जगणार्याला मरणाची ओढ
अन मरणार्याला जगण्याची ओढ
नास्तिक म्हणुन जगलो आयुष्यभर
म्हातारपणी आता मला देवघराची ओढ
नाही साधले काहीच फिकट जगुन
कापसाला आता मात्र वातीची ओढ
आयुष्य गेलो मुडद्यासारखे जगत
अन माझ्या मुडद्यालाही आता जिवणाची ओढ
दु:खेच आली सदैव नशिबी
माझ्या सुखांना सुद्धा दु:खाची ओढ
सहन नाही होत हे जगणे असले
माझ्या मढ्याला मात्र आता सरणाची ओढ
आठवणींचा किती हा पसारा,
का माझ्या वर्तमानाला भुतकाळाची ओढ
भुतकाळातच रुतुन पडलोय
वर्तमानाला मात्र भविष्याची ओढ
गेल्यावर जगातुन काय उरेल मागे
माझ्या मरणाला आता मागे उरण्याची ओढ
प्रतिक्रिया
7 Sep 2009 - 11:08 am | महेश काळे
7 Sep 2009 - 3:28 pm | अमित बेधुन्द मन...
हि ओढ कधिच सम्पत नाहि खरच.........
अप्रतिम
पुन्हा मी माझा अमित