महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंदाज २००९

उग्रसेन's picture
उग्रसेन in काथ्याकूट
10 Oct 2009 - 9:23 pm
गाभा: 

महाराष्ट्रात येत्या तेरा तारखेला विधानसभेसाठी मतदान होतंय. प्रचार उद्या संपेल. आता मतदारापर्यंत कसं पोहचायचं तेवढाच प्रश्न शिल्लक उमेदवाराच्या मनात राह्यलाय. तन-मन-धन ही गोष्ट हायेच. २८८ जागांसाठी मतदान झाल्यानंतर मतमोजणी २२ तारखेला होणार. सत्तेच्या साठमारीत कोणाची सत्ता येईल. एवढाच एक उत्सुकतेचा प्रश्न राह्यलाय. प्रश्न, महागाई, जाहीरनामे,समस्या,जिथे असतात तिथेच असतात. मंत्र्याचा, आमदाराचा, विकास झाल्यावर थोडा फार जनतेचा विकास होतो नाय का ?

आपला अंदाज असा हाये की, महाराष्ट्रात सत्ता पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीची येईन. सध्याच्या सरकारावर जनता नाराज हाये म्हणजे ती काय भाजप-सेनेवर खूश आहे असा त्याचा काय अर्थ होत नाय. मतदार राजा कोणालाबी मतदान करु शकतो. मनसेलाबी मतदान करीन नाय तर रिडालोस ला करतीन. पण सत्ता कोणाची येईन हे काय सांगता येणार नाय. कोणाच्या मतदानाचा कोणाला फायदा होईन आण कोणता पक्ष सत्तेवर यीन. आपापला अंदाज इथे सांगायचा आन कारणबी सांगाचं ?

माहा आंदाज असा-

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची=१४०-१६०
शिवसेना-भाजप=९०-१२०
मनसे =१२-२०
रिडालोस =०६-१०
अपक्ष -=१०-२०
इतर =१०

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

10 Oct 2009 - 9:57 pm | चिरोटा

अंदाज सांगायला कारण पाहिजे? मुंबई,ठाणे,नाशिक्,पुणे,कोल्हापूर,रत्नागिरी,सिंधुदुर्ग ह्या पलिकडे मी महाराष्ट्र पाहिलेला नाही. तरीही हा अंदाज-
कॉंग्रेस-राष्ट्रवादीची=१२०-१३०
शिवसेना-भाजप=८५-९०
मनसे =३५-४०
रिडालोस =१५-२०
अपक्ष -=१०
इतर =४
भेंडी

क्ष्^न + य्^न = झ्^न

विष्णुसूत's picture

10 Oct 2009 - 10:15 pm | विष्णुसूत

हंग अ‍ॅसेंब्ली चा स्वैर अनुवाद म्हणजे तरंगती विधानसभा.
कारण:
मतदानाची तारीख : १३
मतमोजणी तारीख : २२
१+३+२+२ = ८
एकुण जागा = २८८ ( ह्यात दोन ८ आहेत आणि शिवाय पुढे २ आहे !)
८ हा फार घातक आकडा आहे ( आकडे वाल्यांना हे माहित असेल)
त्या मुळे ह्या निवडणुकित घात होणार ! कोणाचा घात? महाराष्ट्राचा?
मराठिचा ? मतदाराचा ? का उमेदवारांचा ?
हे सांगण आत्ता तरी कठिण आहे.
जाणकारांनी प्रकाश टाकावा

सुहास's picture

11 Oct 2009 - 12:28 am | सुहास

हंग अ‍ॅसेंब्ली चा स्वैर अनुवाद म्हणजे तरंगती विधानसभा.

त्रिशंकू विधानसभा ही चालेल..

कोणाचा घात? महाराष्ट्राचा?
मराठिचा ? मतदाराचा ? का उमेदवारांचा ?

घात आधीच झालाय या सर्वांचा... गेली १५ वर्षे घातच चालू आहे..

असो, कालच्या "पुढारी" मध्ये बातमी होती, जरा नजरेखालून घाला..

http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=54110&boxid=214117765&pgno=1

सुधीर काळे's picture

13 Oct 2009 - 10:39 pm | सुधीर काळे

विष्णुसुतसाहेब,
<<८ हा फार घातक आकडा आहे>>
मी चिनी वंशाच्या पण इंडोनेशियन नागरिक असलेल्या लोकांबरोबर काम करतो व चिनी लोक '८' हा आकडा अतीशय शुभ व भाग्यदायी समजतात. म्हणूनच बेजिंगचे ऑलेंपिक ८ ऑ. २००८ ला (०८-०८-०८) सुरू झाले. ८-८-८८ ला विक्रमी संख्येने चिनी युगुले विवाहबद्ध झाली होती.
जितका ८ हा आकड प्रिय तितकाच ४ आकडा नावडता.
याचे कारण असे की चिनी चित्रलिपीत '४'ची जी "कांजी" आहे (alphabet, पण असे म्हणणे technically बरोबर होणार नाहीं कारण या 'कांज्या' alphabets नसतात) तिचा दुसरा अर्थ मृत्यू, शेवट, नष्ट असा होतो तर '८'ची जी कांजी आहे तिचा दुसरा अर्थ जन्म, उगम, सुरुवात असा होतो.
म्हणून चिनी लोक आपल्या गाडीच्या नंबरप्लेटवर मिळतील तितके ८ आणण्याचा प्रयत्न करतात व त्यांच्या नंबरप्लेटवर ४ आकडा कधीच नसतो! (इथे पैसे देऊन हवा तो नंबर घेता येतो)
"सुबक ठेंगणी"मॅडम जास्त प्रकाश पाडू शकतील!
तेंव्हा विधानसभेचं जे काय व्हायचं ते होईल, पण बिचार्‍या ८ला दोष नका देऊ. नाहीं तर चीन रुसेल. हाहाहा!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सुबक ठेंगणी's picture

14 Oct 2009 - 5:36 pm | सुबक ठेंगणी

जपानातही ७ हा आकडा शुभशकुनी समजला जातो. इथे नंबरप्लेटमधे जास्तीतजास्त वेळा लकी सेव्हन कसा येईल ते बघतात. ह्याचा उगम काय हे माहित नाही.

आणि चीनप्रमाणे जपानमधेही ४ हा अशुभ समजला जातो. कारणही चीनप्रमाणेच...चार म्हणजे जपानीत "शी "आणि त्याच्याच दुसरा अर्थ मृत्यू. काही ठिकाणी हॉटेलच्या लिफ्टमधेवगैरे ४ आकडा नसतो. शिवाय आपण जसं भेटवस्तू वगैरे देताना कधी तीन देत नाही, त्याप्रमाणे जपानी लोक चार देत नाहीत. उदा. मोजे द्यायचे तर एक जोड किंवा तीन जोड द्यायचे...गेता (लाकडी सपाता) देताना पण तेच! (हो, इथे शालजोडीतले म्हणून नाही तर सर्रास भेट म्हणून चपला देणं चालतं ;) )

सुधीर काळे's picture

14 Oct 2009 - 5:44 pm | सुधीर काळे

८ च्या कांजीला चिनी लोक शुभ का समजतात? त्यातही जन्म असं आहीतरी आहे असे इथले लोक म्हणतात.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सुधीर काळे's picture

13 Oct 2009 - 11:20 pm | सुधीर काळे

१३ ला मतदान आणि २२ला मतमोजणी? कां बॉ? EVM न वापरता हाताने मतं मोजली जाताहेत कीं काय?
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

अविनाश सहस्त्रबुध्दे's picture

13 Oct 2009 - 11:26 pm | अविनाश सहस्त्रबुध्दे

१३ ला जरी मतदान असले तरी येणारी दिवाळी पाहता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगापुढे अशी मागणी केली आहे की निकाल दिवाळीनंतरच जाहीर करावेत. त्यामुळे मोजणी व निकाल हे दिवाळीच्या पश्चात म्हणजेच २२ तारखेला जाहीर होतील.

अविनाश सहस्त्रबुध्दे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2009 - 11:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

१३ ला मतदान, पेट्या गोळा करायला एक दिवस लागेलच, उजाडली १४ तारीख.
शिवाय काही ठिकाणी, मतदारसंघात, वॉर्डात फेरमतदान वगैरे घ्यायचं असेल तर, काही दिवस आणखी असाही हिशोब असेलच. शिवाय मधे दिवाळी येत आहे, या लोकांनी दिवाळीत काम करावं अशी निवडणूक आयोगाची इच्छा नसावी.

अदिती

विष्णुसूत's picture

11 Oct 2009 - 7:00 am | विष्णुसूत

महाराष्ट्र निकाल असे असतील

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची=१६०-१७० (१६५)
शिवसेना-भाजप=६५-७० (६७)
मनसे =३५-४० (३७)
रिडालोस =८-१२ (१०)
अपक्ष -व इतर = (९)

मनसे बद्द्ल माझा अंदाज चुकु शकतो.

शाहरुख's picture

11 Oct 2009 - 8:55 am | शाहरुख

मनसे बद्द्ल माझा अंदाज चुकु शकतो.

का ?

तसेच वर जो आपण मतदानाची आणि मतमोजणीची तारीख घेऊन ८ आकडा आणलाय त्यात प्रचार संपतो ती तारीख ही मिळवली तर ??

विष्णुसूत's picture

11 Oct 2009 - 11:04 am | विष्णुसूत

खान साहेब,
काहि गोष्टि जरा लाइट्ली घेयच्या असतात. असो.
तुम्हाला जन्मदिवसाचे अभिष्टचिंतन !

अन्वय's picture

13 Oct 2009 - 11:02 pm | अन्वय

विष्णूसूत यांचा अंदाज बर्यापैकी खरा वाटतो
परंतु शिवसेना आणि भाजप यांना शंभरच्या पुढे जागा मिळतील
मनसे 20 च्या पुढे असेल असा अंदाज आहे

कांग्रेस आघाडीला मात्र स्पष्ट बहुमत मिळेल
हा आमचा अंदाज

आमचे अंदाज शक्यतो चुकत नाहीत.

विष्णुसूत's picture

21 Oct 2009 - 11:57 am | विष्णुसूत

नविन माहिती च्या आधारे मी माझा अंदाज थोडा बदलत आहे.
मला हि माझा अंदाज कितपत खरा येतो हे जाणुन घेण्याची उत्सुकता आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची=१३०-१६० (१४५)
शिवसेना-भाजप=८५-९० (८७)
मनसे =१५-२० (१७)
रिडालोस =१८-२२ (२०)
अपक्ष -व इतर = (९)

मुख्यमंत्री : चव्हाण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Oct 2009 - 12:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रिडालोस =१८-२२ (२०)

रिडालोसला खूप जागा आपण दाखवत आहात असे वाटते. कारण रिडालोसला निवडून येण्यापेक्षा आघाडीचे उमेदवार पाडायचे आहेत, हेच त्यांचे एकमेव धोरण आहे. आणि त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होईल असे वाटते.

अर्थात कोण किती जागा जिंकेल हे सांगणे तसे अवघडच...उद्यापर्यंत थांबू या....!!! :)

-दिलीप बिरुटे

विष्णुसूत's picture

21 Oct 2009 - 12:11 pm | विष्णुसूत

हा अंदाज फक्त संख्या शास्त्र व गणिती ( स्टॅटिस्टिक्स अ‍ॅन्ड मॅथमॅटिकल मॉडलिंग ) च्या आधारे केला आहे.
मी स्वतः राजनैतिक समिकरणाचा अभ्यास केला नाहिये. मनसे आणि रिडालोस हे नविन व्हेरीएबल आहे शिवाय बरयाच विधानसभा बदललेल्या आहेत. लोकसभेच्या आकड्यांवरुन तर्क काढले आहेत.
चुक झाली तर रिडालोस आणि मनसे च्या जागांमधेच होण्याची शक्यता आहे. कॉन्ग्रेस-रा.कॉन्ग्रेस स्विप करेल असे मला वाटते.

चिरोटा's picture

21 Oct 2009 - 6:34 pm | चिरोटा

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होतील.ते पंतप्रधानांच्या कार्यालयात गेले पाच वर्ष काम करत आहेत. म्हणजे ते 'हाय कमांड' ह्या कॅटॅगरीमध्ये मोडतात का? राहूल गांधी ह्यांनी 'स्वछ्छ' माणसे मोठ्या पदावर नेमण्याचा विडा उचलला आहे असे वाचले होते.
काँग्रेसवाले निवडून आले तर ते सगळे श्रेय कायम हाय कमांडलाच देतात. हरले तर 'जातियवादी' सेना-भाजप जबाबदार असतात.नऊ वर्षे (रडत कुथत का होईना) मुख्यमंत्रीपद सांभाळणार्‍या विलासरावांचा डोळा पदावर असणारच.शिवाय थोडाच काळ मुख्यमंत्री झालेले नारायण राणे,सुशील्कुमार शिंदे ह्यांनीही फिल्डिंग लावली असणारच्.मनसेचे/रिडालोसचे/अपक्ष २० पेक्षा जास्त आमदार निवडून आले तर मात्र अंबानी/बजाज्/साखर कारखानदार ह्यांना थैल्या मोकळ्या कराव्या लागणार आहेत.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

विष्णुसूत's picture

22 Oct 2009 - 7:53 am | विष्णुसूत

निकाल कधी अपेक्षित आहेत ? किती वाजता ?

सहज's picture

11 Oct 2009 - 7:13 am | सहज

म्हणजे परत तेच. घोडेबाजार तेजीत!

अशा परिस्थितीत राज ठाकरे मात्र किंग मेकर ठरणार.

उग्रसेन's picture

11 Oct 2009 - 10:08 am | उग्रसेन

अशा परिस्थितीत राज ठाकरे मात्र किंग मेकर ठरणार.
नाय भौ. पन्नासाच्या वर सीट आले तर किंग मेकर म्हणता येइन.
वीसाच्याजवळ आले तरीबी ते राकॉच्या बरोबर जाईन एक अंदाज.

काँग्रेस मनसेला जवळ नै करणार. धर्मनिरपेक्षतेचे धोरण त्यायला आडवे यीन. भाजप -सेने के साथ बी ओ नही जायेंगे. क्यू की, उनके साथ गये तो मराठी लोग मनसे लो लाइक नही करेंगे.

विधानसभेमधी आपल्या आमदाराकरवी जनहिताच्या कामासाठी आरडाओरडा करुन मनसेला पुढील पाच वर्षात सत्ता मिळून देतीन काय म्हणता ?

-बाबुराव

अनामिका's picture

11 Oct 2009 - 11:30 am | अनामिका

अजुन या धाग्यावर सर्वाधिक मिपाकरांची नजर पडली नाही असे दिसतय ..........माझा अंदाज असा.
१०० मनसे
१०० आघाडि
५० रिडालोस
३८ अपक्ष
०० युती
म्हणजे एकतर राज मुख्यमंत्री किंवा मग आघाडी आहेच सत्तारुढ व्हायला.
घ्या समाधान करुन.
सुहास पुढारी मधली बातमी वाचुन अंमळ करमणुक झाली..अश्या प्रकारचे भाकित महाराष्ट्रातल शेंबड पोर देखिल करेल आघाडीचीच सत्ता आली तर.

जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

उग्रसेन's picture

11 Oct 2009 - 11:44 am | उग्रसेन

१०० मनसे
मनसे १४४ जागा लढवून राह्यले त्यायचा पन्नास जागावर भर हाये.
तव्हा शंभर जागा म्हणजी लय झाले. पर अंदाजाचा काय सांगू न्हाय, काय बी होऊ शकते.

०० युती
हा हा हा
आपून सामान्य लोक असे एकमेकाला भावनिक गुंतून घेतो आन पाच वर्ष आपला येळ राजकारन्याला शाप द्यायात जातो.

राज मुख्यमंत्री

लय टैम हाये अजून त्यायला B)

सखाराम_गटणे™'s picture

11 Oct 2009 - 11:42 am | सखाराम_गटणे™

तुम्ही तुमच्या जुन्या पक्षाला साफ विसरला आहात, असे दिसते आहे.

ह. घेणे

अनामिका's picture

11 Oct 2009 - 12:25 pm | अनामिका

आंम्ही म्हणजे काही राणे, सरवणकर अथवा राज नाही स्वत:च्या पक्षाला विसरायला .......आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेले स्वत:ला शिवसैनिक म्हणवुन घेण्यात अभिमान बाळगणारे आहोत.... पण म्हंटल इतरांना युतीच्या ०० जागा बघुन क्षणिक का होईना आनंद होल असेल तर होऊ द्या ......कसें?. :?
अवांतर.............
राजने वेगळी चुल मांडली तेंव्हा वाटल होत की खरच त्याच्यावर अन्याय झालाय्.....पण एकंदरीत सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यावर समजतय ..........त्याची भुमिका ही फक्त उद्धवचे वर्चस्व सहन न झाल्यामुळे होती.....आणि आताच्या त्याच्या प्रत्येक भाषणातुन त्याच्या मनातला विखार हा शब्दातुन व्यक्त होताना बघुन वाईट वाटले..

जय हिंद!
जय महाराष्ट्र!

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

वि_जय's picture

12 Oct 2009 - 10:38 am | वि_जय

म्हणजे एकतर राज मुख्यमंत्री किंवा मग आघाडी आहेच सत्तारुढ व्हायला.
घ्या समाधान करुन.

अनामिकाजी,
या ना'राज' समर्थकांच समाधान होईलच कस ?
आयुष्यभर ते ना'राज' ना' राज्य' असेच रहाणार..

अन्वय's picture

13 Oct 2009 - 10:57 pm | अन्वय

तुमचा अंदाज खरा ठरर्ला तर तुमच्या घरी पोतंभर साखर घे़उन येऊन

निखिल देशपांडे's picture

11 Oct 2009 - 1:45 pm | निखिल देशपांडे

कोणाच्या कितीही जागा येवु...
एक नविन आघाडी स्थापण होणार... भाजप + रा. कॉग्रेस + म. न. से.....
हाच नविन फॉर्मुला

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

chipatakhdumdum's picture

11 Oct 2009 - 6:05 pm | chipatakhdumdum

मनसेला ४ चार जागा मिळाल्या तरी खूप. महाराष्ट्रात सरकार येणार आघाडीच, पण रिडालोस च्या पाठीम्ब्याने.

अमोल केळकर's picture

12 Oct 2009 - 9:26 am | अमोल केळकर

सर्व प्रतिसाद कर्त्यांना विनंती . अनिसने निवडणूक निकाल जो बरोबर सांगेल त्याला २१ लाख रुपयेचे पारीतोषिक ठेवले आहे.
सर्वांना चांगली संधी आहे.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Oct 2009 - 9:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ग्रहतार्‍यांचा अंदाज घेऊन थुक्कापट्टी करणं आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून आकडा लावणं यात नक्कीच फरक असावा.

अदिती

विष्णुसूत's picture

12 Oct 2009 - 10:17 am | विष्णुसूत

जर कोणी ९५% कॉन्फिडन्स नी भविष्य वर्तवलं तर बक्षिस मिळेल का ?
भविष्य शास्त्र काय किंवा अन्य कुठले शास्त्र काय हे फक्त ९५% कॉन्फिडन्स इन्टरवल (मराठि समांतर शब्द माहित नाहि) मधेच सिमीत आहे.
एका शास्त्रज्ञाने "इराण न्युक्लिअर चाचण्या करेल का/ कधी करेल" "चन्द्रावर पाणी सापडवायचा प्रयोग सफल होइल का "हे सुध्दा एका कॉम्पुटेशनल मॉडेल नी सिध्द केलं आहे.
त्याने नुकतेच ह्या बद्दल एक पुस्तक हि लिहिलं आहे. अधिक माहिती गुगल वरुन मिळवता येइल.

टिप: मला ९५% बक्षिस मिळाले तरी चालेल !

जाणकार अजुन माहीती देतील अशी अपेक्षा आहे.
वेताळ

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची=१४०-१५०
शिवसेना-भाजप=८०-११०
मनसे =५-१०
रिडालोस =०३-१०
बंडखोर, अपक्ष -=३०-४०
भारिप,शिवराज्य पार्टी व इतर =२०

बंडखोर मोठ्या प्रमाणात विजयी होतील अशी माझ्या बंडखोर मनाची खात्री...

बाकी आकड्यांचा खेळ कधीच सुरु झाला आहे....

सखाराम_गटणे™'s picture

12 Oct 2009 - 11:42 am | सखाराम_गटणे™

नेत्यांच्या नाड्या बघा, कोणी तरी !!!!!
मग सगळे समजेल.

झकासराव's picture

12 Oct 2009 - 3:16 pm | झकासराव

घोडेबाजार तेजीत राहनार.
त्रिशन्कु

.................................................

http://picasaweb.google.co.in/zakasrao

उग्रसेन's picture

12 Oct 2009 - 6:35 pm | उग्रसेन

मनसेचा वचकनामा
किती शीट मिळवीन हा वचकनामा कोन्हा ठाऊक.

उग्रसेन's picture

13 Oct 2009 - 9:10 pm | उग्रसेन

स्टार न्युज
कॉंग्रेस =८९ राकॉ, ४८ = १३७
शिवसेना ६२, भाजप ५१ =११३
मनसे = १२ (मनसे नेत्यांचा अंदाज २२ )
रिडालोस= ०५
इतर २१

२२ तारखेला खरा निकाल जाहीर होईन तव्हर हे सारे अंदाज म्हणजी नुसते हवेत बुडबुडे :)

इतके दिवस का लागताहेत मतमोजणीला? लोकसभेचे निर्णय तर दुसर्‍या दिवशी दुपारपासून घोषित व्हायला लागतात. मग या वेळी १० दिवस का?
'इमयं'चा (EVMचा) वापर केलेला नाहींय की दोन-तीन टप्प्यात मतदान व्हायचे आहे?
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

विसोबा खेचर's picture

14 Oct 2009 - 12:13 pm | विसोबा खेचर

इतके दिवस का लागताहेत मतमोजणीला?

निकाल मुद्दामूनच दिवाळीनंतर जाहीर करणारेत. जी मंडळी निवडून येतील त्यांचं ठीकाय, परंतु त्याचसोबत जी अनेक मंडळी पडतील त्यांची दिवाळी दु:खाची होऊ नये म्हणून निकाल दिवाळीनंतरच जाहीर होणार आहेत..:)

तात्या.

छोटा डॉन's picture

14 Oct 2009 - 4:21 pm | छोटा डॉन

परंतु त्याचसोबत जी अनेक मंडळी पडतील त्यांची दिवाळी दु:खाची होऊ नये म्हणून निकाल दिवाळीनंतरच जाहीर होणार आहेत..

खेचरकाकांशी सहमत ...

काळेसाहेब, त्याचे कसे आहे की आमच्या साखरपट्ट्यात निवडणुका लै शिरीयस घेतात, प्रचाराचा नुस्ता धगाटा उडालेला असतो.
ह्याच्या दरम्यान कोन कुनाचा प्रचार करतो आहे हे नुसते पाहुन ठेवलेले असते व "त्याचा प्रचार का केलास ? " म्हणुन सुका दम भरलेला असतो.
एकदा का निकाल जाहीर झाला की मग मात्र ओपन हाणाहाणी आणि मारामार्‍यांना सुरवात होते. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेच्या लफडे नको म्हणुन हा "फायटिंग सेशन" निकालानंतर ठेवलेला असतो ...

आता तुम्हीच सांगा की दिवाळीच्या मुहुर्तावर स्वतःचे हातपाय मोडुन जायबंदी होऊन बसणे अथवा समोरच्याचे टकुरे फोडुन ४-५ दिवस गायब होणे हे चांगले दिसते का ?
नै ना चालत आपल्याकडे ...

म्हणुन निकाल "दिवाळीनंतर" आहे, एकदा की दिवाळी झाली मग कायबी करा, समदं चलतं ...

------
( उभरते ग्रामिण नेतॄत्व ) छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2009 - 10:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

खेचरकाका आणि डान्राज यांच्याशी सहमत. शिवाय आजच्या मटातली ही बातमी पहा. १३ आणि २२ चं गणित जास्त चांगलं उमजेल.

अदिती

विसोबा खेचर's picture

14 Oct 2009 - 12:25 am | विसोबा खेचर

अहो बाबुराव, कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी तुमच्या-माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे??

तात्या.

विजुभाऊ's picture

14 Oct 2009 - 3:53 pm | विजुभाऊ

भाजप बद्दल इथे कोणीच सहानभुतीने बोलत नाहिय्ये.
या इथे वा कोणत्याच चॅनलवर भाजप सेना युती प्रथम क्रमांकावर असेल असे म्हणत नाही.
निसटत्या बहुमताला जनादेश म्हणणारी भाजपा आता बहुतेक
उतरतीला लागलेली दिसतेय

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

चिरोटा's picture

14 Oct 2009 - 4:25 pm | चिरोटा

ह्यावेळी सेना-भाजपने १९९५ सारखे सरकारविरोधी वातावरण तयार केले नाही. सध्याच्या ढिसाळ्/भ्रष्ट सरकारविरुद्ध वातावरण तापवण्यासाठी असंख्य मुद्दे होते.महागाई,भ्रष्टाचार्,रस्ते,वीज्,पाणी वगैरे.थोड्या फार प्रमाणात उद्धव ठाकरे ह्यांनी तो प्रयत्न केला पण लोकांपुढे काँग्रेस्/राष्ट्रवादीला हे लोक चांगले पर्याय आहेत असे नीट ते मांडू शकले नाहीत.भाजपवाले अंतर्गत लढाईतच होते.त्यात मनसेने मराठी मुद्दा उचलुन धरल्याने अमराठी सेना/भाजपच्या उमेदवारापेक्षा काँग्रेसचा मराठी उमेदवार बरा असा लोकानी विचार केल्यास नवल नाही.असो.
निवड्णूकीचे निकाल बर्‍याच वेळा सर्वांनाच अचंबीत करतात.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

अमोल केळकर's picture

14 Oct 2009 - 4:48 pm | अमोल केळकर

अमराठी सेना - हा शब्दप्रयोग आवडला

(मराठी) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अनामिका's picture

14 Oct 2009 - 6:53 pm | अनामिका

सेनेने उभे केलेले अमराठी उमेदवार किती व कोणते याचा तपशिल देईल का कुणी?
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

प्रशु's picture

15 Oct 2009 - 5:24 pm | प्रशु

या विधान सभेचे माहित नाहि पण मागे राज्य सभेचे खालिल प्रमाणे...
चंद्रिका केनिया, संजय निरुपम, प्रितीश नंदी....

अनामिका बाई जरा इमोशन विचार बाजुला राहु द्या, पण हिदुत्वाचे वारे शिरल्या पासुन शिवसेने मराठी माणसाचे काय भले केले हया बद्द्ल लिहा जरा.

वेळ मिळाला तर लोकप्रभाचा अंकात राजु परुळेकरांचा लेख वाचा......

अनामिका's picture

16 Oct 2009 - 1:49 am | अनामिका

तुंम्ही इमोशन शुद्ध मराठीत भावनांना आवर काय तो घालुन विचार करताय ना तितक पुरेस आहे....मुळात ज्यांना हिंदु म्हणवुन घेण्याचीच लाज वाटते अश्यांकडून अपेक्षा न केलेलीच बरी......आणि हो! मी या विधानसभा निवडणूकीतले सेनेने उमेदवारी दिलेले अमराठी उमेदवार कोण असा प्रश्न विचारला होता ...उगीच शिळ्या कढीला उत आणुन उपयोग शुन्य.
आणि ४ वर्षांपुर्वी बाहेर पडलेल्या पुर्वाश्रमीच्या शिवसैनिकांना सेनेत असताना हिंदुत्वाच वावड नव्हत आणि आता एकदम सेक्युलर अर्थात निधर्मिवादी झाल्याच साक्षात्कार झाला असेल तर धन्य त्यांची!
राजु परुळेकरांनी सध्या दुसर्‍या पक्षाच प्रचारकपद स्विकारलय तेंव्हा त्यांच्या सध्याच्या लिखाणात काही अर्थ नाही असे माझे वैयक्तीक मत आहे...
पुर्वाश्रमीचे परुळेकर आता हरवलेत .त्यांना देखिल बर्‍याच गोष्टींचा अचानक नव्याने साक्षात्कार झाला आहे असे समजते.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

प्रशु's picture

15 Oct 2009 - 5:29 pm | प्रशु

आपण हा धागा जपुन टेउया, आणी २२ तारखेला पडताळा करुया....

व्हीडीओकॉन चे मालक,त्याच्या वर पण सेनेने कृपा केली होती.
वेताळ

अमोल केळकर's picture

22 Oct 2009 - 9:52 am | अमोल केळकर

मनसेची अपेक्षेप्रमाणे १० ते १४ जागांवर मुसंडी. अभिनंदन राज साहेब
जय महाराष्ट्र !!

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा