भीती वाटु लागलेय आजकाल..,
माझ्याच पायातल्या पैंजणांची !
सदोदीत पाठलाग करणार्या..,
त्यांच्या त्या किणकिणाटाची.
खुप हौसेने घातलं होतं आईनं...,
तिच्या फिकुटलेल्या कृश हातांनी !
वय वाढलं...., समज आली.....,
पण पैंजणांचा मोह सुटला नाही !
बालपणी ते छमछम वाजवीत मिरवणं...,
तारुण्यात आल्यावर त्यांचं...
स्पोर्टशुजवरही रुबाब गाजवणं !
त्यांच्या मधुर किणकिणाटानं...
मान वळवुन बघणारी धुंद तरुणाई...,
आणि मोहरुन जाणारं माझं वेडं मन !
पैंजण अजुनही आहे...
पण आता मन मोहरत नाही...,
आता थबकत नाहीत नजरादेखील......
राहुन राहुन वळते माझीच नजर....,
पायातल्या उदास पैंजणांकडे...,
परिस्थितीने त्यांच्यावर...
उधळलेल्या उन्मत्त, बेगुमान नोटांकडे ...!
विशाल.
प्रतिक्रिया
6 Oct 2009 - 12:05 pm | श्रावण मोडक
चांगली कविता. हे दुःख अशा रीतीनं व्यक्त केलंस... छान म्हणता येत नाही...
6 Oct 2009 - 12:24 pm | प्रभो
विशालभौ.....मस्त रे....सुंदर
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
6 Oct 2009 - 12:11 pm | मसक्कली
बालपणी ते छमछम वाजवीत मिरवणं...,
तारुण्यात आल्यावर त्यांचं...
स्पोर्टशुजवरही रुबाब गाजवणं !
त्यांच्या मधुर किणकिणाटानं...
मान वळवुन बघणारी धुंद तरुणाई...,
आणि मोहरुन जाणारं माझं वेडं मन !
पैंजण अजुनही आहे...
वा..!! वा...!! =D> :D
6 Oct 2009 - 12:19 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
6 Oct 2009 - 12:20 pm | बेसनलाडू
(वाचक)बेसनलाडू
7 Oct 2009 - 7:53 am | क्रान्ति
करणारी कविता!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
7 Oct 2009 - 1:26 pm | भाग्यश्री कुलकर्णी
क्रांतीसारखेच म्हणते.
7 Oct 2009 - 10:05 am | चतुरंग
काय म्हणावं? शेवटल्या दोन ओळीत एकदमच कडेलोट केलात हो विशालभौ! :(
(उदास)चतुरंग
7 Oct 2009 - 10:12 am | आशिष सुर्वे
+१
शेवटल्या दोन ओळीत एकदमच कडेलोट केलात हो विशालभौ!
खरंच!!
-
कोकणी फणस
7 Oct 2009 - 10:58 am | विशाल कुलकर्णी
परवा लाफ्टर चँपियनचे जुने भाग बघताना पुन्हा एकदा नवीन प्रभाकरचे पैचान कौन पाहण्यात्/ऐकण्यात आले. पोट धरुन हसताना सहज एक विचार मनात आला.....
कसे असेल त्यांचे आयुष्य? चक्रव्युहात शिरताना, परतीचे दोर स्वतःच कापुन टाकताना होणार्या वेदना कशा असतील? :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
7 Oct 2009 - 1:50 pm | हर्षद आनंदी
पुर्ण सहमत
चक्रव्युहात शिरताना, परतीचे दोर स्वतःच कापुन टाकताना होणार्या वेदना कशा असतील?
जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे..
राहुन राहुन वळते माझीच नजर....,
पायातल्या उदास पैंजणांकडे...,
परिस्थितीने त्यांच्यावर...
उधळलेल्या उन्मत्त, बेगुमान नोटांकडे ...!
शेवटच्या ओळीत
मार डाला !! हाय जालीम, तुने मार डाला!!!
पण हे काहीतरी भयानक वास्तव आहे, मला तर वाटते, नियती-नशीब यांच्या बरोबर असे खेळते आणि समाजातल्या आया-बहिणी रस्त्यावर बिनघोर फिरु शकतात अन्यथा दोन पायांची श्वापदे त्यांचे लचके तोडायला मागे-पुढे पहाणार नाहीत.
7 Oct 2009 - 2:26 pm | विशाल कुलकर्णी
हर्षद, चाणक्याने याचे उत्तर फार पुर्वीच दिलेले आहे. चाणक्यनितीत त्याने स्पष्टपणे सांगितले आहे की प्रत्येक शहरात गणिकांची वस्ती ही हवीच. बुभुक्षितांची शांती ;-) करायला ते आवश्यक असते, अन्यथा त्यांचा घाला सरसकट सगळ्याच स्त्रीयांवर पडेल.
दुर्दैवाने चाणक्याने गणिकांना इतर स्त्रीयांपेक्षा वेगळे पाडले आहे. :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
7 Oct 2009 - 2:28 pm | llपुण्याचे पेशवेll
वाह! छानच कविता आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984