मनांत माझ्या फ़ुलून आल्या
रातराणीचा सुवास तू
रंगबिरंगी वसंत फ़ुलांची
ओंजळितली रास तू
क्षणैक खांद्यावरी विसावे
तो असा निश्वास तू
मित्रत्वाच्या नात्यामधला
तो अभंग विश्वास तू
अखंड कोसळणार्या झिरमिर
चिंब सरींचा न्यास तू
क्षितिजावरती रंगलेली
सुवर्णाची आरास तू
डोळे मिटूनी तुला पहावे..
भास तू आभास तू
तुझ्याविना मी कसे जगावे
सांग!.. माझा श्वास तू
प्रेमवेड्या या मनाला
लागलेला ध्यास तू..
प्रणयातील उत्कटतेचा
अगळा उल्हास तू
पुढे पुढेच जात रहावे
न संपणारा प्रवास तू
कधी वेंधळा, कधी प्रगल्भ
जन्मोजन्मी हवास तू..
- प्राजु
प्रतिक्रिया
22 Oct 2009 - 8:00 pm | अनिल हटेला
जीयो.................:-)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
22 Oct 2009 - 8:04 pm | क्रान्ति
अखंड कोसळणार्या झिरमिर
चिंब सरींचा न्यास तू
वा! मस्त कल्पना! खूप सुरेख वर्णन! :)
क्रान्ति
अग्निसखा
22 Oct 2009 - 8:12 pm | प्रभो
डोळे मिटूनी तुला पहावे..
भास तू आभास तू
तुझ्याविना मी कसे जगावे
सांग!.. माझा श्वास तू
जबहरा
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
22 Oct 2009 - 8:58 pm | मदनबाण
सुंदर कविता... :)
मदनबाण.....
रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
22 Oct 2009 - 10:13 pm | Dhananjay Borgaonkar
अरे वा..क्या बात है..
बर्याच दिवसांनी दर्शन झाल प्राजुताई..
22 Oct 2009 - 10:32 pm | अक्षय पुर्णपात्रे
कविता. आवडली.
अवांतर: प्राजु, मला खरड लिहिण्याची अनुमती नसल्याने उत्तर देता येत नाही. खरडीबद्दल धन्यवाद.
23 Oct 2009 - 12:23 am | बेसनलाडू
छान आहे.
(आस्वादक)बेसनलाडू
23 Oct 2009 - 8:20 am | दशानन
छान कविता :)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
23 Oct 2009 - 10:42 am | शाल्मली
सुंदर कविता!
अखंड कोसळणार्या झिरमिर
चिंब सरींचा न्यास तू
क्षितिजावरती रंगलेली
सुवर्णाची आरास तू
मस्त कल्पना... कविता आवडली.
--शाल्मली.
23 Oct 2009 - 11:43 am | दिपाली पाटिल
पुढे पुढेच जात रहावे
न संपणारा प्रवास तू
कधी वेंधळा, कधी प्रगल्भ
जन्मोजन्मी हवास तू..
हे माझ्या "ह्यां"साठी अगदी बरोब्बर लिहीलंय... :X ;;) :X
दिपाली :)
23 Oct 2009 - 6:57 pm | मॅन्ड्रेक
सुंदर कविता!
at and post : janadu.
23 Oct 2009 - 8:41 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार. :)
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/
24 Oct 2009 - 8:24 am | सुबक ठेंगणी
ह्या ओळींसाठी =D>
क्या बात है!
24 Oct 2009 - 7:10 pm | लवंगी
क्षणैक खांद्यावरी विसावे
तो असा निश्वास तू
मित्रत्वाच्या नात्यामधला
तो अभंग विश्वास तू
सुरेख
24 Oct 2009 - 7:37 pm | अनुप्रिया
अतिशय सुंदर कविता प्राजु ! =D> =D> =D>
24 Oct 2009 - 7:37 pm | अवलिया
वा ! मस्त !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.