अजब कहाणी आहे ही
अजब कहाणी आहे ही
कुठे सुरू कुठे सरे
ही ईप्सितेही कोणती
कळली न त्यास, ना मलाही ती
या उजेडासोबत हा का
धूर उठतसे दिव्यामधून
हे स्वप्न पाहते आहे मी
की जागले मी स्वप्नातून
शुभेच्छा तुला की तू
कुणाचा दीप जाहलास
कुणाच्या निकट तू एवढा
सगळ्यांच्या दूर जाहलास
कुणाचे प्रेम घेऊन तू
नवे जगच तू वसवशी
ही सांज येवो केव्हाही
मला जरूर तू आठवशील
अजब तर आहेच!
मात्र ओळखीची वाटतेय का, ते पाहा!!
प्रतिक्रिया
15 Sep 2009 - 8:18 am | क्रान्ति
हीच तर आहे ती कहाणी!
अनुवाद मस्त जमलाय गोळेकाका.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
15 Sep 2009 - 10:40 am | अमित बेधुन्द मन...
चालुदे अजुन येवुदे
15 Sep 2009 - 3:11 pm | अनिल हटेला
अजीब दास्तां है ये.......
कहा शुरु कहां खतम ....
क्या बात है .....आने दे और भी....:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
17 Sep 2009 - 7:39 am | नरेंद्र गोळे
अरे वा! ओळखू येणारी मंडळीही आहेत की!
क्रान्ति, अमित बेधुन्द मन, अनिल हटेला सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!!