भय तिचे संपलेच नाही

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
13 Sep 2009 - 10:52 am

दोन मैत्रिणी वरती बघती
डब्बे उंच रुळावर फ़िरती
नागमोडी रांगांतुनी खाली
गर्दी बघते उत्सुकलेली

भय इथले संपतच नाही
एक बोलली भयांकीतशी
सखी तिची ऐकेना काही
धीर देऊनी तिजला नेई

गोलगोल रुळांवर फ़िरुनी
चहुबाजुला रम्य पाहुनी
वेगाची बहु नशा घेऊनी
परी सम झाल्या दोघीजणी

मी तुला म्हटले नाही?
भिऊ नको मुळीच बाई
धिटावली आता पहीलीही
म्हणे काय मस्त मजाही

भराभरा उंचावर नेई
क्षणात खाली झोकून देई
ओरडणे हसणेही काही
धडधडाटी विरून जाई

रूळ तिरके कोनात मांडले
उंच उंच चढ चढू लागले
खडखड गडगड डबे चालले
शिखर बळे गाठून थबकले

श्वास रोखूनी सारे बघती
भयावह उतरंड समोरची
उतरल्या वर चढून जाती
वेढी तीन अन उलटी पलटी

जीव जणू घशात अडकला
गाडीने झणी वेग पकडला
उतरून लागे पुन्हा चढाया
गोल गोल कोलांट्या घ्याया

आधी जी भीऊन म्हणाली
भय इथले संपतच नाही
उंचावून दोन्ही हात ठेवी
मजेत खिदळत वेढे घेई

सखी धीर देणारी मात्र ती
थीजून बसली जीभ काढती
छळ इथला संपेल का कधी
भय इथले संपत का नाही?

हाडे खुळखूळवून सर्वांची
दुष्ट गाडी थांबे एकदाची
उड्या मारूनी भराभरा ती
सर्व उतरली मजे खिदळती

पहीली म्हणते पुन्हा घेऊ ही?
मजा मस्त नच भीती काही
दुसरी अजून सुन्नशी पाही
भय तिचे संपलेच नाही

*****************

कविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

13 Sep 2009 - 11:30 am | पाषाणभेद

वेगळा विषय. छान कविता.
रोलर कोस्टरवर तिची काय अवस्था झाली हे खालील सहाव्या छायाचित्रात बघा.
http://www.photopumpkin.com/photo-blog/the-after-effects/

-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

श्रावण मोडक's picture

13 Sep 2009 - 1:02 pm | श्रावण मोडक

चांगली आहे, असे म्हणण्याचीही भीती वाटली!!!

मदनबाण's picture

13 Sep 2009 - 1:50 pm | मदनबाण

हाडे खुळखूळवून सर्वांची
दुष्ट गाडी थांबे एकदाची
उड्या मारूनी भराभरा ती
सर्व उतरली मजे खिदळती
:D

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

रेवती's picture

13 Sep 2009 - 8:12 pm | रेवती

भयानक असतो हा प्रकार! मी एकदाच रोलर कोस्टरमध्ये बसले आणि पुन्हा न बसण्याची प्रतिज्ञा केली. सगळा प्रकारच वाईट्ट होता आणि लोक ते एंजॉय करत होते. एका राउंड नंतर ती गडगडणारी गाडी थांबली, मला वाटले की आता सुटका होणार पण काही सेकंदातच पुन्हा सुरू ......आणि आपले फोटू घेऊन चेष्टा करताहेत असं वाटत होतं. पाण्यातून जाताना ते फवारे आणि मधेच बॉम्बब्लास्ट होण्याचे आवाज यांनी पुरती घाबरून तिथून बाहेर पडले.

रेवती

क्रान्ति's picture

13 Sep 2009 - 9:56 pm | क्रान्ति

वाचून प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याचा थरार जाणवला! @)

[एरवी नुसता फिरता पाळणा पाहिला, तरी भिती वाटते आणि चक्कर येते!] :''(

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

पाषाणभेद's picture

13 Sep 2009 - 10:07 pm | पाषाणभेद

काही होत नाही हो. बसायचे व डोळे मिटायचे भिती वाटत असेल तर. बिंन्धास. दुसर्‍यांदा तुम्हीच तिकीटांच्या लाईनीत पुढे असाल.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या