आमचा निर्णय...

केशवसुमार's picture
केशवसुमार in जनातलं, मनातलं
28 Mar 2008 - 2:17 am

आमच्या विडंबन करण्या मुळे मराठी साहित्याची होणारी हनी आणि आभिजात साहित्यिकांना व वाचकांना उठणारा पोटशूळ लक्षात घेता
आज पासून आम्ही विडंबने प्रसिद्ध करणे थांबत आहोत..आज पर्यंत ज्या वाचकांनी प्रतिसाद/ दाद/ प्रेत्साहन दिले त्या सगळ्यांचे मनापासून आभार.

केशवसुमार

धोरण

प्रतिक्रिया

प्राजु's picture

28 Mar 2008 - 2:22 am | प्राजु

अहो विडंबन करण्यावर बंदी नाही.. तर विडंबन कोणत्या गाण्याचे आहे त्यावर अवलंबून आहे. आज देहाची तिजोरी वर दारू चे विडंबन.. उद्या पसायदानावर जर विडंबन झाले तर अवघड होईल..
तुमचि विडंबने खूप आवडतात आम्हाला.. पण दारू सोडून इतर भरपूर विषयावर विडंबन करावे ही विनंती..
मी आपली शिष्या आहे . हे नका विसरू.. :)

- (सर्वव्यापी)प्राजु

सर्किट's picture

28 Mar 2008 - 2:26 am | सर्किट (not verified)

पसायदानाचे विडंबन करायला घेतले आहे. लवकरच प्रकाअशित करू. त्याने अच्वघड काय होईल, ते जरा विस्ताराने कळवावे.

- सर्किट विठ्ठलपंत कुलकर्णी

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 2:35 am | विसोबा खेचर

पसायदानाचे विडंबन करायला घेतले आहे. लवकरच प्रकाअशित करू.

ते कदाचित अप्रकाशितही होऊ शकेल हे जाणून इथे प्रकाशित करायचे किंवा नाही ते पहावे!

तात्या.

चतुरंग's picture

28 Mar 2008 - 2:37 am | चतुरंग

पसायदानातच "जो जे वांछील तो ते लाहो" म्हणून ठेवलेलं आहे माउलीने तेव्हा तुमच्या विटंबनेने त्याचे काही बिघडणार नाही पण लोकांचे जोडे पडले तर तयार रहा!

चतुरंग

सर्किट's picture

28 Mar 2008 - 2:47 am | सर्किट (not verified)

मुळात विडंबनाने मूळ कवीचे काही "बिघडते" असे म्हणणे चुकीचे आहे.

आणि जोड्यांचे म्हणाल, तर जिहादी लोकांचे जोडे पुष्पगुच्छांसारखे आजवर झेलले आहेत, त्यात नवीन काय ?

- सर्किट

चतुरंग's picture

28 Mar 2008 - 2:50 am | चतुरंग

तुम्हीच म्हणाला होतात ना संकेतस्थळावर वावरताना 'गेंड्याची कातडी' लागते म्हणून? मग तुम्हाला काहीही अशक्य नाही!

चतुरंग

सर्किट's picture

28 Mar 2008 - 3:10 am | सर्किट (not verified)

परित्राणाय जालानाम विनाशायच प्रशासकां!
मराठी संकेतस्थलार्थाय 'मिसळपाव' युगेयुगे!!

हे आपलेच ना ?

ह्यामुळे कुणाचे बिघडले ? व्यासांचे की कृष्णाचे ?

- सर्किट वसुदेव यादव

चतुरंग's picture

28 Mar 2008 - 3:23 am | चतुरंग

ह्याने आमचेच बिघडले आहे बाकी कुणाचे असो वा नसो आणि म्हणूनच मी अशा प्रकारचे विडंबन न करण्याचा निर्णय घेतला आहे!

चतुरंग

सर्किट's picture

28 Mar 2008 - 3:36 am | सर्किट (not verified)

अहो, पण आम्हाला आपले हे विडंबन खूपच आवडले आहे !!!

(आणि इतर अनेकांना पण !)

आणि तुमचे काय बुवा बिघडले ?

उलट विडंबनकार म्हणून आदरच निर्माण झाला सर्वांना तुमच्याबद्दल.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 2:32 am | विसोबा खेचर

अहो विडंबन करण्यावर बंदी नाही.. तर विडंबन कोणत्या गाण्याचे आहे त्यावर अवलंबून आहे. आज देहाची तिजोरी वर दारू चे विडंबन.. उद्या पसायदानावर जर विडंबन झाले तर अवघड होईल..

प्राजूशी सहमत!

मला वाटतं केशवाने सारासार विचार करून पुन्हा एकदा आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा...!

अर्थात, केशव जो निर्णय घेईल/किंवा त्याने घेतला आहे तो त्याने पूर्णपणे त्याच्या सद्सतविवेकबुद्धीला स्मरूनच घेतला आहे/असावा, असे मी तूर्तास तरी मानायला तयार नाही! पुढे मर्जी केशवाची!

अजून काय लिहू?

आपला,
(दु:खी) तात्या.

सुशील's picture

28 Mar 2008 - 8:21 am | सुशील

प्राजुताईशी सहमत आहे. दारू सोडून इतर भरपूर विषयावर विडंबन करावे तरच वाचायला मजा येते अन्यथा केशवने थोडा ब्रेक घेतलेलाच बरा.

आणखी काय लिहू?

चतुरंग

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 2:23 am | विसोबा खेचर

चला बरं झालं, आता रंगाच्या बरोबरीनेच आमचा केशवही उतरला आहे मैदानात! अब मजा आयेगा खेल का! :)

बाय द वे केशवा, तुझी विडंबने बहुत करून इतर स्थळांवर किंवा मिपावर प्रकाशित झालेल्या कविता/गझलांवर असतात, प्रासंगिक असतात, तसेच ती विडंबने खमंगही असतात! त्यामुळे तुला इथे विडंबनं लिहायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं!

सबब, तू तुझ्या निर्णयाचा फेरविचार करावास ही माझी वैयक्तिक विनंती! शेवटी मर्जी तुझी!...

तात्या.

सृष्टीलावण्या's picture

28 Mar 2008 - 7:46 am | सृष्टीलावण्या

केशवा, तुझी विडंबने बहुत करून इतर स्थळांवर किंवा मिपावर प्रकाशित झालेल्या कविता/गझलांवर असतात, प्रासंगिक असतात, तसेच ती विडंबने खमंगही असतात!

मी सुद्धा तुमच्या लिखाणाचा पंखा आहे. तुमच्या एका विडंबनाने माझे पुढील ३-४ दिवस मस्त जातात. ठोस चे तुम्ही ढोस केले की धम्माल वाटते.

मी एकच म्हणेन की देवभक्तीच काय इतर कुठल्याही प्रसिद्ध कवींचे गीत सुद्धा विडंबन करायला काहीच हरकत नाही पण देवभक्ती गाण्याचे अगदी मदिरा, सुरा इ.इ. हीन पातळीवर नको (जे तुम्ही तसे पण कधीच करत नाही) .

आपल्या काव्य प्रतिभा कौशल्याचा गरगरणारा पंखा,
सृला.

(आणि हो, तुम्हाला एकदा केशवकाका म्हटल्याबद्दल माफ करा. मी तुम्हाला केस पांढरे होऊ
लागलेला मध्यमवयीन माणूस समजत होते पण पुणे कट्ट्याचे फोटो पाहिले आणि चूक लक्षात आली.)
>
>
नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

सर्किट's picture

28 Mar 2008 - 2:24 am | सर्किट (not verified)

केशवसुमार,

मिसळपावावरील एक दु:खद घटना असे आपल्या निर्णयाचे वर्णन करावे लागेल.

आपल्या विडंबनांना प्रतिसाद (बहुतेकवेळा) न देणार्‍यांमध्ये आम्ही होतो.

आता प्रतिसाद न दिल्याबद्दल आमचे आभार कोण मानणार ?

- सर्किट

(कृपया आपल्या अनुदिनीचा दुवा द्यावा. आम्ही तेथे येऊन वाचत जाऊ.)

इनोबा म्हणे's picture

28 Mar 2008 - 2:33 am | इनोबा म्हणे

निर्णय चूकीचा वाटतो. एक वाचक(आणि 'केश्या'चा पंखा) म्हणून फेरविचार करावा एवढीच इच्छा! बाकी मर्जी आपली.

('केश्या'चा पंखा)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

बेसनलाडू's picture

28 Mar 2008 - 2:41 am | बेसनलाडू

विषायातील वैविध्य साधण्यासाठी, योग्य रचनांची निवड करण्याचे भान येण्यासाठी काही काळ ब्रेक घेणे इष्ट. त्यामुळे लेखन थांबवणे काही ठराविक काळासाठी असेल, तर निर्णय स्वागतार्ह वाटतो; पण कायमचे विडंबन करणे आणि/अथवा येथे प्रकाशित करणे थांबविणे, हा निर्णय आततायीपणाचा/घाईघाईत घेतल्यासारखा वाटल्याने पुनर्विचार करण्याची विनंती .
(समजूतदार)बेसनलाडू

सर्किट's picture

28 Mar 2008 - 2:50 am | सर्किट (not verified)

नाही, कल्पना तशी बरी आहे.

उदा

तात्यांना संगीतापासून आणि व्यक्तिचित्रांपासून ब्रेक..
प्राजुला चारोळ्यांपासून आणि "मन" ह्या विषायापासून ब्रेक..
इनोबांना "मराठी अस्मिता" पासून ब्रेक..

अनेक डॉन लोकांना दारू पासून ब्रेक..
प्रियालीला इतिहासापासून ब्रेक..
चित्तर ला गझलांपासून ब्रेक..

असे झाले, तर आम्हालाही मिसळपावापासून ब्रेक घेणे आवश्यक ठरेल.

अर्थात वाईट काअहीच नाही म्हणा त्यात.

- सर्किट

इनोबा म्हणे's picture

28 Mar 2008 - 2:57 am | इनोबा म्हणे

असे झाले, तर आम्हालाही मिसळपावापासून ब्रेक घेणे आवश्यक ठरेल.
बरं मग,कधी घेताय?

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

सर्किट's picture

28 Mar 2008 - 2:58 am | सर्किट (not verified)

बरं मग,कधी घेताय?

अर्थातच, "असे झाले तर".. आता असे म्हणजे काय हे विचारू नका बुवा ! कारण ते वरच लिहिले आहे.

- सर्किट

सचिन's picture

28 Mar 2008 - 2:55 am | सचिन

मला वाटते केशवसुमारांना योग्य वाटेल तो निर्णय ते घेतीलच.
परंतु, एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते.
येथे कोणत्याही आभिजात साहित्यिकांना व वाचकांना पोटशूळ उठला आहे असे मला वाटत नाही.
विडंबनांचा सध्या अतिरेक झाला होता आणि विषयांमधेही अत्यंत एकसुरीपणा (दारू..) आला होता, हे त्यांनाही मान्य करावेच लागेल.
उत्तमोत्तम आणि लोकप्रिय कविता / गाण्यांचे विडंबन त्यांनी "क्षमा मागून" केले असले तरी, त्या मूळ कविता / गाण्यांच्या चाहत्यांना ते आवडेलच असे नाही, हे सत्य मान्य करायला हवे. त्या भावनांचा आदर करण्याऐवजी, त्याला पोटशूळ म्हणू नये, ही विनंती.

मुक्तसुनीत's picture

28 Mar 2008 - 3:33 am | मुक्तसुनीत

...इतकेच म्हणतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. विडंबन हे आनंदाचे एक हलकेफुलके साधन आहे. भावनेच्या भरात , तिरीमिरीमधे अशा छोट्या छोट्या आनंदाला आपण पारखे होऊ नये आणि इतरानाही करू नये.

मधुशालेसारखी महाकाव्ये मद्यावर निर्माण झाली आहेत, उर्दु काव्यात मद्य , प्रेयसीवर आधारित एक स्वयंपूर्ण असा प्रतिमांचा/रूपकांचा/उपमांचा कोषच निर्माण झाला आहे. काव्यात परमेश्वर , प्रेम, नशा , प्रेयसी, या इतर असंख्य अशा कुठल्याच विचाराना बंदी कधी नव्हती आणि नाही.

सांगण्याचा उद्देश इतकाच की, इथे येण्याचा उद्देशच मूळी आनंदाच्या देवाणघेवाणीकरता आहे. ही जी मूळ दिशा आहे ती हरवली नाही तरच इथला प्रवास सुखकर होईल.

माझी अशी खात्री आहे की केशवसुमार यावर नीट विचार करतील आणि आपल्याला पुन्हा त्यांच्या गमतीशीर कविता वाचायला मिळतील.

धोंडोपंत's picture

28 Mar 2008 - 7:51 am | धोंडोपंत

केशवसुमार,

आम्ही आपल्या लेखन बंद करण्याच्या मताशी असहमत आहोत. हा निर्णय धक्कादायक आहे.

तुमचे मनोधैर्य खचविण्याच्या उद्देशाने कुणीतरी केलेल्या वायफळ टीकेमुळे तुम्ही जर लेखन बंद करण्याचा निर्णय घेण्याइतपत पुढे जात असाल तर ते धक्कादायक आहे.

निंदकाचे घर| असावे शेजारी||

या ओळी लक्षात ठेवा आणि लेखनाला प्रवृत्त व्हा.

कुणाच्यातरी आरोप आक्षेपाला बळी पडून तुम्ही लेखन बंद करणार असाल तर याचा अर्थ तुमच्या चाहत्यांपेक्षा टीकाकारांना तुम्ही जास्त महत्व देता असा होतो. तसे करू नये.

मराठी समीक्षेची पातळी एवढी चांगली नाही की ती इतक्या गांभीर्याने घ्यावी. यावर विचार करावा. एखाद्याच्या लेखनावरील जळफळाट व्यक्त करण्यासाठी मराठीत समीक्षा एक माध्यम वरून वापरली जाते असे आमचे निरीक्षण आहे.

आपला,
(चाहता) धोंडोपंत

अवांतरः-

आम्ही तुमची कुंडली अत्यंत सखोलपणे पाहिली आहे. तुमच्या लेखनाच्या उत्कृष्ट दर्जाला कोणते ग्रह कारणीभूत आहेत, हे आम्ही आपल्याला विस्तृतपणे सांगितले आहे.

त्याचप्रमाणे तुम्ही विडंबनेच का करता? आणि करावीत? याची कारणेही आम्ही आपल्याला सांगितली आहेत.

आपल्या लेखनाला रसिकमान्यता मिळेल आणि ती कशामुळे मिळेल , तुमचे क्षेत्र विडंबनच का? हे ही आम्ही आपणास तुमच्या कुंडलीतील बुध शुक्राचे कारकत्व समजावून देतांना सांगितलेले आहे.

इतक्या चांगल्या ग्रहस्थितीचा फायदा तुम्ही घेतला नाहीत तर कठीण आहे. म्हणजे आम्ही पुढे काही बोलूच शकत नाही.

ज्या गोष्टी आम्ही तुम्हांला सांगितलेल्या आहेत त्यावर विचार करा आणि लिहिते व्हा.

आपला,
(ज्योतिषभास्कर) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सर्किट's picture

28 Mar 2008 - 8:45 am | सर्किट (not verified)

मराठी समीक्षेची पातळी एवढी चांगली नाही की ती इतक्या गांभीर्याने घ्यावी. यावर विचार करावा. एखाद्याच्या लेखनावरील जळफळाट व्यक्त करण्यासाठी मराठीत समीक्षा एक माध्यम वरून वापरली जाते असे आमचे निरीक्षण आहे.

अगदी अचूक !!
त्रिवार सहमत !!!!!

सहमत !
सहमत !!
सहमत !!!

ह्यातील काही जळफळाटी समीक्षक तिरपे तिरपे प्रतिसाद देण्यात माहीर आहेत. असे आमचे निरीक्षण आहे.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 8:00 am | विसोबा खेचर

तुला एकदा नीट, इमानदरीत, शांतपणे, सांगून झालेलं आहे, तरीही जर तू ऐकलं नाहीस तर मात्र तुला धरून फटकावावा लागेल! :)

तेवढा अधिकार मला आहे, परंतु तो वापरायला लावू नकोस आणि पुन्हा चुपचाप विडंबने लिहिणे सुरू कर! :)

अर्थात, तुला काही दिवसांकरता ब्रेक घ्यायचा असेल, किंवा थोडा कुलिंग ऑफ कालावधी हवा असेल तर जरूर घे. आमचं काहीच म्हणणं नाही. वाटल्यास तोपर्यंत आजूबाजूला दिसलेला कच्चा माल हेरून ठेव! :)

परंतु तुला पुन्हा विडंबने ही लिहावीच लागतील एवढं मात्र लक्षात ठेव!

नायतर तात्याच्या मैत्रीला मुकशील एवढंच सांगतो! :)

आता निर्णय तुझाच आहे...

तात्या.

सन्जोप राव's picture

28 Mar 2008 - 8:53 am | सन्जोप राव

जाहीरपणे लिहिण्याचे प्रयोजन कळाले नाही. असे न करताही शांतपणे विडंबन करणे थांबवता आले असते. काही काकदृष्टीच्या लोकांना हा 'पब्लिसिटी स्टंट' ही वाटू शकतो.
एरवी आपल्या अनुदिनीवर आपल्याला हवे ते लिहीत रहाणे हा मला उत्तम मार्ग वाटतो. वाचणारे तिथे येऊन वाचतीलच.
सन्जोप राव

सर्किट's picture

28 Mar 2008 - 8:55 am | सर्किट (not verified)

काही काकदृष्टीच्या लोकांना हा 'पब्लिसिटी स्टंट' ही वाटू शकतो.

चुकून "काकादृष्टीच्या लोकांना" असे वाचले.

सॉरी !

काही काकांनी अजाणतेपणे तुमचे मिसळपावावरून मन उडवले होते, असे ऐकिवात आहे, म्हणून..

- सर्किट

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 9:07 am | विसोबा खेचर

काही काकांनी अजाणतेपणे तुमचे मिसळपावावरून मन उडवले होते, असे ऐकिवात आहे, म्हणून..

चालायचंच! :)

ते काका बगलेत ज्ञानेश्वरी घेऊन असेच धंदे करत मराठी आंतरजालावर नेहमीच फिरत असतात! बाय द वे, आमच्या एका मैत्रिणींने अलिकडेच आमच्याशी केलेल्या लेखनव्यवहारात त्यांचा 'काकाबा महाराज 'असा उल्लेख केला तो मात्र आम्हाला अनवट व अभिनव वाटला आणि आवडला! :)

बाकी संजोपकाकांबद्दल म्हणाल तर शेवटी तेही एक माणूसच आहेत आणि एखाद्या गोष्टीवरून माणसाचं मन तात्पुरतं उडू शकतं! परंतु मूलत: त्यांचं मिपावर आणि मिपाच्या मालकावर मनापासून प्रेम आहे त्यामुळे मिपावरून त्यांचं मन कायमस्वरुपी कधीच उडणार नाही याची आम्हाला खात्री आहे! टेंपरवारी उडाल्यास आम्ही त्यांची समजूत घालू! :)

असो...

तात्या.

सुशील's picture

28 Mar 2008 - 8:59 am | सुशील

सहमत आहे. मलातरी स्टंत वाटत नसला तरी शक्तिप्रदर्शन वाटले. म्हणजे आता तात्या, धोंडोपंत, सर्किट मागे लागले आहेत लिही लिही म्हणून. आता हळूच ते लिहायला सुरू करतील हे नक्की.

केशवसुमार's picture

28 Mar 2008 - 10:09 am | केशवसुमार

शक्तिप्रदर्शन .... हा हा हा..
वा सुशिलशेठ बर्‍याच दिवसांनी आपण इथे लिहते झालत बर वाटल..
चलू द्या..चालू द्या..
(शक्तीमान्)केशवसुमार

विडंबानाशिवाय केशव म्हणजे नुसतेच शव
"के" हे त्याच्या बुद्धीचे नाव....
केशवसुमार्.....तुमचे हे असे शव होउ देउ नका
जोरदार होउ द्या
तुमचा एक सध्या गरगर फिरणारा पंखा.....विजुभाऊ

ऋषिकेश's picture

28 Mar 2008 - 11:26 am | ऋषिकेश

विडंबने लिहिणे आणि मिपावर प्रकाशित करणे बंद करु नयेत ही कळकळीची विनंती.. ज्यांना आवडत नसतील त्यांनी वाचु नयेत. मिपावर विडंबने टाकु नयेत हे का सांगवे हे कळले नाही.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

सुवर्णमयी's picture

28 Mar 2008 - 5:41 pm | सुवर्णमयी

केशवसुमार,
कोण काय म्हणत या पेक्षा तुम्हाला काय करावेसे वाटते याला तुम्ही महत्त्व अधिक दिले असेल आणि हा निर्णय घेतला असेल असे समजते. लिहिणे आणि प्रकाशित करणे दोन्ही बंद करू नका असे म्हणेन. निदान आपण सध्या विडंबने अप्रकाशित ठेऊन ती कालांतराने पुस्तकरूपाने प्रकाशित करावी अशी विनंती. लेट्स होप फॉर द बेस्ट.
लेखनास शुभेच्छा.
सोनाली

प्रियाली's picture

28 Mar 2008 - 6:05 pm | प्रियाली

केशवसुमार,

काल रात्रीची थोडी...... म्हणून हा निर्णय का काय? अहो, लिहा बिनधास्त. ज्यांना नाही वाचायचं ते नाही वाचणार. ज्यांना नाही प्रकाशित करायचं ते नाही करणार. विडंबनात तुम्ही आक्षेपार्ह किंवा उगीच कागाळ्या प्रसवत नाही ना मग झालं तर?

त्यातून तुम्हाला स्वतःलाच तोच तोचपणा वाटत असेल तर तात्पुरते थांबवा!

बरं, तुमची विडंबने कधी पुस्तकरूपाने प्रकाशित केलीत तर पिशाच दिसे बाई पिशाच दिसे हे पहिल्या पानावर टाका. ;-)

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 6:12 pm | विसोबा खेचर

विडंबनात तुम्ही आक्षेपार्ह किंवा उगीच कागाळ्या प्रसवत नाही ना मग झालं तर?

हा हा हा! :)

प्रियाली, तुम नही सुधरोगी! :)

तात्या.

बरे झाले तुम्ही हे लिहिलेत ते....आता लेखन थांबवणार नाही अस पण करावा लागेल
नाहीतरी तुम्ही विडंबने लोकाना अनन्द यावा म्हणुनच लिहित होतात ना

केशवसुमार's picture

28 Mar 2008 - 7:25 pm | केशवसुमार

हा हा हा..
बर झाले .... लिहिले नाही तर प्रतिसादत पण तेच..
(लिहितो तैसा न करणारा)केशवसुमार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2008 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केशवसुमार,विडंबने  लिहिण्याचे थांबवू नये. अहो, आपल्या विडंबनाने आयुष्याच्या रहाटगाड्यातील दोन क्षण आनंदात जातात. लिहा बिनधास्त. ज्यांना नाही वाचायचं ते नाही वाचणार.  आम्ही आपले नेहमीप्रमाणे आपल्या  आवडलेल्या विडंबनाला दाद देत राहू !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ's picture

28 Mar 2008 - 7:36 pm | लिखाळ

आपली अनेक विडंबने चांगली असतात. लिहित रहावे ही विनंती.
--लिखाळ.
सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो करील तयाचे -पुल.

सुधीर कांदळकर's picture

28 Mar 2008 - 8:00 pm | सुधीर कांदळकर

बंदिस्त होऊ नये ही सदिच्छा. टीव्हीचा रिमोट जसा आपल्या हातात असतो तसेच विडंबन न आवडणारे वाचक डोळे बंद करून घेतील. तरीही कृपया देवाधर्मादि संवेदनाशील विषयावर लिहू नये ही केशवसुमारांचे चरणीं प्रार्थना. धर्ममार्तंडांनी सॉक्रेटिसाला,गॅलिलिओला सोडले नाही. तर तुम्हाला सोडतील? सगळेच धर्म आणि धर्मिष्ट, हिंदु देखील असहिष्णु आहेत. गाढवाच्या मागे उभे कधी राहू नये राव.

चांगल्या विडंबनासाठी अनेक शुभेच्छा.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

सर्वसाक्षी's picture

29 Mar 2008 - 12:14 am | सर्वसाक्षी

महाराज,

निर्णय घेतलाच आहात तर एक विनंती. कृपया आपले विडंबन आपल्या जालनिशीवर वा अन्यत्र लिहित रहा/ प्रकाशित करत रहा. (माझ्यासारखे) ते ज्यांना आवडते त्यांना वाचता येईल. न पेक्षा व्यनि ने पाठवा.

बाकी हा महिना संपूदे एकदाचा. आपण प्रत्यक्ष भेटुन एक मस्तपैकी 'विडंबन विशेष' संमेलन करू.

पुढील विडंबनांसाठी शुभेच्छा.

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 12:28 am | विसोबा खेचर

इतक्या लोकांनी एवढं प्रेमाने समजावूनदेखील त्याला केशवाची साधी एका ओळीची पोच नाही, उत्तर नाही, ऍक्नॉलेजमेन्ट नाही याचा खरंच अचंबा वाटतो!

त्याने इतक्या सार्‍या मंडळींचा प्रेमळ आग्रह डावलला आहे आणि डावलला आहे तो आहे, वर शिवाय साधी दोन ओळींची पोचही/उत्तरही तो देत नाही हे पाहून मला व्यक्तिश: खरंच खूप दु:ख वाटले!

मी देखील माझ्या आयुष्यात खूप मोठी माणसे अगदी जवळून पाहिली आहेत, परंतु ती देखील केशवाएवढी मोठी नव्हती असंच आता म्हणायला हवं!!

असो, त्याच्या निर्णंयाचा मी आदर करतो आणि त्याला त्याच्या पुढील वाटचालीकरता मन:पूर्वक शुभेच्छा देतो! (अर्थात, त्याला त्याची गरज नाही, हा भाग वेगळा!)

तात्या.

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 12:30 am | विसोबा खेचर

हा विषय इथेच थांबवावा अशी मी सर्व मिपाकरांना व्यक्तिश: विनंती करतो..

तात्या.

प्रा सुरेश खेडकर's picture

29 Mar 2008 - 9:22 am | प्रा सुरेश खेडकर

अनेक समीक्षक स्वतः एकही ओळ न लिहिता साहित्यिकांना व त्यातल्या त्यात लोकप्रिय साहित्यिकांना व त्यांच्या साहित्याला तुच्छ लेखतात.परंतु कै.म.वा.धोंड(जे नुकतेच वयाच्या ९३व्या वर्षी वारले)याला अपवाद होते.ते लेखकाच्या कलाकृतीला आपल्या समीक्षेपेक्षा मोठे समजत.आपली समीक्षा परिपूर्ण नाही ह्याचे भान ठेवतांना त्यांनी आपल्या समीक्षा पुस्तकाला नाव ठेवले "जाळ्यातील चंद्र". या नावाचे स्पष्टीकरण देतांना त्यांनी ज्ञानेश्वरीतील पुढील ओवी दिली आहे.
"जे जालं जली पांगिले|तेथ प्रतिबिंब दिसे कीरू आतुडले|
मग थडिये काढूनि झाडिले|तेव्हलि बिंब के सांघै ||"
(अर्थात,कोणतेही व्यक्तिमत्त्व किंवा काव्य स्वतःच्या शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समुद्रात जाळे पांगून त्यात आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पकडण्याचा प्रयास करणे.जाळे पांगलेले असेपर्यंत त्यात प्रतिबिंब अडकल्याचा भास होतो.परंतु किना~यावर आणून ते झटकले की त्यातून ते निसटल्याचे आढळून येते.

प्रा सुरेश खेडकर's picture

29 Mar 2008 - 9:44 am | प्रा सुरेश खेडकर

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न.
पहा. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2591450425237531522&...

प्रा सुरेश खेडकर's picture

30 Mar 2008 - 2:02 pm | प्रा सुरेश खेडकर

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा आणखी एक छोटासा प्रयत्न.
पहा.http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2591452877663857538