माझेच ग्रह तारे

फ्रॅक्चर बंड्या's picture
फ्रॅक्चर बंड्या in जे न देखे रवी...
10 Sep 2009 - 3:06 pm

तोंडी लावायला चंद्र अन चांदण्याची चटणी
मिरचीची गरज नाही, डाळीला सुर्याची फोडणी

राहु अन केतु जरा जास्तच तिखट गडे
राहुचे करु भजे अन त्या केतुचे वडे

शनी जाणारच नाही कधी आपल्या वाटेला
जिलेबीसारखी त्याची कडीच लावु आपण ताटाला

बाकीच्या लघुग्रहांना श्रीखंडात टाकु
अन मग जोडीने श्रीखंड पुरी चाखु

आख्खी पृथ्वी ठेवली असती तुझ्या हातावर
पण मग काय ठेवणार शेषनागाच्या डोक्यावर

जरी असतील आपल्या घराला पत्रे
तुझ्या दिमतीला ठेविन सगळी नक्षत्रे

बाकीचे ग्रह असुदे ना सये आकाशात
रातीला एखादा तरी चमकेल ना तुझ्या डोळ्यात

माझ्या परिवलानाचे कारण पण तुच
अन परिभ्रमणाचा केंद्रबिंदु पण तुच

कळतय ना तुझ्या-माझ्यातले आकर्षण
जसे सुर्य अन पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण

कविता

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

10 Sep 2009 - 3:12 pm | चिरोटा

कळतय ना तुझ्या-माझ्यातले आकर्षण
जसे सुर्य अन पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण

न्युटन बहुदा त्याच्या प्रेयसीला हेच म्हणाला असता.!
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

अवलिया's picture

10 Sep 2009 - 3:13 pm | अवलिया

शनी जाणारच नाही कधी आपल्या वाटेला

कविराजांच्या ह्या क्लेमवर युयुत्सुरावांनी प्रकाश टाकावा.

आख्खी पृथ्वी ठेवली असती तुझ्या हातावर
पण मग काय ठेवणार शेषनागाच्या डोक्यावर

दुर्बिटणे बै ! हे शक्य आहे का ?

कळतय ना तुझ्या-माझ्यातले आकर्षण
जसे सुर्य अन पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण

या पंक्तिवर प्रभुमास्तरांनी टिपण्णी करावी

गृह आणी ग्रह समानार्थी शब्द असल्याची नोंद शब्दभांडारनियंत्रकांनी घ्यावी !

बाकी गंमत बाजुला, मस्त कविता ! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विनायक प्रभू's picture

10 Sep 2009 - 6:52 pm | विनायक प्रभू

अरेरे काय बोलणार.
एवढ्या लांब लांब राहाणार?

मदनबाण's picture

10 Sep 2009 - 3:21 pm | मदनबाण

बाकीचे गृह असुदे ना सये आकाशात
रातीला एखादा तरी चमकेल ना तुझ्या डोळ्यात
मस्त...
माझ्या परिवलानाचे कारण पण तुच
अन परिभ्रमणाचा केंद्रबिंदु पण तुच
जबरदस्त... :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

सुबक ठेंगणी's picture

10 Sep 2009 - 3:26 pm | सुबक ठेंगणी

बाकीचे गृह असुदे ना सये आकाशात
रातीला एखादा तरी चमकेल ना तुझ्या डोळ्यात

हे खूप सुंदर! :)

परत एकदा शेक्सपिअर आठवला
Let me not to the marriage of true minds
Admit impediments. Love is not love
Which alters when it alteration finds...

अभिज्ञ's picture

10 Sep 2009 - 3:28 pm | अभिज्ञ

जबर"दस्त"
कविता फारच जबरदस्तीने लिहिल्यासारखि वाटतेय.
पुलेशु.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

दत्ता काळे's picture

10 Sep 2009 - 5:18 pm | दत्ता काळे

शनी जाणारच नाही कधी आपल्या वाटेला.
- कालंच रात्री बारा वाजता शनीपालट झाला आहे.
कल्जी घेने.

संदीप चित्रे's picture

11 Sep 2009 - 1:05 am | संदीप चित्रे

>> आख्खी पृथ्वी ठेवली असती तुझ्या हातावर
पण मग काय ठेवणार शेषनागाच्या डोक्यावर

बाकीचे ग्रह असुदे ना सये आकाशात
रातीला एखादा तरी चमकेल ना तुझ्या डोळ्यात

माझ्या परिवलानाचे कारण पण तुच
अन परिभ्रमणाचा केंद्रबिंदु पण तुच

>>
ह्या ओळी आवडल्या

प्रशांत उदय मनोहर's picture

11 Sep 2009 - 8:59 am | प्रशांत उदय मनोहर

आख्खी पृथ्वी ठेवली असती तुझ्या हातावर
पण मग काय ठेवणार शेषनागाच्या डोक्यावर

=))

आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
विल पॉवर कमी झाली की विल्स पॉवर वाढते :?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

दशानन's picture

11 Sep 2009 - 9:04 am | दशानन

क्या बात है !

=D>

सुरेख !

युयुत्सु's picture

11 Sep 2009 - 9:41 am | युयुत्सु

आवडली.

फक्त एक सूचना

"तुझ्या दिमतीला ठेविन सगळी नक्षत्रे" ऐवजी

"ठेविन तुझ्या दिमतीला सगळी नक्षत्रे" किंवा

" तुझ्या ठेविन दिमतीला सगळी नक्षत्रे" असा बदल केल्यास जास्त समर्पक वाटेल

युयुत्सु's picture

11 Sep 2009 - 9:43 am | युयुत्सु

आवडली.

फक्त एक सूचना

"तुझ्या दिमतीला ठेविन सगळी नक्षत्रे" ऐवजी

"ठेविन तुझ्या दिमतीला सगळी नक्षत्रे" किंवा

" तुझ्या ठेविन दिमतीला सगळी नक्षत्रे" असा बदल केल्यास जास्त समर्पक वाटेल

फ्रॅक्चर बंड्या's picture

11 Sep 2009 - 10:50 am | फ्रॅक्चर बंड्या

धन्यवाद
तुम्ही सांगितलेले बदल नक्कीच करेन

हृषीकेश पतकी's picture

11 Sep 2009 - 1:49 pm | हृषीकेश पतकी

थेट अंतरीक्ष गाठलंत..
प्रेम भलतंच उत्तुंग दिसतंय...
:O
आपला हृषी !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2009 - 10:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असं काही करू नका प्लीज!

(नोकरीच्या काळजीत) अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

12 Sep 2009 - 9:14 am | प्रकाश घाटपांडे

शनी जाणारच नाही कधी आपल्या वाटेला

शनी अक्षरांतच किती ताकद आहे ना! म्हणुन लोकांना त्याची भीती वाटते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रभाकर पेठकर's picture

12 Sep 2009 - 10:05 am | प्रभाकर पेठकर

मस्त कविता. अभिनंदन.

'जे न देखे रवी, ते देखे कवी' ह्या उक्तीचा अर्थ प्रकर्षाने जाणवला.

असेच प्रियकर-प्रेयसी म्हणून जगा. नवरा-बायको होण्याच्या फंदात पडू नका. नाहीतर सर्व काव्यप्रतिभा दावणीला बांधल्यासारखी केविलवाणी होऊन 'व्यक्तीसापेक्ष' कविता कराव्या लागतील.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.