एका १५ ऑगस्टला असाच कुलाब्याला सकाळी फिरत होतो. नेहमीचे माणसांनी ओसंडून वाहणारे पदपथ निवांत होते. कहर ढगाळ वातावरणामुळे फडकणा-या तिरंग्याचे फोटो काही मिळत नव्हते. मी हिरमुसलो! तेवढ्यात काही मुली हातात झेंड्यांचा जुडगा घेऊन फिरताना दिसल्या. रॅगपिकर्स मुलींचा तो चमू वरकमाई म्हणून त्या दिवशी येणा-या जाणा-यांना झेंडे विकत होता. सगळा ग्रुप एकदम उत्साही आणि हसतमुख! ही त्यांच्यातलीच एक सुहासिनी! :-)
आता हिचा फोटो काढायचा ठरवल्यावर तिला तात्पुरते खूष करणे क्रमप्राप्त होते, म्हणून आधी तिच्या कडून दोन झेंडे विकत घेतले. स्वारी खूष! मग उगाच दुसरीकडे कॅमेरा वळवून डमी क्लिक्स मारल्या, आणि त्यांना पण दिसेल अश्या पद्धतीने कॅमे-याच्या स्क्रीन वर पाहायला लागलो. "हमको भी दिखाओ ना" ...एकच कल्ला! मला तेच अपेक्षित होतं! त्यांनापण दाखवल्यावर एकमेकींकडे पाहात ’कितनी मजे की चीज़ है’ चे मूक अनुमोदन! तेवढ्यात मी हळूच विचारून घेतलं ,"तुम्हारा फोटु निकालू क्या?" नेकी और पूछ पूछ? - ह्या म्हणीचा अर्थ त्या वेळी मला खरा समजला. :-) फोटो सेशन सुरु!
तिला जरा उजेडात उभं राहाण्याची विनंती केली, आणि विविध भावमुद्रांचे १०-१२ फोटो काढले. फोटो काढताना गप्पा चालूच होत्या.
फोटो सेशन आधीची सगळी गप्पांची कवायत माझ्याविषयी थोडासा विश्वास निर्माण करण्यासाठी होती. एकदम गेलो असतो आणि फोटो काढायला सुरू केले असते तर, एकतर चेह-यावर मनमोकळे भाव मिळाले नसते, किंवा मार खाण्याची पाळी आली असती. फोटो काढून झाल्यावर तिला सगळे दाखवले स्क्रीन वर. आकाश ठेंगणे झाले होते तिला! सेशन संपल्यावर लक्षात आलं की आजूबाजूला 'बघे' जमले होते. त्या मुलीने माझ्या फोटो काढण्याविषयी जराशी सुद्धा नाराजी व्यक्त केली असती तर त्या बघ्यांपैकी काहींनी मला बुकलायला कमी केले नसते. रस्त्यावरील परक्या माणसांचे (विशेषत: मुलींचे) फोटो काढताना ब-यापैकी विश्वासात घ्यावे लागते, कंफर्ट झोनला धक्का लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते. आणि म्हणूनच आधी मनमोकळा ’संवाद’ साधावा लागतो. म्हाता-या माणसांचे फोटो काढायचे असतील तरी ही ट्रिक सही उपयोगात येते.
ह्याच मुलीचा मला आवडलेला एक फोटो मी माझ्या ब्लॉगवर पोस्ट केलाय.
फोटोग्राफीच्या तंत्राविषयी एखाद्या लेखाद्वारे, किंवा फोटोग्राफी इनस्टिट्यूटमध्ये, किंवा इंटरनेटवर कॅमे-याच्या तंत्राविषयी भरताड माहिती मिळते. पण ह्या असल्या प्रॅक्टिकल ट्रिका माहित नसतील तर त्या कॅमे-याविषयी तांत्रिक ज्ञानाचा काय उपयोग? फोटोग्राफीवर काहीतरी लिही असा काहींचा आग्रह होता. म्हणून हा माझा छोटासा अनुभव संक्षिप्तात शेअर केला. :-)
हे तिरंग्याचं चित्र पाहिल्यावर पं. विष्णूपंत पागनिसांनी १९२० साली गायलेलं, सारंग रागातील वंदे मातरम् गीत आठवलं. ते ऐकण्यासाठी इथे टिचकी मारा. (रॅम फाईल डाऊनलोड करा) इतकं जुनं रेकॉर्डिंग, पण डिजिटायझेशन कसं खडीसाखरेसारखं गोड आणि स्वच्छ, नितळ झालं आहे. कोणी व्यासंगी रसिकाने ह्या सुंदर गाण्यातील ’जागा’ समजावून दिल्या तर काय बहार येईल!
धन्यवाद! :-)
प्रतिक्रिया
15 Sep 2009 - 11:57 pm | प्राजु
सु.. रे... ख!!!!!!!
लेखनही आणि फोटोही.. आपल्या ब्लॉग वरचेही पाहिले आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Sep 2009 - 12:21 am | रेवती
मुलीचे फोटो सही आलेत!
तुमच्या ब्लॉगवरचा सगळ्यात छान!
त्या फोटोत तिचे मोत्यासारखे दात चांगले आलेत.:)
रेवती
16 Sep 2009 - 12:39 am | श्रावण मोडक
अभिजित, तुमच्या या प्रकाशचित्रांसाठी विशेषणे हुडकावी लागतात.
या मुलीचा चेहरा नंदिता दासच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता आहे ना?
16 Sep 2009 - 11:34 am | जे.पी.मॉर्गन
या मुलीचा चेहरा नंदिता दासच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता आहे ना?
- येकदम सहमत.
झकास प्रकाशचित्रे आणि ध्वनिमुद्रणही.
16 Sep 2009 - 7:05 pm | संदीप चित्रे
फोटो सुरेखच आहेत रे अभिजीत.
असेच उत्तमोत्तम फोटो काढत रहा.
16 Sep 2009 - 8:40 pm | अभिजा
धन्यवाद श्रावण!
होय, हा चेहरा पाहिल्यावर नंदिता दासचा भास होतो खरा! :-)
16 Sep 2009 - 12:54 am | चतुरंग
अतिशय जिव्हाळ्यानं काढलेली चित्रं आहेत. पहिल्या चित्रातलं नितळ हास्य आणि त्याहीपेक्षा दुसर्या चित्रामधल्या डोळ्यांतली निरागस मूक वेदना मला हलवून गेली!
तुमच्या ब्लॉगावरचंही चित्र फारच सुरेख, 'मोत्यांसारख्या दंतपंक्ती' ह्या फक्त कवितेतच नाहीत हे समजते! :)
(श्रामोंशी सहमत - नंदिता दासचा भास व्हावा असे काही फीचर्स आहेत.)
तुमचं लिखाणही छान आहे. अगदी सहज जाताजाता लिहिल्यासारखं
अजून येऊ दे.
चतुरंग
16 Sep 2009 - 8:05 am | लवंगी
खरच नंदिता दासचा भास होतोय.
16 Sep 2009 - 12:58 am | अनामिक
अप्रतिम फोटू!
तुमच्या ब्लॉगवरचे फोटूपण खूप सुंदर आहेत!
-अनामिक
16 Sep 2009 - 1:36 am | पाषाणभेद
मस्त रे भिडू
-----------------------------------
काय! तुमच्या घरी 'गोदरेज' च्या कपाटांवर सुटकेस, अडगळ सामान इ. ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
16 Sep 2009 - 8:11 am | sujay
मस्त रे भिडू
+१
-----------------------------------
आमच्या घरी 'गोदरेज' कपाटच नाही, नक्कीच आम्ही अतीनीच्च वर्गीय आहोत. ;) ;) ;)
16 Sep 2009 - 11:24 am | पर्नल नेने मराठे
+२
-----------------------
आमच्या घरी 'गोदरेज' कपाटच नाही, आम्ही वॉरड्रोब वापरतो. ;)
चुचु
16 Sep 2009 - 7:01 pm | टुकुल
+३
--टुकुल
16 Sep 2009 - 8:49 pm | सूहास (not verified)
फोटो छानच..
____________________________
आम्हाला घरच नाही ,सौताच कपाटात रहातो
सू हा स...
16 Sep 2009 - 7:51 am | सूर्य
सुंदर फोटो आहेत. तसेच स्माईलींग इंडिया सुद्धा बघितला. मुलीच्या चेहर्यावर सुंदर भाव टिपले गेलेत. मस्त आहे. आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. अजुन असेच येउद्या.
- शशांक
16 Sep 2009 - 7:59 am | सहज
अभिजा तुम्ही "एका फोटो(सेशन)ची कथा" अशी मालीकाच सुरू करा.
तुमचे फोटो, त्याची कथा, माहीती, रसग्रहण सगळेच आनंददायी.
अजुन येउ दे!
16 Sep 2009 - 11:49 am | नंदन
सहमत आहे. फोटो आणि लेख दोन्ही उत्तम.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 Sep 2009 - 8:01 am | विसोबा खेचर
छान आहे हो मुलगी! :)
16 Sep 2009 - 8:20 am | चित्रा
बोलके आहेत, जिवणीही गोड.
फोटो जरा अंतर्मुख करून गेले. छानच.
16 Sep 2009 - 9:09 am | llपुण्याचे पेशवेll
फटू आणि लेख दोन्ही छान..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
16 Sep 2009 - 9:14 am | अवलिया
फटू आणि लेख दोन्ही छान..
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
16 Sep 2009 - 10:01 am | JAGOMOHANPYARE
सुन्दर फोटो..
16 Sep 2009 - 11:55 am | सुबक ठेंगणी
एकदम जिवंत फोटो!
पण डिजिटायझेशन कसं खडीसाखरेसारखं
हे वाक्य खूप आवडलं :)
तुम्ही दिलेलं सारंग रागातलं वंदे मातरम नाहिये ऐकलं अजून. पण मला फार पूर्वी ऐकलेलं संघाचं देस रागातलं वंदे मातरम आवडतं. कुणाकडे लिंक आहे का?
16 Sep 2009 - 12:22 pm | प्रसन्न केसकर
तिचा काही इतिहास सांगितला का? हा चेहरा खूप ओळखीचा वाटतोय.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
16 Sep 2009 - 3:06 pm | मदनबाण
सुंदर फोटो... :)
आपण मूळ चित्रात कोणते व कसे बदल करतात ते जाणुन घेण्यास उत्सुक आहे,त्या विषयी आपण अधिक माहिती देवु शकाल काय?
मदनबाण.....
पाकडे + चीनी = भाई-भाई.
http://www.timesnow.tv/videoshow/4327416.cms
16 Sep 2009 - 8:24 pm | अभिजा
मदनबाण,
मी रॉ फॉरमॅटमध्ये इमेजेस शूट करतो. त्यामुळे मला ती चित्रं फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये घेऊन त्या चित्रातील डिजिटल नॉईज, ब्राईटनेस, काँट्रास्ट, शार्पनेस, कलर सॅचूरेशन इ. गोष्टी लेव्हल मध्ये आणाव्या लागतात. जेव्हा जेपेग किंवा टिफ फॉरमॅटमध्ये शूट केले जाते, तेव्हा वरील अॅडजस्टमेंट्स कॅमे-यातच होतात. ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे हो. इथे थोडक्यात नाही समजावता येणार! सॉरी!:-(
16 Sep 2009 - 8:43 pm | चतुरंग
लिहा असं म्हणतो आहोत आम्ही सगळे! :)
खरंच तुमचे कौशल्य हे लोकांसमोर येऊ देत. लिखाणातून आम्हालाही बारकावे शिकायला मिळतात. थोडीफार आमच्याही फोटोग्राफीत चार पिक्सेल्सची भर पडेल म्हणतो! ;)
(उत्सुक)चतुरंग
16 Sep 2009 - 5:30 pm | सायली पानसे
सुंदर फोटो आणि ब्लॉग वरचे सगळेच फोटो सुरेख आहेत.
16 Sep 2009 - 5:56 pm | स्वाती२
सुरेख फोटो आणि लेख. दुसर्या फोटोतले डोळे.. आता दिवसभर आठवत राहतील.
16 Sep 2009 - 8:13 pm | अभिजा
प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनःपूर्वक आभार! :-)