नमस्कार मंडळी. काल बुधवार असल्याने प्रतिभेला बहर आला होता. त्यात आम्ही गूढ कविता मोड मधे जाऊन काही ओळी आमच्या मित्रांबद्दल त्यांच्या संमतीने खरडल्या आहेत. त्या खाली देत आहे. प्रत्येक कडवे अथवा कडव्यांचा समूह एका व्यक्तीस उद्देशून लिहीला आहे. अर्थात सर्वजण आमचे खास मित्र असल्याने ते राग मानणार नाहीत अशी हमी त्यानी दिलेली आहेच.
मुक्तचुंबनी आकळेआसू
रत्नाकररेती अंगुलीध्यासू
स्तुतिभास्करी शब्दपिपासू
संभोगयंत्री अभियांत्रिकू
निळीलेखणी रक्तलांछूनी
चुंबकयोनी ठापठाप
मत्तप्रहरणी मृदूहोऊनी
पूनमक्षेत्री चट चट चट चट
बद्धप्रवासी क्रुद्धनगरी
खातमर्दनी प्रियपलायनु
दारुबाजारी भंगारविकू
बाँडशेअरी चढेउतारु
पुण्यमध्यनी खरडव्यासू
जोडनळातून सबूतठासू
जालपणनी कन्याध्यासू
खराजवाडे पराखासू
भिन्नरूपिणी असंख्यायडी
क्वचितलेंगू, नन्हाटिंगू
खवट लोचनी, तशाच नोंदी
कबिरबानी सावनभादो
कॅली नगरी, डांबिसजवळी
संपादकाळी, हळवा नंदू
क्षुब्धचित्ती रसाळगात्रे
अद्वैतातून विद्धविचित्रे
अर्थकारणी मालकमात्रे
द्वंद्वकारणी पाध्येकात्रे
मुक्तविचारी गोळामात्रे
क्षुब्धविचारी चोळागात्रे
कडकविचारी फोकामात्रे
मृदूविचारी रसाळचित्रे
उपदेशकरी प्रसन्नचित्ते
फोरासरोडी विकलविचित्ते
आता काही कविता आमचे मित्र नंदू व बिका यांच्या प्रतिभाबहरातून प्रसवल्या आहेत. त्याचाही रसिकानी आस्वाद घ्यावा.
उंटसवारी, दुबईनगरी,
छंदीफंदी, अतिशहाणाबिकु
ऊसबांधणी माऊधडकी
कॉफीऊडवी खजुरपौष्टिकू
बेलीप्राशनी क्वेसार्नोबेली
पायविक्षिप्ती फ्लोटरकाकू
लेखवायदी वंगबेंग्रुळी
परिचारकी मेकेदाटु
परावलंबी बौन्सरछंदी
संभानगरी कंट्रीपांडु
दगडीचाळू प्रशिक्षाणार्थु
फासपारधु शोधपत्रकु
प्रतिक्रिया
8 Oct 2009 - 11:01 am | विनायक प्रभू
तिच्या मारी पुपेदिनी
9 Oct 2009 - 12:47 pm | ब्रिटिश टिंग्या
छान कविता! :)
8 Oct 2009 - 11:02 am | छोटा डॉन
>>काल बुधवार असल्याने प्रतिभेला बहर आला होता. त्यात आम्ही गूढ कविता मोड मधे जाऊन काही ओळी आमच्या मित्रांबद्दल त्यांच्या संमतीने खरडल्या आहेत.
:)
"बुधवार" आणि "गुढ मोड" हे शब्द ह्रुदयाला भिडले व ह्रुदय भरुन आले.
अर्थातच त्यामुळे कविता आवडल्या, काही काही तर फारच मार्मिक आहेत ( कुणावर ते आम्ही सांगणार नाही )...
असेच अजुन येऊद्यात, बरेच जण राहिले आहेत.
ही फक्त पोच समजावी, बाकी सविस्तर सवडीने खरडेनच ...!!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
8 Oct 2009 - 11:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
डान्रावांशी बाय डीफॉल्ट सहमत!
करू नका चर्चा एवढ्यात काव्यबंदीची, खरडण्यालायक आहेत अजून बरेच काही
(रा.को.) अदिती
8 Oct 2009 - 11:07 am | निखिल देशपांडे
करू नका चर्चा एवढ्यात काव्यबंदीची, खरडण्यालायक आहेत अजून बरेच काही
अदिती तु पण लिहि ना दोन चार कडवे
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
8 Oct 2009 - 12:58 pm | प्रभो
करू नका चर्चा एवढ्यात काव्यबंदीची, खरडण्यालायक आहेत अजून बरेच काही
(बुधवारी कवी)प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
8 Oct 2009 - 1:15 pm | विशाल कुलकर्णी
=)) =)) =)) =)) =))
अवांतर : ऐन बुधवारी गुढ कविता स्फुरली ते स्थान कुठले होते? बुधवारात तर नव्हे? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
8 Oct 2009 - 11:09 am | छोटा डॉन
>>करू नका चर्चा एवढ्यात काव्यबंदीची, खरडण्यालायक आहेत अजून बरेच काही
हॅ हॅ हॅ.
असो, चालु द्यात ...!!!
------
छोटा डॉन
"करू नका चर्चा एवढ्यात अवांतराची, खरडणारे आहेत आयडी अजुन काही"
8 Oct 2009 - 1:05 pm | Nile
लय भारी पेशवे, पण अजुन 'कर्णमधुर' नादमधुरता आणता आली असती पण त्याकरता शब्द्संग्रह वाढवा, त्याकरता काय करावे हे माहीत आहेच तुम्हाला. ;)
करु नका चर्चा येवढ्यात विडंबनाची, काव्य प्रसवणारे आहेत अजुन काही. ;)
8 Oct 2009 - 11:04 am | अवलिया
लै भारी... :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
8 Oct 2009 - 11:06 am | निखिल देशपांडे
एक ना एक कडवे मस्त जमले आहे...
आणी ते छंद मात्रा वैगेर पण मस्त आहे..
एकदम नादमय रचना म्हणुन बघितली छान म्हणता येत आहे..
सर्व कडव्यांचे अर्थ कळाले... ओळखा पाहु कोण कोण आहेत ते
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
8 Oct 2009 - 11:13 am | सखाराम_गटणे™
मस्तपेशवे
8 Oct 2009 - 8:17 pm | धनंजय
मस्तपेशवे हास्यआसवे
वळमुर्कुंडी गंमतथंडी
"गंमतथंडी" म्हणजे इंग्रजीतले "व्हेरी कूल!"
8 Oct 2009 - 9:02 pm | धमाल मुलगा
धनंजयराव :)
लै भारी!!
>>"गंमतथंडी" म्हणजे इंग्रजीतले "व्हेरी कूल!"
:) चला..आमच्या शब्दभांडारात नवा शब्द दाखल करुन घेतला :)
8 Oct 2009 - 9:13 pm | चतुरंग
इतरांचे काव्य जिथे संपते तिथे धन्याशेठचे सुरु होते! ;)
-(काव्यप्रेमी)विडोबा चतुरंग
9 Oct 2009 - 8:40 am | llपुण्याचे पेशवेll
इतरांचे काव्य जिथे संपते तिथे धन्याशेठचे सुरु होते!
हाहाहाहा.... =)) =)) =))
(विनोदीगूढकाव्यप्रेमी)गूढोबा लाफर
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
9 Oct 2009 - 2:14 pm | शरदिनी
पेशव्यांच्या कविता करायच्या प्रयत्नाबद्दल दाद द्यावीशी वाटते.
..
बर्याच ठिकणी वृत्तामध्ये बदल घडला आहे. काळजी घ्यायला हवी.
दिव्यभरारी तेजतर्रारी
काव्यअडाणी खेचू नका
तुंदिलतनूला गर्दभलाथा
देण्याघेण्या चुकू नका
10 Oct 2009 - 8:18 am | llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद शरदिनीताई. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
8 Oct 2009 - 11:15 am | llपुण्याचे पेशवेll
अदिती, डॉन, निखील, नाना, विप्र , सख्या सर्व प्रतिसादकांचे आभार. आपल्या सारख्या प्रतिसादकांमुळे कविला हुरुप येतो.
पुण्याचे पेशवे
"पुसले तुम्हास कोणी हरलो कसा इथे मी, सांगा तयास तेव्हा लढलो कसा इथे मी"
Since 1984
8 Oct 2009 - 11:16 am | अवलिया
तुंदिलतनु तंबोरा उरी
तान घेत मस्त साजरी
करु प्राशन सिंगलमाल्ट
रमणीसंग जरासा हाल्ट
सांगा मी कोण??
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
8 Oct 2009 - 11:21 am | llपुण्याचे पेशवेll
अर्थवाही कडवे आहे. पण गूढ कवितेत मोडत नाही. अगदीच सरळीनी काव्य झाले आहे. २ चमचे दुर्बोधता वाढवा त्यात. आणि हां शब्दवैचित्र्य, दुर्बोधता, ठेका त्याच क्रमाने नाही घातला तर काय होईल सांगता येत नाही.
बाकी प्रयत्न चांगला.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
8 Oct 2009 - 11:26 am | अवलिया
चित्रडकवी व्याकुळचित्ते परप्रकाशी शिंतोडे ते
भ्रमता मस्तक क्षुब्धतेने न्याय नसे काही येथे
अवचित उत्सुक भयशंकित करोनी लेखन ते
वाहवा मिळे श्रमसाफल्य साजिरे मनोहर ते
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
9 Oct 2009 - 8:36 am | सखाराम_गटणे™
चुअचु
9 Oct 2009 - 9:44 am | अवलिया
चूक. साफ चूक.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
8 Oct 2009 - 11:21 am | निखिल देशपांडे
नाना हे न कळण्या ईतके आम्ही वेडे नाहि आहोत...
सोप्प आहे.. बाकी जरा अजुन क्रिप्टिक हवे होते
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
8 Oct 2009 - 11:29 am | अवलिया
नाना हे न कळण्या ईतके आम्ही वेडे नाहि आहोत...
मान्य, पण हे ज्यांच्यावर आहे त्यांना कळलं आहे का? हा कळीचा मुद्दा असु शकतो की नाही ?? :?
;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
9 Oct 2009 - 8:36 am | सखाराम_गटणे™
खेचरकाका
8 Oct 2009 - 11:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
व्यनिसम्राटू काकागणु
मादकजहालू लपालपू
अदिती
9 Oct 2009 - 8:35 am | सखाराम_गटणे™
सहज काका
8 Oct 2009 - 11:21 am | बिपिन कार्यकर्ते
टाकलेच का शेवटी!!!! छान!!! बाकी ते 'अति' लावल्यामुळे आम्ही आमच्यावरच रचलेल्या उत्कृष्ट नादमय रचनेचे वाट्टोळे केले आहेत तुम्ही. असो. बुधवार म्हणले की हे सगळे आलेच ओघाने... (इथे 'ओघाने' असे म्हणले आहे. 'ओघळाने' असे नाही. ;) )
बिपिन कार्यकर्ते
8 Oct 2009 - 11:35 am | श्रावण मोडक
बुधवार झाला. आता शनिवारी काय?
बाकी या रचना उच्चभ्रूच!!!
8 Oct 2009 - 11:51 am | सूहास (not verified)
=)) =)) =))
हरित नोट माजकर्ता,
दहीभात हाती खाजकर्ता,
पेयपान,खानपान, फुकटपाजकर्ता
सौतामात्रे शीतपेय मात्रे....
ओळखा पाहु ??
मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..
सू हा स...
8 Oct 2009 - 12:04 pm | llपुण्याचे पेशवेll
पूनमक्षेत्री नेमीतयात्री
गट्टबियरी क्रुद्धचरित्री
इनलॅकाआठवे हळवानेत्री
कंजारवस्ते चंद्रावरती
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
8 Oct 2009 - 1:39 pm | धमाल मुलगा
अग्ग्ग्ग्ग्ग्गं.....
अरे काय चाल्लंय?
घ्या आमचीपण एक वेंट्री :D
विविधभूषणे स्वलेखकर्तु
बद्धलेखने जडशब्दाळू
प्रतिक्रियामिषे लेखबावळू
टार्यामात्रे मुंडणकर्वितु
8 Oct 2009 - 1:59 pm | llपुण्याचे पेशवेll
नित्यमार्दवे विर्झण्लावे
नित्योल्ल्हसे खाजखाजवे
पांघरून्तो गेंडाचर्मे
अतिहीणकशी प्रतिसादप्रसवे
घ्या अजून एक.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
9 Oct 2009 - 12:10 am | मिसळभोक्ता
तरीच म्हण्ल, अजून एक वळखीचा माणूस दिसत नाही.
आता "आवडले" म्हणायला हर्कत नाही.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
8 Oct 2009 - 2:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एक लंबर हुच्च रे ... आणि हे आणखी एक लेखकः विक्षिप्त & पेशवे
व्यनिसम्राटू मादकजहालू
स्पेशलक्लासी सिनेमादेखू
खरडउडवू गॉसिपचुकवू
टवाळकुळास लावु बौलु
अदिती
9 Oct 2009 - 1:21 am | चित्रा
काय हल्ली सगळे सोपे पेपर काढतात. ;)
9 Oct 2009 - 8:39 am | सखाराम_गटणे™
बहुतेक डोनकाका किंवा सहजकाका
8 Oct 2009 - 2:25 pm | JAGOMOHANPYARE
चर्चर चर्चर चरखा फिरवी
शब्द शिपुर्डे शिरशिर भरवी
कुठार कोठे कडकड काठी
पंचा पंचक उघडा पाठी..
आयला, मला बी जमलं.... :)
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
8 Oct 2009 - 2:35 pm | भडकमकर मास्तर
अगडमशस्त्री तिकडमनेत्री
दारुणभर्त्री कटीपवित्री
जरार्थ पंते शंबूक पत्रे
बर्तनमांजे शम्मी सूत्रे
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
8 Oct 2009 - 2:43 pm | बिपिन कार्यकर्ते
सदासर्वदा अगम्यबोली
बडबडभारी बोबडवाणी
चित्रडकवी लोकाजळवी
गातेगाणी चिवचिवचिमणी
:)
बिपिन कार्यकर्ते
8 Oct 2009 - 2:55 pm | llपुण्याचे पेशवेll
गूढआर्जवी अगम्यशब्दी
मूढमार्जरीगतप्रसिध्दी
विचित्रओळी प्रतिहतबुद्धी
शून्यविरघळे हरपतशुद्धी.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
8 Oct 2009 - 2:55 pm | भडकमकर मास्तर
वर्जितवज्रे शनीशीरावर
सोलांकित त्या कुटिलनटावर
माणिकमन्ये श्रीखंडशून्ये
गोडघाटीच्या तरूतळावर
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
8 Oct 2009 - 2:59 pm | बिपिन कार्यकर्ते
मास्तर, तुम्ही तर दुर्बोधतेत ग्रेस वर मात केलीत. आणि त्यांनाच आणले कवितेत. छान!!!
बिपिन कार्यकर्ते
8 Oct 2009 - 3:35 pm | भडकमकर मास्तर
आणि वर्जेश की वज्रेश सोलंकी विसरलात काय वरच्या ओळीतला?
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
9 Oct 2009 - 9:44 am | विजुभाऊ
माणिकमन्ये श्रीखंडशून्ये
गोडघाटीच्या तरूतळावर
ग्रेस फूल.....
मास्तर इतके सोपे प्रश्न देऊ नका
नाव माझे व्यवसाय जो.
गाणे ल्हितो...मिसळ खातो.
बोलु जाता दात खेचतो
मी कोण.....
ठ्यॉ.. म्हणून कळफलक भिजतो
हापीसात टेबलावर नीजतो
शिकार खेळी हरवून जातो
बारा मतीचे नाव सांगतो
मी कोण.....
तब्येतीने बारीक खारीक
हासताना डोळे बारीक
आनन्दी मी सदा असतो.
मित्राना जोडत रहातो
............मी कोण.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
9 Oct 2009 - 8:40 am | सखाराम_गटणे™
चुअचु
10 Oct 2009 - 1:16 pm | पर्नल नेने मराठे
:D
चुचु
8 Oct 2009 - 2:46 pm | Nile
सगळे पगले,
कविता स्त्रवले,
डोके पिकले,
घाण हगले. :|
8 Oct 2009 - 2:54 pm | llपुण्याचे पेशवेll
प्रकाटाआ
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
9 Oct 2009 - 8:39 am | सखाराम_गटणे™
शेवटची ओळ सोडुन मिपाकर
8 Oct 2009 - 3:36 pm | भाग्यश्री कुलकर्णी
सगळे प्रतिसाद वाचायला मज्जा येतीये.छान वाटतंय.
8 Oct 2009 - 7:41 pm | यशोधरा
मज्जा आली वाचायला! =))
8 Oct 2009 - 7:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुण्याचे पेशवे आणि काव्यकुळपरिवारातील सर्व सदस्यांच्या कविता आवडल्या अजून येऊ द्या...! :)
8 Oct 2009 - 7:55 pm | चतुरंग
पेशव्या, शिंच्या बुधवार सत्कारणी लावलास हों! ;)
आणि बाकी कवनजटाही चांगल्याच दुस्तर आहेत!! :D
अगम्यकवने दुस्तरलंघी
काव्यनेटकी वाजवि पुंगी
झिर्झिर वस्त्रा अस्तर लावी
विकट विडंबन संगित रंगी!
चतुरंग
8 Oct 2009 - 8:17 pm | jaypal
पेशव्यांची मस्त(नी) कविता
8 Oct 2009 - 8:19 pm | प्राजु
हाती घेऊनी गूढ लेखणी
लिहिते बाला मूढ देखणी
शारदायिनी लाव शिकवणी
अर्थनकळे फिरवा पाणी
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Oct 2009 - 10:13 pm | प्रभो
मनीबसत काव्यपाश
होई काव्यप्रसवण्यास निद्रानाश
सर्वजण पाडती काव्यरास
जणू भरले असे कव्यसंमेलन खास
-प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
8 Oct 2009 - 10:24 pm | सखाराम_गटणे™
सगळे दिसत आहेत्, पण शरदिनी ताई कुठे दिसत नाहीत.
8 Oct 2009 - 10:44 pm | Nile
जरा नीट बघा की राव! त्या तर काव्या काव्यात वसल्यात. ;)
8 Oct 2009 - 11:15 pm | क्रान्ति
बुधवारची कविता आणि तिचे प्रतिसाद यांच्यासाठी
=)) =D> ;) @) इत्यादि इत्यादि!
क्रान्ति
अग्निसखा
9 Oct 2009 - 3:32 am | मुक्तसुनीत
<मुसु आर आय पी.>
9 Oct 2009 - 3:41 am | बिपिन कार्यकर्ते
=))
परंपरेला स्मरून एक फोटोच लावायचा ना... खाली जन्मसाल आणि २००९ असा. ;)
बिपिन कार्यकर्ते
9 Oct 2009 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नको नको, वय कळेल सगळ्यांना त्याचं! ;-)
अदिती
9 Oct 2009 - 9:31 am | विजुभाऊ
अगम्य कवटी विचित्र दिवटी
मात्रा वृत्ते अक्षर छंदी
गझल प्रसवुनी म्हणतो घंटी
हाणा माथी शनी मंगळ युती.
...........मी कोण
लवकर भरभर सारे लिहितो
लेखाचे त्रीशतक गाजवतो
शब्दचुंबुनी फेकत जातो
काना मात्रे पाडत येतो.
..........मी कोण.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
9 Oct 2009 - 6:27 pm | नंदू
बापरे, आता आमच्यासारख्यांनी(नवीन सभासद) ही कोडी कशी सोडवायची?
कुणी क्लू देईल का क्लू?
कनफ्यूज्ड. :SS
नंदू
23 Jan 2016 - 12:05 am | जव्हेरगंज
_/\_
पुपे , लिखाण का बंद क्येलं?