केशवसुमरांपासुन प्रेरणा घेवुन माझा हा एक विडंबनचा प्रयत्न
मूळ लेखन : "पाउस पडुन गेल्यावर" (गारवा)
पाउस ही संकल्पना बदलुन धुन्दि (अर्थात दारुची) ही संकल्पना धरुन हा विडंबनचा प्रयत्न
धुन्दी डोक्यात गेल्यावर, तन हलके हलके झाले
स्वर्गाच्या वाटेवरती, नभात तरंगत गेले
बाटलिला कवटाळलेल्या, त्या अत्रुप्त घोलक्याचा
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी या त्रुप्त बेवड्यांचा
धुन्दी डोक्यात गेल्यावर, हे विचार मस्त मोहाचे
मेंदुला डावलून आल्या, त्या सुप्त अंनंत इच्छांचे
सोडुन लाज सारी, पाउले ही लडखडति
धुन्दी डोक्यात गेल्यावर, त्या ओजाड रस्त्यांवरती
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी भ्रांत चित्त हरपलेला
रिझवुन मदीरा सारी, पेंगाळलेला सैतान जागा झालेला
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मन लसलसता लाव्हा
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मन झुलझुलता झुलवा
प्रतिक्रिया
26 Mar 2008 - 2:06 pm | विसोबा खेचर
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मन लसलसता लाव्हा
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मन झुलझुलता झुलवा
वा! क्या बात है.. वरील ओळी आवडल्या..!
आपला,
(धुंद) तात्या.
अवांतर - चेतनराव, आपला लॉगईन आयडी कृपया देवनागरीत करावा ही विनंती...
आपला,
(मराठी) तात्या.
26 Mar 2008 - 2:17 pm | चेतन
धन्यवाद तात्या
आपली सुचना अमलात आणली
(धुंद पण न पिणारा) चेतन
26 Mar 2008 - 3:23 pm | प्रमोद देव
विडंबनांचा महापूर आलाय इथे आणि त्या बहुसंख्य विडंबनांमध्ये "दारू" वरच भर आहे.
तेव्हा आता मिसळपावचे नाव बदलून "मिसळपाव बार" असे ठेवावे म्हणतो. :)))))
समस्त विडंबनकारांना हात जोडून प्रार्थना की त्यांनी जरा इतर विषयही हाताळावेत.
अहो आमच्यासारख्या " न पित्यां"ना तुमच्या नुसत्या विडंबनांनीही "चढायला" लागलेय हो!
तेव्हा जरा आमचीही काळजी घ्या म्हणतो मी! :))))
26 Mar 2008 - 7:15 pm | चतुरंग
एकेका फॅशनची लाट असते ना तशी सध्या विडंबनांची आहे.
फर्मास विडंबने वाचून सुरसुरी येतेच काही नवल नाही.
पोट्ट्यांना प्रयत्न तरी करु दे ना. तुम्ही त्यांच्या उत्साहावर पाणी टाकू नये असे वाटते.
आपसूक गाड्या वळणावर येतात हलकेच, थोडं सबुरीनं!
चतुरंग
26 Mar 2008 - 8:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विडंबनांचा महापूर आलाय इथे आणि त्या बहुसंख्य विडंबनांमध्ये "दारू" वरच भर आहे.
सहमत आहे, मिपावर वेगवेगळ्या साहित्याचा लाटा यायला पाहिजे. ते कधी कधी होत नाही. चारोळ्या तर चारोळ्याच येतील. विडंबने तर विडंबनेच येतील. मद्य तर मद्यच येईल.या विडंबनाच्या लाटांनी आमच्या भावनांचा, रसिकतेचा पार चोथा झाला आहे. :)))))
( अर्थात काही विडंबने दर्जेदारच असतात )
काही दिवस विडंबने आणि कविता/चारोळ्यांवर सरपंचानी बंदी घातली पाहिजे.
किंवा नीलकांतला सांगून 'काव्य' दिसणार नाही, अशी सोय करुन घ्यावी म्हणतो !!!! :)))
आपला
प्रा.डॊ. दिलीप बिरुटे
(शबनम मधे कवितेची वही घेऊन श्रोता शोधणारा )
27 Mar 2008 - 11:42 am | चेतन
गारवा ऐकता ऐकता लहर आली म्हणून हा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न केला. फर्मास विडंबन लिहायला मी केशवसुमार नाही, आम्ही ज्या वर्गात आहोत त्याचे ते हेडमास्टर आहेत. अर्थात मलाही दारूचा तिटकारा आहे पण हा साधा विषयही कोणाच्या घशाशी येत असेल याची कल्पना नव्हती. यापुढे जणीव राहील क्षमस्वः
( धुंदी उतरलेला) चेतन
27 Mar 2008 - 9:13 pm | सुधीर कांदळकर
बाटलिला कवटाळलेल्या, त्या अत्रुप्त घोलक्याचा
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी या त्रुप्त बेवड्यांचा
मी चुकून (दारू नपिता) 'पोलक्याच्या' वाचले. आणि चक्रावलो. हे काय भलतेच?
जरा बरोबर घोळक्याच्या लिहा राव. पण पहिल्या प्रयत्नात चांगले जमले. इतर विषयच निवडावेत. बाई बाटली नको.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
28 Mar 2008 - 11:39 am | चेतन
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद
मी चुकून (दारू नपिता) 'पोलक्याच्या' वाचले. आणि चक्रावलो. हे काय भलतेच?
"चोराच्या मनातं चांदणं"
असो...
या पुढे चूकं सुधारण्याचा प्रयत्न राहीलं...
चेतन