कवितांचा एक कारखाना चालवतो मी
एकाच साच्यातल्या कविता छापतो मी
आठवणींचा बाजार , प्रेमाचा आजार
वेड्यागत असच काहीतरी , बरळतो मी
गावरान गोडवा न ठाउक मला
उगाच शब्दांचे काना मात्रा, चुकवतो मी
हवे ते, जेंव्हा नाही गवसत
मारुन मुटकुन शब्दांना, घुसडवतो मी
विषयाची गरज, प्रसंगाची मागणी अशा-
गोंडस नावाखाली शिवराळ शब्द, पेरतो मी
टिकाकारांना त्यांच्याच भाषेत प्रत्युतर
कुठल्याही व्यासपिठावर, भुंकतो मी
प्रतिक्रिया
25 Sep 2009 - 4:24 pm | विशाल कुलकर्णी
मुजरा सरकार !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
25 Sep 2009 - 4:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-)
25 Sep 2009 - 4:45 pm | टारझन
:)
25 Sep 2009 - 7:36 pm | दशानन
:)
***
राज दरबार.....
25 Sep 2009 - 8:43 pm | अविनाश ओगले
फारच `विषयांतर' होतंय!
25 Sep 2009 - 9:26 pm | मदनबाण
गावरान गोडवा न ठाउक मला
उगाच शब्दांचे काना मात्रा, चुकवतो मी
हा.हा.हा... छान. :)
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.