स्वप्न

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
21 Oct 2009 - 4:42 am

स्वप्न(चाल: एखादी शालेय कविता)
स्वप्नामध्ये आज पाहीले सुंदर खासे तळे
बदक पांढरे, हिरवी झाडे, सुंदर पाणी निळे        || ध्रू ||

      होत्या बोटी, छोटी बेटे
             महाल होता पलीकडे
      त्यावर होती, चमकत नक्षी
             स्वर्गच भासे मला गडे
गुं गुं करतो भ्रमर सानूला, पाण्यावरती तरती कमळे        || १ ||

      निळे आभळ वरती वरती
             सुर्यकिरण हे सोनेरी झरती
      पक्षांची जाय उडत रांग
             आनंदाला येतसे भरती
होवुनी स्वार वार्‍यावरती मन माझे हे पळे        || २ ||

      मउशार त्या गवतामध्ये
             लाल गुलाबी फुले उमलली
      फुलपांखरे रंगबीरंगी,
             उडे तयांच्या अवतीभवती
बघण्या संदर देखावा हा नजर माझी वळे        || 3 ||

कविता

प्रतिक्रिया

शेखर's picture

21 Oct 2009 - 5:47 am | शेखर

छान बालकविता आहे...
शेखर

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Oct 2009 - 6:23 am | llपुण्याचे पेशवेll

दगडफोड्याभाऊ,
लै भारी कविता. आवडली.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

पाषाणभेद's picture

21 Oct 2009 - 9:50 am | पाषाणभेद

धन्यवाद, शेखराण्णा व पुपे.
नंतर कविता वाचणार्‍यांनाही आधिच धन्यवाद.

एक सांगतो:
कविता चालित म्हणतांना पहिले कडवे निट जमत नाही. काही शब्द जास्त झालेत. प्रयत्न करूनही मला जमलेले नाही.

आपण सहज चाळा म्हणून प्रयत्न करू शकतात. काही सुचना असेल तर सांगा.

प्रमोद काकांना पहिले कडवे चालीत लावण्यासाठीचा हा एक प्रश्नपत्रिकेसारखा प्रश्न पण असू शकतो!

--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं नौकरी पाने जाना है? हमे कन्टॅक करें |)

प्रमोद देव's picture

21 Oct 2009 - 9:57 am | प्रमोद देव

होत्या बोटी, छोटी बेटे
महाल होता पलीकडे
त्यावर होती, चमकत नक्षी
स्वर्गच भासे मला गडे
गुं गुं करतो भ्रमर सानूला, पाण्यावरती तरती कमळे

ह्या कडव्यातील शेवटच्या ओळीतील....पाण्यावरती...मधील 'ती' काढून टाकला की कमळं 'पाण्यावर' नीट तरायला लागतात. :)

कुणी निंदा,कुणी वंदा!
आमचा चाली लावण्याचा छंदा!!

फ्रॅक्चर बंड्या's picture

21 Oct 2009 - 9:55 am | फ्रॅक्चर बंड्या

छान आहे कविता

विशाल कुलकर्णी's picture

21 Oct 2009 - 10:14 am | विशाल कुलकर्णी

वाहवा दफोभाऊ मस्त ! :-)
देवबाप्पांच्या सुचनेवर विचार करायला हरकत नाही. मी सहमत आहे.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पाषाणभेद's picture

21 Oct 2009 - 10:27 am | पाषाणभेद

"गुं गुं करतो भ्रमर सानूला, पाण्यावरती तरती कमळे "

काकांची सुचना शिरोधार्ह.

पण मला
गुं गुं करतो भ्रमर सानूला, पाण्यावर(/ती) कमळे
--- ---- ---- ----- ----------- -----
१      २      ३      ४            ५            ६(शब्द)
असे करावे वाटले.

कारण बाकीच्या ही कडव्यात (मुख्य) ६च शब्द आहेत.

अजुन काही सुचना?
--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)