म्हैसूरजवळच्या एका संग्रहालयातील ही छायाचित्रे. माझ्या मित्राकडे सापडली.
मी यातील अनेक गोष्टी प्रथमच बघितल्या होत्या. कदाचित तुमची ही पहिलीच वेळ असेल म्हणून शेअर करतोय :)
मोबाईल कॅमेर्याने काढल्यामुळे दर्जा मर्यादित आहे. सांभाळून घ्या.
कवड्यांचा मोहातून आदिमाया व सांब ही सुटले नाहीत; ना राजेरजवाडे ना सामान्य जन.
प्रतिक्रिया
17 Sep 2009 - 7:03 am | अभिजा
छान काहीतरी पाहायला मिळालं :-)
17 Sep 2009 - 7:57 am | नरेंद्र गोळे
बेहद्द खूश झालोय मी!
काय काय हुडकून आणताहेत लोक. वा!
अभिरत असाच भिरभिरत राहा, आमच्यासाठी!
17 Sep 2009 - 8:09 am | भाग्यश्री कुलकर्णी
फार सुरेख सचित्र संग्रहालयाची सफर घडवलीत.
17 Sep 2009 - 8:15 am | क्रान्ति
नुसत्या ऐकिवात असलेल्या बर्याच गोष्टी प्रथमच पहायला मिळाल्या!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
17 Sep 2009 - 8:50 am | संदीप चित्रे
पण शक्य असल्यास प्रत्येक फोटोखाली तो कुठल्या खेळाचा आहे ते द्याल का?
17 Sep 2009 - 9:15 am | अभिरत भिरभि-या
मलाही माहित नाहीत.
यातील द्रौपदीच्या चित्राखालचे चित्र गंजिफेचे तर शेवटून दुसरे सारीपाटाचे आहे. इतर चिंत्रांची नावे मलाही माहित नाहीत. :(
कानडीत पटके, अळिकट्टू (?) अशी काही नावे आहेत.
मराठीतील नावे व इतर माहिती आपणापैकी कोणास माहिती असल्यास सांगावी.
अभिरत
17 Sep 2009 - 9:50 am | मदनबाण
व्वा.फार छान फोटो आहेत.इथे दिल्याबद्धल धन्यवाद. :)
मदनबाण.....
पाकडे + चीनी = भाई-भाई.
Operation Alert:---
http://timesofindia.indiatimes.com/news/india/Indian-army-on-Operation-A...
17 Sep 2009 - 9:57 am | llपुण्याचे पेशवेll
आमच्या घरी आमच्या घरातला एक पिढीजात सारीपाट आहे. त्याला आमची आजी पट म्हणते. त्यात २ किंवा ३ फासे घेऊन खेळता येते. आम्ही २ फाशांचा पट खेळलो आहोत लहान असताना. हस्तीदंती फासे आहेत त्याचे. जर कधी कोकणात जाणे झाले इतक्यात तर फोटो काढून चिकटवीन या धाग्यावर.
(पत्ते-गांजिफांतला)
कार्डोबा प्लेअर
Since 1984
17 Sep 2009 - 4:13 pm | स्वाती२
छान!तो दुसरा फोटो लहानपणी फुली-गोळा खेळायचो तसे दिसतय. शेवटून तिसरे ल्युडो सारखे दिसते. माझ्या मित्राचे आजोबा पट खेळायचे.
17 Sep 2009 - 4:22 pm | सोनम
खूपच छान फोटो. सर्व फोटू पहिल्यादा पाहायला मिळाले :) :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"