गीतार्थ बोधिनीचे लेखक कोण?

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जनातलं, मनातलं
9 Oct 2009 - 9:56 pm

गीतार्थ बोधिनी नावाचा एक खूप जुना ग्रंथ नुकताच पाहण्यात आला. पहिली काही पाने फाटलेली असल्याने लेखक, प्रकाशक, प्रकाशन वर्ष ही माहिती उपलब्ध नाही. गीतेचा मूळ श्लोक, समश्लोक, आर्या, दोहा, ओवी, अभंग (मूळ श्लोकाच्या आशयाची) असे या ग्रंथाचे स्वरुप आहे. अध्यायांच्या सुरवातीला वामनकृत असा उल्लेख आहे.
ही रचना वामन पंडितांची असावी या समजुतीने खापरे.ऑर्ग वर शोध घेतला. तिथे वामन पंडितांच्या साहित्यकृतीत या पुस्तकाचा उल्लेख नाही. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या साईटवर त्यांच्याकडील जुन्या ग्रंथांच्या यादीत या नावाचे एक पुस्तक आहे पण लेखकाचा उल्लेख नाही. याबद्दल कुणी अचूक माहिती देऊ शकेल काय? फार आभारी होईन.

भाषाप्रकटन

प्रतिक्रिया

वाचक's picture

9 Oct 2009 - 11:31 pm | वाचक

पहिल्याच शोधात ही माहिती सापडली - लेखकः रावाजी श्रीधर गोंधलेकर
ही लिंक

आता ही माहिती किती विश्वासार्ह ते मात्र मला माहिती नाही.