मंडळी आजही आम्ही बुधवार सत्कारणी लावण्यासाठी आलो. पण ४ दिवसाच्या सक्तिच्या उपासामुळे आमची अवस्था काहीशी अशी झाली आहे. सांगा आता काय करायचे?
लेखन विपुल आहे, पण पेच हाच आहे
हातात लेखणीही, पण दौत आत आहे
येईल कुठून उर्मी,जर बार ड्राय आहे
आरक्त वारुणीही, फक्त दोन पेग राहे
मध्येच येई पोलिस, बाजार बंद होतो
राजास सामिषाच्या, मोताद होई अंडे
जाई फिरुन तेथे,पण निराळेच थेर
मुजर्यास नेहमीच्या,आचारबंदी आहे
उत्साहपूर्ण बुधवार, येई पुन्हा पुन्हा का?
आजच करा हवे ते, उद्या गुरुवार आहे
प्रतिक्रिया
14 Oct 2009 - 3:26 pm | अवलिया
समजु शकतो तुमच्या भावना.
काही मदत करु का?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Oct 2009 - 3:36 pm | प्रभो
येईल कुठून उर्मी,जर बार ड्राय आहे
यामुळे हा बुधवार थोडा फिका पडला रे पुप्या.....६० चा ९० कर ना भौ.....
--प्रभो
14 Oct 2009 - 3:30 pm | धमाल मुलगा
पेशवे..पेशवे अहो काय हे?
साक्षात तुम्हाला अशी करुण 'दारु'ण कविता करावी लागावी??? हा हन्त् हन्त्!
असो...आता लग्न करा म्हणजे असे विचार डोक्यात येणार नाहीत... :)
14 Oct 2009 - 3:32 pm | llपुण्याचे पेशवेll
>>असो...आता लग्न करा म्हणजे असे विचार डोक्यात येणार नाहीत..>>
धमालराव,
तुम्ही आमचे मित्र का शत्रू ते आधी सांगा. उगाच असले सल्ले देताय ते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
14 Oct 2009 - 3:33 pm | अवलिया
शत्रु का?
पेशव्यांना मस्तानीचा राग का?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Oct 2009 - 3:35 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो ते लग्नाबद्दल बोलत आहेत मस्तानीबद्दल नाही.. असो. अधिक चर्चा खरडवहीत. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
14 Oct 2009 - 3:40 pm | प्रभो
गुजरांची मस्तानी इतरांसारखी पेशव्यांना पण आवडली नसावी बहुतेक...
--प्रभो
14 Oct 2009 - 3:37 pm | सहज
काव्य नियमित
पेशवे लिहीत
असुद्या लक्षात
बुधवार
14 Oct 2009 - 3:44 pm | अवलिया
पुपेच्या काव्याला
असेच म्हणतो
सहमत होतो
सहजशी
'सहज'ही बघा
कवी झाला भारी
तीर्थ बुधवारी
प्राशुनीया
अंमळ अबोल
'सहज' लाजाळु
बघा लागे बोलु
भडाभडा
म्हणुन म्हणतो
येता बुधवार
कराहो स्विकार
प्रसादाचा
'नाना' म्हणे 'तात्या'
तुम्ही काहो गप्प
कैसा मेंदु ठप्प
तुमचाही
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Oct 2009 - 3:47 pm | llपुण्याचे पेशवेll
=))
=))
मेजवानीमधे
नानाही शरीक
खाओनी खारीक
उभा राही
सोडोनिया साधे
नेमबाजी नेक
सोडीतो अनेक
काव्यबाण
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
14 Oct 2009 - 4:05 pm | प्रभो
आला बुधवार
करी पुप्या कविता
सर्वजणे वाचती
** खाजविता
** च्या जागी हवे ते भरा (उदहरणार्थ : डोके, बेंड)
--प्रभो
14 Oct 2009 - 3:36 pm | संजीव नाईक
काय पेशवे मंडळी पुण्यात जी मजा असते ती त्यां बंगलुर मधे नसते
ती थे जिलबीचे फळे आणि इथे विनोदाचे फळे
बंगलुर सोडून पुण्यात कधिआलात आपण?
संजीव
14 Oct 2009 - 6:59 pm | सूहास (not verified)
=)) =)) =)) =))
खेळ मांडियेला मिपाटवाळवंटी बाई !!
नाचती मालक ,टाळ्या पिटी श्रावणभाई ग!!
घमेल्यात : जोरात आहे बुधवारचा बाजार..
सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
14 Oct 2009 - 6:53 pm | टारझन
कसल्या पाण्चट कविता करतो रे फोकल्या ... साल्या ना वृतं ना छंद .. अंमळ मंद कविता आहे. कुठे तरी मधेच ते "अंड" ठेवलं आहेस .. कैच्याकैच !!
-(अँटिप्रतिसादप्रसवक) टारझन
च्यायला , ह्या पेशव्याचा कोदा झालाय .. काय मागे लागतो प्रतिसादासाठी :)
आघाव सल्ला : "बुधवारची कविता" असल्या पाण्चट कविता करण्यापेक्षा पेशव्यांनी "बुधवारातल्या नमिथां"चे रसभरीत गुणवर्णन करावे .
14 Oct 2009 - 6:57 pm | दशानन
कोदा व्हायरस वाढतच आहे ;)
>>कसल्या पाण्चट कविता करतो रे फोकल्या ... साल्या ना वृतं ना छंद .. अंमळ मंद कविता आहे
अंमळ मंदच आहे कविता .. असे लिही रे टार्या...
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
14 Oct 2009 - 6:58 pm | प्रभो
>>कसल्या पाण्चट कविता करतो रे फोकल्या ... साल्या ना वृतं ना छंद .. अंमळ मंद कविता आहे. कुठे तरी मधेच ते "अंड" ठेवलं आहेस .. कैच्याकैच !!
=))
सोम्या-गोम्या कवी टार्याचे अँटिप्रतिसाद :)
बाकी टार्याच्या आघाव सल्लाला +१
(टार्याचे आघाव सल्ले पुप्याला परत देणारा) प्रभो