आणि त्यावर म्हणा..

शाहरुख's picture
शाहरुख in जे न देखे रवी...
9 Sep 2009 - 7:41 am

मरा
मारा
आणि त्यावर म्हणा
भारत माझा देश प्यारा

खा
खिलवा
आणि त्यावर म्हणा
या भ्रष्टाचाराला घालवा

थुंका
पचका
आणि त्यावर म्हणा
सगळ्यांनी स्वच्छता राखा

पाडा
ढकला
आणि त्यावर म्हणा
सगळ्यांनी रांगेतनं चला

मी तर म्हणतोयच
आणि त्यावर तुम्हीही म्हणा..

-- कवी शाहरुख

कविता

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

9 Sep 2009 - 8:35 am | अरुण मनोहर

डोळे उघडणारी कविता.
अवांतर-
"आणि त्यावर तुम्हीही म्हणा..
-- कवी शाहरुख" म्हटले "कवी शाहरुख!"

पाषाणभेद's picture

9 Sep 2009 - 8:50 am | पाषाणभेद

थोडक्यात छान विवेचन केले सद्य स्थितीचे.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

क्रान्ति's picture

9 Sep 2009 - 8:53 am | क्रान्ति

मस्त कविता.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

अवलिया's picture

9 Sep 2009 - 9:30 am | अवलिया

मस्त !!!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज's picture

9 Sep 2009 - 10:05 am | सहज

मस्त!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Sep 2009 - 10:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

समयोचित आणि मस्त!

अदिती

श्रावण मोडक's picture

9 Sep 2009 - 11:06 am | श्रावण मोडक

+३

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Sep 2009 - 9:25 pm | बिपिन कार्यकर्ते

+४

बिपिन कार्यकर्ते

दशानन's picture

10 Sep 2009 - 9:03 am | दशानन

+५

:)

अमोल केळकर's picture

9 Sep 2009 - 10:30 am | अमोल केळकर

मारा
जाळा
पेटवा
आणि त्यावर म्हणा
इतरांनी शांतता राखा
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

प्राजु's picture

9 Sep 2009 - 9:54 pm | प्राजु

हम्म!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

10 Sep 2009 - 12:11 am | बेसनलाडू

(वाचक)बेसनलाडू

धनंजय's picture

10 Sep 2009 - 1:21 am | धनंजय

थोडक्यात आणि प्रभावी.

चतुरंग's picture

10 Sep 2009 - 2:16 am | चतुरंग

(मम)चतुरंग

छोटा डॉन's picture

13 Sep 2009 - 5:53 pm | छोटा डॉन

असेच म्हणतो

------
(आत्मना)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

सुधीर काळे's picture

10 Sep 2009 - 7:50 am | सुधीर काळे

शहारुखभाई,
आदाब अर्ज है, जनाब! बहोत खूब.
देर आये, दुरुस्त आये.....
खूप आवडली आपली कविता. असेच लिहीत जा.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

प्रशांत उदय मनोहर's picture

10 Sep 2009 - 8:36 am | प्रशांत उदय मनोहर

कविता आवडली.
विं.दा. करंदीकरांच्या कवितेची आठवण झाली/
आपला,
(वाचक) प्रशांत
---------
विल पॉवर कमी झाली की विल्स पॉवर वाढते :?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

प्रकाश घाटपांडे's picture

10 Sep 2009 - 8:45 am | प्रकाश घाटपांडे

जे गद्याने सांगुन होणार नाही ते एका कवितेतुन व्यक्त करता येते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

फ्रॅक्चर बंड्या's picture

10 Sep 2009 - 6:35 pm | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच

ऋषिकेश's picture

10 Sep 2009 - 9:16 pm | ऋषिकेश

कविता आवडली

ऋषिकेश
------------------
रात्रीचे ९ वाजून १२ मिनीटे झालेली आहेत. आता वेळ आहे जाहिरातीची "जागो जागो जागो जागो .. जागो रेऽऽ...."

सही जगाह पर ... सही निशाना !!
हमारे मुल्क में, ऐसे देशप्रेमी बहोत मिलेंगे ..
(मिरज मध्ये दंगल झाली लागलीच मिपावर पण लोण आणा ..)
जो कर रहें तिजारत ( व्यवसाय / Business /trade) लडाई दंगों की .. :-(
ऐसे सियासती लोगोंसे परहेज रखना, यह हमारी छोटीसी गु़जारीश ...
~ वाहीदा
था कहां नसीब, दिल को येह सुरूर बेखुदी का
तेरे तीरे नीमकश ( half - drawn arrow) ने दिखा दिया आईना जिंदगी का ....

विसोबा खेचर's picture

13 Sep 2009 - 5:35 pm | विसोबा खेचर

थुंका
पचका
आणि त्यावर म्हणा
सगळ्यांनी स्वच्छता राखा

हम्म!

पण कविता आवडली! :)

तात्या.

शाहरुख's picture

13 Sep 2009 - 7:55 pm | शाहरुख

>>पण कविता आवडली! Smile

:-)

मला केर टाकणे, घाण करणे यासाठी शब्द सुचला नाही, म्हणून मग 'थुंका' आणि 'पचका' असे दोनदा वापरावे लागले.कोणी असा शब्द सुचवेल का ?

सर्वांचे आभार..