अविनाश ओगले in जे न देखे रवी... 21 Sep 2009 - 9:06 pm देईल का मज कुणी दिलासा साडेसातीत हवाहवासा म्हणती साडेसातीमध्ये फिरते घर अन् फिरतो वासा नुसती तडफड साडेसाती जळावाचूनी जैसा मासा सहजासहजी होते गोची उच्छ्वासांचा होई उसासा साडेसातीनंतर तरी का मनासारखा पडेल फासा? -अविनाश ओगले कविता प्रतिक्रिया देतील, देतील 21 Sep 2009 - 9:18 pm | श्रावण मोडक देतील, बरेच जण देतील. इथेच मिळेल दिलासा, काळजी नको. मुख्य - कविता बरी आहे. कविता चांगली आहे. 21 Sep 2009 - 9:53 pm | प्राजु श्रा मो शी सहमत. बरेच जण इथे उत्तर देतील तुम्हाला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ बाबा... २५० 21 Sep 2009 - 10:20 pm | JAGOMOHANPYARE बाबा... २५० रूपयान्चा तर प्रश्न आहे.... का फुकाचा त्रास करून घेतोस? आणि साडेसातीचं म्हणशील तर ती जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी तिची सावली मात्र इथे कायम पडीक असते... साडेसाती ! दिलासा ? 22 Sep 2009 - 2:42 pm | विदेश साडेसातीत... हवाहवासा दिलासा मिळणे ..अवघड दिसतंय - प्रश्नकुंडलीवरून तरी !!
प्रतिक्रिया
21 Sep 2009 - 9:18 pm | श्रावण मोडक
देतील, बरेच जण देतील. इथेच मिळेल दिलासा, काळजी नको.
मुख्य - कविता बरी आहे.
21 Sep 2009 - 9:53 pm | प्राजु
श्रा मो शी सहमत. बरेच जण इथे उत्तर देतील तुम्हाला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Sep 2009 - 10:20 pm | JAGOMOHANPYARE
बाबा... २५० रूपयान्चा तर प्रश्न आहे.... का फुकाचा त्रास करून घेतोस? आणि साडेसातीचं म्हणशील तर ती जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी तिची सावली मात्र इथे कायम पडीक असते...
22 Sep 2009 - 2:42 pm | विदेश
साडेसातीत... हवाहवासा दिलासा मिळणे ..अवघड दिसतंय - प्रश्नकुंडलीवरून तरी !!