आजकाल कुठेही, कसाही...; पण पाय माझा घसरतो...........
सोकावलेला सहकारी नेहमी सांगतो
अंडर द टेबल व्यवहार करायला शिक
आदर्श, नितीमत्ता आणि सोकॉल्ड संस्कार
अलगद वेशीवर टांगायला शिक
मी कसाबसा स्वत: ला तयार करतो
संस्कारांना मनाच्या अंधार्या कोपर्यात कोंबतो
नेमकं तेव्हाच माझाच आरशातला चेहरा ...
माझ्याकडे पाहून खुदकन हसतो .....
.........................आणि पाय माझा घसरतो !
चालता चालता मी हजारवेळा थबकतो
रस्त्यावरची चालती-बोलती सौंदर्यस्थळे पाहून
नकळत जिव माझा कसानुसा होतो
त्यांच्याकडे पाहत मी स्वतःलाच समजावतो
परस्त्री मातेसमान हे आता विसरायला हवं
असं म्हणत स्वतःलाच फसवायला बघतो
नजरा चुकवत मान वळवून न्याहाळताना
नेमका तिथेच मला आईचा चेहरा दिसतो
........................आणि पाय माझा घसरतो !
हाऊसफुल्लच्या रांगेत नकळत मी
कुणीतरी ब्लॅकवाला शोधायला लागतो
यम-नियमाच्या व्याख्या बदलू पाहतो
हळुच बायकोच्या वटारलेल्या डोळ्यात पाहतो
शेजारच्या रांगेतला पहिलीतला पोरगा
हातवारे करत आईला साभिनय सांगतो...
काल आम्हाला बाईंनी शिकवलं...
"भारत माझा देश आहे .......
.......................आणि पाय माझा घसरतो !
इकडे तिकडे बघत मी ताठ मानेने पुन्हा रांग लावतो
कारण मनापासुन सांगतो....
वारंवार पाय घसरण्याचा हा अनुभव मला खुप सुखावून जातो !
विशाल.
प्रतिक्रिया
9 Sep 2009 - 10:47 am | प्रभाकर पेठकर
'पाय घसरतो' कि 'घसरलेला सावरतो'?
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
9 Sep 2009 - 10:53 am | अमोल केळकर
सुंदर
'मी माझा ' वाल्या गोखल्यांची आठवण आली
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
10 Sep 2009 - 5:22 pm | विजुभाऊ
वाल्या गोखल्यांची आठवण आली
ठ्यॉ.........वाल्या कोळ्या नन्तर वाल्या गोखल्या ;)
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
9 Sep 2009 - 10:54 am | विशाल कुलकर्णी
पेठकरकाका, आजकालच्या सोकॉल्ड मॉडर्न युगात या सावरण्यालाच घसरणे म्हटले जाते. आज भ्रष्टाचार हा आचार आहे, अनीती ही नितीमान आहे. तेव्हा त्यातुन सावरणे हे आजच्या युगात घसरणेच ठरेल ना. ;-)
म्हणुनच मी म्हणतो की हे जर घसरणे असेल तर ते मला सुखावणारेच आहे. मग रोज हजार वेळा घसरलो तरी चालेल. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
9 Sep 2009 - 11:00 am | प्रभाकर पेठकर
स्पष्टीकरण पटले नाही. पण असो.
आज भ्रष्टाचार हा आचार आहे, अनीती ही नितीमान आहे.
त्याचा स्वीकार करून 'घसरणे' आणि 'सावरणे' ह्या शब्दांचा पारंपारिक अर्थ आपण बदलू लागलो तर नव्या 'पिढीने नितिमत्ता सोडली' असा आरोप करायचा अधिकार मागच्या पिढीला उरत नाही. आणि एकूण सामाजिक नितिमत्तेच्या घसरणीत आपणही हातभार लावत आहोत असेच म्हणावे लागेल.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
9 Sep 2009 - 11:49 am | अजुन कच्चाच आहे
आज भ्रष्टाचार हा आचार आहे, अनीती ही नितीमान आहे
खरे आहे.
मी खोटे बिल देत नाही असे सांगीतले की पुढच्याचा चेहरा अगदी 'हा हंत हंत' टाइप होऊन जातो लगेच.
...............
अजून कच्चाच आहे.
(त्यामुळे सध्या आमचा भ्रष्टाचार विरोध 'न घेण्या पुरताच' आहे)
9 Sep 2009 - 11:22 am | विशाल कुलकर्णी
पेठकरकाका, अहो ही उपहासात्मक कविता आहे. फक्त शब्दांची उलटापालट आहे. या अशा परिस्थितीतही आपले संस्कार, आदर्शच अजुनही प्रभावी आहेत आणि आपण ते विसरलेले नाही आहोत, विसरु शकत नाही हेच ही कविता अधोरेखित करते.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
9 Sep 2009 - 9:27 pm | अश्विनीका
छान आहे कविता. त्यातला उपहास आवडला.
>>आणि पाय माझा घसरतो
या ऐवजी 'आणि माझा पाय घसरतो ' हे मला लयीत वाटत आहे.
- अश्विनी
10 Sep 2009 - 11:54 am | हृषीकेश पतकी
उपहास आवडला..
पण तो उपहासच राहावा हीच सदिच्छा..
आपला हृषी !!
10 Sep 2009 - 11:56 am | बेसनलाडू
(वाचक)बेसनलाडू
10 Sep 2009 - 11:59 am | एकलव्य
मस्त रे! असाच घसरत रहा... झोपेला चांगले असते. ;)
10 Sep 2009 - 12:15 pm | सायली पानसे
छान कविता. एकदम मस्त!