!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक २

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
24 Mar 2008 - 9:16 pm
गाभा: 

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!चौक २
ऐका पुढील व्रुतान्त जी जी जी र जी जी जी र जी जी जी
ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या
मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले.
उत्तर पेशवाईत पानपतात व्हावी तैसी भांडी वाजो लागली.भडभुंज्या लाह्या भाजतो तैसे चोहोकडोन आवाज कानी येवो लागले.
ये कानाचे त्या कानास कळो नये ऐसी गत.
घोडी भीजो लागली..वर्तमान दफ्तर हलवावे ऐसे फर्मान निघो लागले.
समस्त दारुगोळा कोठारातुन सावकाशीने बाहेर येवु लागला होता. सरदार धमाल स्वतः जातीने दारुगोळा वाटपात कोणावर अन्याव होवो नये याची सर्वत्र फीरोन दखल घेत होते.
तेवढ्यात दस्तूर खुद तात्या भ्रमण्ध्वनीवर सदस्यांच्या भेटीस आले.....आकाशवाणी व्हावी तैशा त्यानी कट्ट्यास शुभेछा दिल्या.
एक एक भिडु रन्गी येवु लागला....राज कवी सरदार केशव्सुमार हळुच एखांदी कवीतेची फैर झाडत होते.त्या एकेका फैरीनेच सद्स्य गारद होत होते.
येवढ्यात सरदार विजुभाऊंचे आगमन झाले...पुन्हा एकदा तडीताघात झाला...नंगारा वाजावा तैशा मेघ गर्जना झाल्या.
सरदार विजुभाऊ नी सरदार धमाल मुलांस हळी घातली...आणि जेजाल्या प्रंमाणे भासणारी वीज पुन्हा गरजली.....मिपा कट्ट्यास तोफांची सलामी मिळाली.
ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात जी जी जी र जी जी जी र जी जी जी
म्हणे शाहीर विजुभाऊ..मिपा सदस्य होउ...
व्रुतान्त मी सांगणार्..तुम्ही ऐकणार ..रन्ग तो चढणार रं जी जी जी
धन्य धन्य झाला तो सरदार जी जी जी जी जी जी र जी जी जी
आर रं दाजी जी जी रं दाजी जी जी र जी जी जी र जी जी जी
ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात ( हा बखरी तला चौक आहे...प्रस्तुत लेखकाने हा शब्द फकस्त पवाड्यातच ऐकला आहे..वाद नको)
म्हणे शाहीर विजुभाऊ सर्वांस जी र जी र जी र जी जी जी जी
....आद्य बखरनवीस्.....विजुभाऊ कलमदाने....

( मि पा पुणे पहीला कट्टा सहसंवादःचर्चा ठराव्....बखरीच्या पूढील भूर्जपत्रावर)

प्रतिक्रिया

झकासराव's picture

24 Mar 2008 - 9:29 pm | झकासराव

ऐसेची एक बखरकार होउनी गेले त्यांचे नाव भाउ
आणि मिसळपावचे बखरकार आहेत विजु भाउ :)
बखर कारांचे कसब दिसुन येत आहे.
वाचुन संतोष जाहला.
आमच्या मनास तिथे जातीने हजर राहुन अजुन संतोष जाहला असता पण
आमच्या मोहिमेने आमचा घात केला.
त्या दिवशी आम्ही आमच्या कार्य क्षेत्री सायंकाळी ७ पर्यंत लढत होतो.
तिथुन घरी गमन करता करताच ध्यानात आले की जलधारानी सगळ्या पुणे सुभ्याला न्हाउ घातल्य.
अजुन देखील वर्षावाची आशंका होतीच.
शिवाय आमच्या वास्तु पासुन कट्टा स्थळ अमंळ लांबच होते. (निगडी ते कात्रज)
त्यात आमची घोडी जास्त न पळणारी (१०० सीसी ची दुचाकी)
म्हणून अत्यंत नाइलाजाने न येण्याचा निर्णय घ्यावा लागला. :(
चला आता जाणे शक्य नाही तर भ्रमणध्वणी वर बोलुन घ्यावे म्हणून प्रयत्न केला तर इथेहि नशीब आड...
आम्ही धमाल मुलगा (कट्ट्याचे कार्यप्रवर्तक सरदार) यांचा क्रमांकच साठवुन ठेवला नव्हता. :(
एक संधी तर गेली. :(

विसोबा खेचर's picture

25 Mar 2008 - 9:25 am | विसोबा खेचर

विजूभाऊ,

हा चौक स्वतंत्र लिहिल्याबद्दल धन्यवाद...

पुढच्या भागाची वाट पाहतो आहे...

तात्या.

धमाल मुलगा's picture

25 Mar 2008 - 11:08 am | धमाल मुलगा

मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले.
वाहवा विजयरावभाऊ, आपल्याजैसे बखरनविसा॑चे हातोन खुद्द मिपाकट्ट्याची धुमश्चक्री अति साद्य॑त वर्णने समस्त स्वराज्ये समस्त सरदार, प॑डित आणि प्रजाजना॑चे मनि जैसीचे तैसी उतरोन पावते आहे.
मेहेरनजर स॑त तात्याबा या॑चे बोल मनि धरोन सत्वर पुढील चौक सादर करणे ऐसी विन॑ति विशेष.

सरदार झकासराव या॑ची अनुपस्थिती नक्किच जाणविली. पर॑तु, खुद्द त्या॑च्या गडावरी गनिमाच्या हल्ल्या॑सि तो॑ड देता देता त्या॑चे येणे मुश्किल जाहले हे उमजोन मनि दु:ख दाटले.
असो,
सरदार झकासराव या॑सी,
आपला भ्रमणध्वनि क्र. आमचे ठायी देखिल नसल्याकारणे आम्ही आपणाशी वार्ता करु शकलो नाही....क्षमस्व.
तरि आपण आपला भ्र.क्र. कळविल्यास येत्या घातवारी पुन्हा जमणे ठरते असल्याचे आपणास स्थळ-काळ कळवणे सोपे जाईल.

आपला,
सरनौबत धमालराव.

विजुभाऊ's picture

25 Mar 2008 - 1:55 pm | विजुभाऊ

सरनौबत धमालराव.
मी त्याना भ्रमण्ध्वनी काल केला

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Mar 2008 - 2:04 pm | डॉ.प्रसाद दाढे

सरनौबत धमालराव देशमुख, मिपा-कट्टा परत कधी आणि कुठे भरविणार आहात?अगोदर सा॑गा म्हणजे आम्हा॑स आमच्या रूग्णा॑च्या वेळा मागे-पुढे करता येतील.
आपला,
(प॑चहजारी मनसबदार) प्रसादसि॑ह ह॑बीरराव

धमाल मुलगा's picture

25 Mar 2008 - 2:19 pm | धमाल मुलगा

श्री.रा.रा. सकळवज्रम॑डित मनसबदार, खिताब-ए-ह॑बीरराव, प्रसादसि॑ह या॑सी,

येते घातवारी पुन्हा फौजा जमवोन येखाद्या दुर्लक्षित-उपेक्षित गडावर ऐन कातरवेळेसि हाति धरोन हल्ला बोलणे घाटते आहे!

शहेनशाह-ए-ब॑गळूरिस्थान छोटा डॉन गुजरातेतील मुलुखगिरीचे स्वारीवरोन परतीचे प्रवासि निघाले असल्याचे गुप्तहेरा॑करवि समजते. पुणे परगण्यातील कात्रज जहागिरीचे वतनदार श्री.रा.रा. आन॑दयात्रीसाहेब ह्या॑चेशी घडलेल्या कालच्या स॑वादानुसार सर्व फौजा परतून कल्लोळ माजविणेस तैय्यार-होशियार असल्याचे समजते.

लवकरच आपणा॑स स्थळ काळ कळविणेचि सोय मा॑डतो.

इये लेखन मर्यादा.
-सरनौबत धमालराव.

इनोबा म्हणे's picture

25 Mar 2008 - 2:15 pm | इनोबा म्हणे

जरा मोठे भाग लिहा की राव.
बाकी बखर आहे अगदी फर्मास... उत्सुकता वाढली

विजुभाऊंचा विजय असो!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विजुभाऊ's picture

27 Mar 2008 - 1:33 pm | विजुभाऊ

ईर्षाद....एका मित्राला हे सगळे सलग पहायचे आहे