असंबध्ध
मुंबईच्या लोकल्स लोखंडी असतात..
म्हणुन प्रवासी का एक्मेकाच्या बोकांडी बसतात?
नाहि आज सण तरी भोजनात पुरण वरण..
नाहि वाळवंट तरी का बांधता उरण ला धरण
समुद्रात मासे खुप छान पोहत होते
म्हणुन का रस्तावर कोणी पुस्तके विकत होते?
सत्य नारायणाच्या पुजेला घातला घाट जेवायचा?
आम्हि पण ठरविला आहे बेत डोहाळ जेवणाचा
तुमच्या नातवाच तोंड एकदा आम्हाला पाहु द्या..
अन दुस~या लग्नाचा बार आम्हाला ऊडवु द्या
१३ वा झाला तरी अजुन सुतक उतरत नाहि...
कितिहि साखर घाला बासुंदी गोड होत नाहि
उघडले चपटीचे बुच प्यायला कसा ढस्साढस्सा
चमचा भर ईनो पाण्यात कसा फुलला फस्सा फस्सा
एक पोरगी नाहि पटत ,म्हणे लग्न करा..
विमान मागन पेट्लय.लवकर आकाशात उडी मारा
पायजम्याची नाडी तुटली म्हणुन पायजमा फेकत नाहित
टी.व्ही चि ऍटेना तुटली मह्णुन कुणी इस्त्री विकत घेत ना
प्रतिक्रिया
10 Nov 2009 - 9:53 am | बाकरवडी
वा वा.......मस्तच!!!!
ह्यावरून हे आठवलं :- "कशी वाटली.....????घ्या ना........... कविताये हो!!!!!!"
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
10 Nov 2009 - 1:34 pm | अविनाशकुलकर्णी
होय प्रेरणा स्त्रोत तेच आहे
10 Nov 2009 - 8:34 pm | बाकरवडी
तुमची ही कविता द्या पाठवून 'कॉमेडी एक्स्प्रेस'वाल्यांना. ते कार्यक्रमात समाविष्ट करतील आपल्या कविता. :)
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
10 Nov 2009 - 3:54 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता शीर्षकाला जागली. अभिनंदन. बाय द वे... शीर्षकही असंबध्ध असे लिहिल्यामुळे असंबध्दच आहे. असा दुग्धशर्करा योग क्वचितच जुळून येतो.
वा!!! वा!!! छान!!! छान!!!
बिपिन कार्यकर्ते
10 Nov 2009 - 4:06 pm | टारझन
तात्यांनी हे संस्थळ कवीजींच्या नावावर करून द्यावं अशी मी त्यांना जाहिर विनंती करतो !!
- (असंबंद्धीत) टारझन
10 Nov 2009 - 4:21 pm | गणपा
खर सांग अविनाश काल तैंच्या किती कविता वाचल्यास. ;)
10 Nov 2009 - 6:29 pm | वेताळ
होते कधी कधी असे...........डाटा सरमिसळ झाला आहे.
वेताळ
10 Nov 2009 - 8:45 pm | सूहास (not verified)
मुंबईच्या लोकल्स लोखंडी असतात..
म्हणुन प्रवासी का एक्मेकाच्या बोकांडी बसतात? >>>
ते ठाण्याच्या लोकांना ईचारा ब्वा !!! प्रवासी म्हणुन माहीत नाही पण बोकांडी बसायचा बराच अनुभव आहे !!
बघ आहे की नाही कविताप्रेरित असंबधित प्रतिसाद...
सू हा स...