात पुनरागमन गुर्जी

चेतन

सूहास's picture

19 Nov 2009 - 5:57 pm | सूहास (not verified)

साष्टांग दडवत तुम्हाला !!!
साष्टांग दडवत तुम्हाला !!!
साष्टांग दडवत तुम्हाला !!!
साष्टांग दडवत तुम्हाला !!!
साष्टांग दडवत तुम्हाला !!!

सू हा स...

पॅपिलॉन's picture

19 Nov 2009 - 6:06 pm | पॅपिलॉन

सुंदर!!

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Nov 2009 - 6:09 pm | परिकथेतील राजकुमार

ओळख करून देतो अमुची तुम्हास थोडी
काढू नका कधी ही अमुची चुकून खोडी

केसु गुर्जी लैच बेक्कार शॉट हो !!

जबर्‍याच झालाय इडंबन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

19 Nov 2009 - 6:25 pm | अवलिया

झकास केसुशेट !
जबर्‍याच झालाय इडंबन.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

गणपा's picture

19 Nov 2009 - 6:32 pm | गणपा

वा मस्तच झालय विडंबन.
वेल्क्म्बॅक.

धमाल मुलगा's picture

19 Nov 2009 - 6:35 pm | धमाल मुलगा

श्री.श्री.श्री. अखिल विडंबनशिरोमणि केसुगुर्जी,
वेलकम ब्याक!

उघडून तोंड तुमचे नुकसान फार झाले
आम्ही म्हणून तुमच्या पाठीत वार केले
आता कळेल तुम्हा मौना मधील गोडी

तुमच्या फुल्या फुल्यांचे अर्थ काय होते?
जावे जिथे, तिथे का लफड्यात पाय होते?
घालू नका अम्हाला असली भिकार कोडी!

अग्ग्गाय्यायायायाया......
_/\_

-() ध.

वेताळ's picture

19 Nov 2009 - 6:41 pm | वेताळ

केशुगुर्जीचा विजय असो.

वेताळ

सहज's picture

19 Nov 2009 - 6:57 pm | सहज

सही!

श्रावण मोडक's picture

19 Nov 2009 - 7:07 pm | श्रावण मोडक

फुल्या आणि लफडी अंमळ परिचयाचे वाटले.
विडंबन झक्कासच!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2009 - 8:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त !

-दिलीप बिरुटे

मजा आला! :D

(कोड्यातला)चतुरंग

मिसळभोक्ता's picture

19 Nov 2009 - 10:57 pm | मिसळभोक्ता

वृत्ताकडे अधिक लक्ष द्यायला हवे असे वाटते.

नेहमीचे बाई, बाटली विषय टाळल्याबद्दल अभिनंदन.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

टुकुल's picture

20 Nov 2009 - 12:00 am | टुकुल

जबरदस्त केसुशेठ..

<<"केश्या" मुळात तू हे खरडायला हवे का?
निवॄत्त छान होता, सांगायला हवे का?
नाहीच का मनाची तुज सांग लाज थोडी? >>
=)) =))

मनाची लाज सोडुन परत एकदा फार्म मधे

--टुकुल

केशवसुमार's picture

20 Nov 2009 - 11:48 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार.