पुन्हा सख्या नववधू होऊनी आली दिवाळी दाराशी
इंद्रधनूचे रंग वेचुनी रेखिली रांगोळी मी खाशी
इवल्या इवल्या पणतीतून स्पर्धा नभीच्या तार्यांशी
गंध खमंग फराळातला.... प्रीत तोलतो हाताशी
उल्हासाची पखरण भवती, आतिशबाजी आकाशी
तुझी लक्ष्मी तुझ्या स्वागता उभी बावरी उंबर्याशी
.....
.........
तुझ्याएवजी निरोप आला....... काळोखाच्या घनराशी
मोरपिशी पदराने रोखते... जळता हुंदका ओठाशी
विखुरलेल्या रंगावली या, कुणी मिळवले अभिरासी ?
तव नामाची इवली पणती... ज्योत उडाली आकाशी
अर्ध्यावरती डाव मोडता... प्रीत एकली उपवासी
मिटले कुंकु.. फुटले कंकण... जुळले नाते मातीशी
.....
........
निरोप देऊ द्या सखयाला
जरा जाऊन त्यांच्यापाशी
शेवटचे हे अभ्यंगस्नान
मज उटणे लावु द्या गालासी
(ऐन दिवाळीत, नरकचतुर्दशीला, ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेने व्यथित असलेल्या त्यांच्या स्वजनाना व दिवाळीच्या काळ्या आठवणी घेऊन जगणार्या तमाम बंधू भगिनींना समर्पित !!!)
प्रतिक्रिया
20 Oct 2009 - 1:22 pm | मसक्कली
:| छान आहे...
मनाला भिडलि अगदि.... 8|
लिखान छान झालय.. =D>
20 Oct 2009 - 10:02 pm | विदेश
तुझी लक्ष्मी तुझ्या स्वागता उभी बावरी उंबर्याशी...
तुझ्याएवजी निरोप आला....... काळोखाच्या घनराशी
खिन्न झालो..कसला प्रतिसाद नि काय !
21 Oct 2009 - 12:50 am | प्राजु
बापरे!! का रे बाबा अशी कविता अगदी ऐन दिवाळीत !!
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/
21 Oct 2009 - 10:02 am | विशाल कुलकर्णी
बापरे!! का रे बाबा अशी कविता अगदी ऐन दिवाळीत !!>>>
प्राजु, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील एका दुर्घटनेत फायरब्रिगेडचे सहा जवान आपले कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडले.
त्यांना वाहीलेली श्रद्धांजली आहे ही.
कौतुक....
:-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
21 Oct 2009 - 3:03 pm | गणपा
हेलावुन गेलो. :(
21 Oct 2009 - 4:37 pm | दशानन
मी ही :(
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....