व्यथा
------------------------------------
जरी वाटतो नवाच आहे
ऋतु कालचा तसाच आहे..
प्रतिबिंबासही रोज वाटते
मीही देखील खराच आहे..
रामासाठी सीता होणे
खरा दोष हा तिचाच आहे..
इथे थांबलो घटकाभर मी
प्रवास अजुनि बराच आहे..
किती भरावे सूख तरिहि
अर्धा प्याला रिताच आहे..
मला नकोसा शेवट झाला
किती कथांची व्यथाच आहे..!
- योगेशु
प्रतिक्रिया
24 Sep 2009 - 1:15 pm | श्रावण मोडक
छान.
24 Sep 2009 - 1:20 pm | राघव
सुंदर लिहिलेत. आवडले.
प्रतिबिंबासही रोज वाटते
मीही देखील खराच आहे..
रामासाठी सीता होणे
खरा दोष हा तिचाच आहे..
इथे थांबलो घटकाभर मी
प्रवास अजुनि बराच आहे..
किती भरावे सूख तरिहि
अर्धा प्याला रिताच आहे..
हे चारही शेर खूप आवडलेत. विशेषतः प्रतिबिंबाची कल्पना.
मीही देखील खराच आहे
'मीही' अन् 'देखील' हे दोन्ही वापरणे जरा चुकतंय. पुन्हा वर 'प्रतिबिंबासही' हे आलेलेच आहे. थोडे बदलले तर बरे पडेल. नाही? :)
असो. छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व. पुलेशु.
राघव
24 Sep 2009 - 1:34 pm | टारझन
सहावं , तिसरं , पाचवं , पहिलं , दुसरं आणि चौथं कडवं आवडलं !! केवळ अप्रतिम !!
झकास
- डोकंखाऊ टारझू
24 Sep 2009 - 6:09 pm | क्रान्ति
अगदी खासच!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
24 Sep 2009 - 9:34 pm | मदनबाण
इथे थांबलो घटकाभर मी
प्रवास अजुनि बराच आहे..
व्वा... :)
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
Frankly Speaking with Raj Thackeray
http://www.timesnow.tv/videoshow/4328082.cms
24 Sep 2009 - 10:54 pm | अनामिक
आवडली कविता.
-अनामिक
25 Sep 2009 - 8:15 am | प्राजु
फारच सुरेख!!
प्रतिबिंब ,सीतेचा शेर, प्रवास... हे तीन शेर सुरेख आहेत.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Sep 2009 - 10:44 am | विशाल कुलकर्णी
काय आवडलं ते सांगायचं झालं तर सगळी कविताच इथे परत पोस्टावी लागेल.
लगे रहो ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"