औडिओ कसेट्स मधील ध्वनीमुद्रणाचा कायाकल्प (!)

वारकरि रशियात's picture
वारकरि रशियात in काथ्याकूट
4 Sep 2009 - 2:11 pm
गाभा: 

रामराम मंडळी,
जवळजवळ दररोज मिपा वर वाचनमात्र असतो, पण आज बर्याच दिवसांनी येथे लिहितो आहे.

माझ्या संग्रही काही दुर्मिळ - लाइव्ह ध्वनीमुद्रणे आहेत. (उदा. मालिनीबाईंची सातारा येथील मैफल, गजाननबुवांचे व्हायोलिन इ. तसेच काही अधिकारी व्यक्तींची गीता, भागवत इ. वरील प्रवचने ) पण ही सर्व ध्वनीमुद्रणे जुन्या काळातली असल्याने औडिओ कसेट्स वर आहेत. अनेकवार वाजवून आणि कालमानाने हळूहळू या औडिओ कसेट्स खराब होत जातील. त्यांचे दीर्घकाळ जतन व्हावे व आस्वाद घेता यावा म्हणून अधिक खराब होण्यापूर्वी ही सर्व ध्वनीमुद्रणे सी.डी. वर घ्यावीत असा विचार आहे.

मला या तंत्राविषयी काहीच माहिती नाही.
१) घरी (पी. सी. + आंतरजाल + कसेट्स प्लेयर आहे. ) असे करता येइल का? (असे करता येऊ शकेल असे काही सोफ्टवेअर असते का?)
२) असे करून देणारी काही यंत्रणा आहे का? (शक्यतो मुंबई / ठाणे / डोंबिवली परिसरात) अंदाजे खर्च किती येइल?
३) आपणापैकी कोणी असे (ध्वनीमुद्रणाचा कायाकल्प !) करून घेतले आहे का?
४) यासंदर्भात या शिवाय अधिक माहिती

वारकरि

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

4 Sep 2009 - 2:23 pm | घाटावरचे भट

तुम्हाला खालील गोष्टी लागतील -
१) एक उत्तम कॅसेट प्लेयर, ज्याच्या मोटर, हेड वगैरे कशातूनही नॉइज येत नाही आणि ज्याला हेडफोनचे सॉकेट आहे.
२) एक कंप्यूटर
३) लाईन इन केबल (५० रु. पर्यंत मिळायला हरकत नाही)
४) ऑडियो रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर (Audacity हे फुकट मिळते पण ते स्टेबल नाही. बाकीची विकत मिळणारी महाग आहेत. अन्यथा पायरेटेड, जे मी सुचवू इच्छित नाही)

कॅसेट प्लेयर मधे कॅसेट टाका. लाईन इन केबलचा एक प्लग कॅसेट प्लेयरच्या हेडफोन सॉकेटात घाला. दुसरा प्लग तुमच्या कंप्यूटरच्या माईक अथवा लाईन-इन सॉकेटात घाला (हे बहुतेकवेळा कंप्यूटरच्या मागील बाजूस असते). विंडोज एक्सपी वगैरे वापरत असाल तर अ‍ॅडव्हान्स्ड ऑडियो कंट्रोल मधे जाऊन रेकॉर्डींग डिव्हाईस माईक्/लाईन-इनला सेट करा. रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर उघडा, फाईल->न्यू वर क्लिक करा आणि कॅसेट प्लेयर प्ले करून सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्डचे बटन दाबा. कॅसेट जशी वाजेल तसं सगळं कंप्यूटरवर रेकॉर्ड होईल. संपलं की एमपी३ अथवा तत्सम फॉर्मॅटमध्ये साठवून ठेवा. गरज लागल्यास हा दुवा पहा

दिपक's picture

4 Sep 2009 - 2:56 pm | दिपक

म्यु्झीकमॅच वापरुन बघा. मी आधी वापरले आहे.

प्रदीप's picture

4 Sep 2009 - 7:36 pm | प्रदीप

"लाईन इन केबलचा एक प्लग कॅसेट प्लेयरच्या हेडफोन सॉकेटात घाला".

ऑडियो कॅसेट रेकॉर्डरला 'लाईन आऊट' असेल, तर ते वापरावे. हेड्फोन आउटपुट शक्यतो टाळावे. (आजकाल 'लाईन आउट' असलेले रेकॉर्डर्स मिळत नाहीत, तसे असल्यास अगदी नाईलाज म्हणून हेडफोन आउट वापरावा).

मी अशी केबल बनवून घेतली.
कॅसेटप्लेअरचा लाईनऑऊट व पी.सी.चा लाइनइन जोडले.
म्युझीकमॅच ज्यूकबॉक्स सॉफ्टवेअर वापरून असंख्य गाणी केसेटमधून पी.सी.वर एम्.पी.३ स्वरूपात रेकॉर्ड केली.

आणखी एक उपाय म्हणजे, वरिल जोडणी करून पी.सी. मोकळा असताना हे रेकॉर्डींग चालू करावे. ४५ मि. ची एक बाजू सलङ रेकॉर्ड करावी, जेणेकरुन एक सलग एम्.पी.३ गाणे तयार होईल.
त्यानंतर वेळ असेल तेव्हां mp3dierctcut software वापरुन गाणी वेगवेगळी करावीत. ह्याच सॉफ्टवेअरने गाण्यातले दोष (जसे हिस्सिंग वगैरे) हि कमी करता येतात.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

घाटावरचे भट's picture

4 Sep 2009 - 11:28 pm | घाटावरचे भट

लाईन आऊट/ऑक्स वगैरे आऊटपुट्स साध्या लहान प्लेयर्स नसतात असं एक निरीक्षण आहे. जर तुमच्या कडे टेपडेक वगैरे असेल तर त्याला लाईन आऊट असण्याची शक्यता जास्त आहे. साधारण शास्त्रीय संगीत वगैरे रेकॉर्ड करण्यासाठी १०००० हर्ट्झपर्यंतचा फ्रीक्वेन्सी बँड पुरतो असा माझा अनुभव आहे. जर थोडी अलिकडच्या काळातली गाणी रेकॉर्ड करायची असतील तर मात्र उत्तम फ्रीक्वेन्सी रिस्पॉन्स असलेला (साधारण २० हर्ट्झ-१५ किलोहर्ट्झ) प्लेयर/रेकॉर्डर वापरावा. पण लाईन आऊट असलेलं कधीही उत्तमच. हेड्फोन ज्याकापर्यंत जाताना आवाज बराचसा अ‍ॅटेन्युएट होतो आणि फायडेलिटी काहीशी घसरते. लाईन आऊट मुळे अत्यंत डीप असा साऊंड मिळतो.

या धाग्यात लिहिलेले एकूणात बरेच दोष ध्वनिमुद्रणाशी फारशी न मारता प्रोसेसिंग करून काढता येतात, पण ते वेळखाऊ काम आहे. सबब ज्याने त्याने आपल्या सोयीनुसार निर्णय घेणे श्रेयस्कर.

प्रदीप's picture

5 Sep 2009 - 9:10 am | प्रदीप

असावयास ओपन रील डेक असावयास पाहिजे असेच काही नाही. कॅसेट डेक्सनाही ते असतात, पण अलिकडे आमच्या येथे तरी उपलब्ध असलेले जे छोटे कॅसेट डेक्स बाजारात आहेत, त्यात दुर्दैवाने ही सुविधा नसते. ते 'पोर्टेबल डेक्स' ह्या सदरात येतात. भारतातही लाईन आउट असलेले नवे डेक्स मिळणे बहुधा आता कठीण झाले असावे. तरी कुणाकडे थोडासा जुना डेक असलाच, तर उत्तम.

<<या धाग्यात लिहिलेले एकूणात बरेच दोष ध्वनिमुद्रणाशी फारशी न मारता प्रोसेसिंग करून काढता येत">> [प्लेयरची लाईन आउट]-->-[पी. सी. ची लाईन इन] ह्यात लेवल्सच्या रेंजचे मॅचिंग झालेले असते. त्याउलट [हेडफोन आउट] हा 'पॉवर आउट' असतो (कारण त्याला चक्क स्पीकर ड्राईव्ह करायचा असतो) व त्याची लेव्हल फारच उच्च (हाय) असते. ती पी. सी. च्या लाईन इन मध्ये घातली की सिग्नल डिस्टॉर्ट होतो, (थर्ड हार्मोनिक वगैरे....) ही प्रक्रिया इर्रिव्हर्सिबल आहे. काही बिघाड काहीतरी प्रक्रिया करून सुधारता येत नाहीत. वरील उदाहरण त्यातील एक, वाईट काँप्रेशन एनकोडिंगमुळे झालेले बिघाड हे दुसरे. [खरे तर सगळ्याच काँप्रेशन एनकोडिंगमध्ये बिघाड होतोच, पण 'चांगल्या कोडिंग'मधे तो जाणवत नाही, 'वाईट कोडिंग'मधे तो जाणवतो. असो. हे खूप तांत्रिक झाले. ह्यासंबंधी खरडी अथवा व्य. नि. तून चर्चा करता येईल, अथवा निराळ्या धाग्यातून].

संजय अभ्यंकरांनी जी केबल वापरली आहे, तिच्या दोन्ही टोकांना आर. सी. ए. जॅक्स असतात, म्हणून तिला सर्वसाधारणपणे 'आर. सी. ए टू आर. सी. ए'. केबल असे म्हटले जाते. लॅमिंग्टन रोडच्या बाजारात अशी केबल उपलब्ध असावी.

माझ्याकडेही अनेक जुन्या कॅसेट्सवर अजून बरेच काही आहे. पण जुना कॅसेट डेक मोडकळीत काढल्यानंतर नव्या डेक्सना 'लाईन आउट'ची सोयच उपलब्ध नाही, आणि हेडफोन आउट वापरवत नाही, अशी माझी गोची झाली आहे.

मीही संजयांप्रमाणेच म्युझिकमॅचचे जॅकबॉक्स हे अ‍ॅप्लिकेशन वापरतो.

घाटावरचे भट's picture

6 Sep 2009 - 4:12 am | घाटावरचे भट

ड्राईव्हेबिलिटीचा मुद्दा माझ्या ध्यानात आला नव्हता इतके दिवस. त्याबद्दल धन्यवाद. मी बहुतांशी शास्त्रीय संगीताच्या क्यासेटी एमपी३ मधे बदलल्याने विशेष फरक जाणवला नसावा.

बाकी इलेक्ट्रिकल डिस्टॉर्शन आणि तदनुषंगाने होणारे हार्मॉनिक डिस्टॉर्शन याबद्दल सहमत आहे.

लॉसी एन्कोडिंग बहुतांशी ट्रान्स्फॉर्म आधारित असल्याने आवाजाच्या गुणवत्तेमधे फरक पडतोच. शिवाय एमपी३ एन्कोडर्सच्या रचनेचे प्रमाणीकरण झालेले नसल्याने सगळे एन्कोडर्स सगळ्या बिटरेटसाठी सारखेच चांगले असतील असे नाही. पण हा भाग रेकॉर्डिंग साखळीच्या शेवटी येत असल्याने त्याचा फरक पडू नये असं वाटतं. जर फायडेलिटी अगदीच गरजेची असेल तर एमपी३ न करता .wav अथवा .flac वगैरे सारख्या फॉर्मॅट मधे साठवून ठेवलेले उत्तम. लॉसी एन्कोडिंगचा त्रास जास्तकरून उपलब्ध असलेल्या ध्वनिमुद्रण सुधारताना होतो.

प्रदीप's picture

6 Sep 2009 - 9:49 am | प्रदीप

<<एमपी३ एन्कोडर्सच्या रचनेचे प्रमाणीकरण झालेले नसल्याने सगळे एन्कोडर्स सगळ्या बिटरेटसाठी सारखेच चांगले असतील असे नाही.>>

सहमत आहे. सर्वच बिघाड काहीतरी प्रोसेसिंग करून सुधारता येतात हे खरे नाही, इतकेच दर्शवतांना हे एक उदाहरण मी दिले होते.

<< जर फायडेलिटी अगदीच गरजेची असेल तर एमपी३ न करता .wav अथवा .flac वगैरे सारख्या फॉर्मॅट मधे साठवून ठेवलेले उत्तम. लॉसी एन्कोडिंगचा त्रास जास्तकरून उपलब्ध असलेल्या ध्वनिमुद्रण सुधारताना होतो.>>

एंकोडर कसा असावा हे मुद्दामच अप्रमाणित ठेवण्यात आलेले आहे, कारण त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या, स्वतःच्या हुशारीने (innovation असे अभिप्रेत आहे, मराठी प्रतिशब्द माहिती नाही) निरनिराळे एंकोडर्स डेव्हलप करण्यास उद्युक्त व्हावेत. तरीही बाजारात जी कोडेक्स सर्वसाधरणपणे उपलब्ध आहेत, त्यात जेव्हढी फिडेलिटी आहे, ती घरगुती (consumer) ग्राहकांच्या वापराच्या दृष्टिने पुरेशी आहे. अर्थात कोडेकचे पॅरॅमीटर्स नीट सेट करणे जरूरीचे आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Sep 2009 - 5:08 pm | प्रकाश घाटपांडे

भटोबांनी सांगितल्याप्रमाणे जर पीसी ऐवजी डिजीटल व्हॉइस रेकॉर्डर वापरला तर एम्पी ३ मधे डिजिटल व्हाईस रेकॉरडरच्या मेमरीत सेव्ह होते. नंतर पीसी वर पेन ड्राईव्ह सारखे उतरुन घ्यायचे
३२०० रु ला सेनेक्सचा डिजिट ल रेकॉरडर मिळतो. २जीबी चा
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

घाटावरचे भट's picture

4 Sep 2009 - 5:20 pm | घाटावरचे भट

व्हॉइस रेकॉर्डर्सचा आणि मुख्यतः स्वस्तात मिळणार्‍या व्हॉईस रेकॉर्डर्सचा फ्रेक्वेन्सी रीस्पॉन्स तितकासा चांगला नसतो असा माझा अनुभव आहे. असे रेकॉर्डर्स मुलाखतीसाठी वगैरे उपयुक्त असले तरी संगीत उचलण्याच्या दृष्टीने त्यांचा फारसा उपयोग होईलसे वाटत नाही (म्हणजे संगीत रेकॉर्ड होईल पण त्याची फायडेलिटी आणि गुणवत्ता तितकी चांगली असेलच असे नाही). चांगला फ्रेक्वेन्सी रिस्पॉन्स असणारे पोर्टेबल रेकॉर्डर्स रुपये दहा हजाराच्या खाली मिळत नसावेत. अर्थात कॅसेट प्लेयर->लाईन इन केबल->पीसी/रेकॉर्डर अशी ही साखळी असल्याने गुणवत्तेची हानी कशीही आणि कुठेही होऊ शकते. त्यातल्या त्यात आपण नियंत्रित करू शकतो ते केबल आणि रेकॉर्डिंग करण्याचे यंत्र. मग ते चांगलेच का वापरू नये? आणि पीसी बहुधा सर्वांकडे असतोच. आणखी खर्च कशाला करा असाही एक विचार माझ्या मनात होता (जेव्हा मी हे उद्योग भरपूर करत होतो तेव्हा. त्यालाही आता ६-७ वर्षं होऊन गेली).
बाकी वारकरिराव, कॅसेट प्लेयर वर म्हटल्याप्रमाणे उत्तम दर्जाचा वापरा. सोनीचा वगैरे असल्यास उत्तमच.

अवांतर - आजकाल कॅसेट प्लेयर मिळतात का हो बाजारात? :-?

एकलव्य's picture

4 Sep 2009 - 5:22 pm | एकलव्य

चांगली माहिती मिळाली या चर्चेच्या निमित्त्याने... धन्यवाद.

सहज's picture

5 Sep 2009 - 8:21 am | सहज

हेच म्हणतो.

विनायक प्रभू's picture

6 Sep 2009 - 4:57 pm | विनायक प्रभू

असेच म्ह्णतो

पुणेरी's picture

4 Sep 2009 - 6:09 pm | पुणेरी

कॉम्प्युटर बरोबर आलेले(on board) Audio Card वापरले तर "hissing" (खरखर) येते असा माझा अनुभव आहे. वेगळे कार्ड महाग असते पण quality degrade होत नाही.

वारकरि रशियात's picture

5 Sep 2009 - 3:09 pm | वारकरि रशियात

सर्व जाणकार मित्रांचे मनापासून आभार! अतिशय उपयुक्त आणि योग्य मार्गदर्शनाबद्द्ल धन्यवाद. आणखी काही अडचण येणार नाही असे वाटते.

मुक्तसंगः अनहंवादि

आनंद घारे's picture

6 Sep 2009 - 8:29 am | आनंद घारे

माझ्याकडेसुद्धा शेकड्याने जुन्या कॅसेट पडलेल्या आहेत. त्यांचे एम्पी३ मध्ये रूपांतर केले तर त्यातून अनंत फायदे होणार आहेत. पण ते कसे करायचे हे समजत नव्हते. म्यूजिकमॅच सॉफ्टवेअर कुठे मिळते? त्यासाठी काय काय लागते?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

प्रदीप's picture

6 Sep 2009 - 9:35 am | प्रदीप

आता 'याहू' ने घेतलेले आहे. तेव्हा त्यांच्या संस्थळावर पहावे.

मिसळभोक्ता's picture

7 Sep 2009 - 7:22 am | मिसळभोक्ता

नक्की बघा..

-- मिसळभोक्ता

नितिन थत्ते's picture

6 Sep 2009 - 1:07 pm | नितिन थत्ते

माझा एक सल्ला आहे.
कॉपीराईटचा मुद्दा येथे नसेल तर सरळ एखाद्या प्रोफेशनल माणसाकडे जाऊन हे काम करून घ्यावे. जो खर्च येईल तो बहुधा या क्षेत्रातले रसिक मिपाकर शेअर करायला तयार व्हावेत.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

दिलीप वसंत सामंत's picture

11 Sep 2009 - 7:59 pm | दिलीप वसंत सामंत

sourceforge.net या साइटवर "AUDACITY" हे सॉफ्टवेअर
आहे ते डाउनलोड करावे. सर्व ऑडिओ फाइल्सचे ध्वनिमुद्रण व संपादन करता येते. तसेच त्याच साईट वर "MEDIACODER" हे सॉफ्टवेअर आहे ते वापरून फाइल चा प्रकार बदलता येतो. कॅसेट रेकॉर्डर च्या व्हॉल्युम कंट्रोल च्या इनपुट मधून कनेक्शन घेऊन लाइन आउट सॉकेट करता येते. पी. सी. नवा असल्यास त्याला लाइन इन
सॉकेट असेल त्या सॉकेट ला टेपरेकॉर्डरचे लाइन आउट सॉकेट जोडून
ध्वनिमुद्रण पी. सी. वर रेकॉर्ड करता येते. मी माझ्या कॅसेट्स याच
प्रकारे पी. सी. वर रेकॉर्ड करतो.

=D> =D> =D>

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

नंदन's picture

13 Sep 2009 - 4:39 am | नंदन

चर्चा. घाटावरचे भट आणि प्रदीप यांच्या प्रतिसादांतून छान माहिती मिळाली. अधिक माहिती म्हणून नाही, पण साधारण याच विषयाशी संबंधित हा लेख अलीकडेच वाचनात आला, त्यातले किस्से आणि माहिती रोचक आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

दिलीप वसंत सामंत's picture

18 Sep 2009 - 1:17 pm | दिलीप वसंत सामंत

nero-9 हे मल्टीमीडिया सॉफ्टवेअर आहे त्याची मूळ सीडी (पायरेटेड नाही) मिळाल्यास पहावे. न मिळाल्यास ebay.in ह्या साइटवर अमेरिकेतून वस्तू मागविण्याची सोय आहे. या साइटवर फक्त रुपयात पैसे भरावयचे व पुढील सारे या साइट तर्फे केले जाते आयात करणे कस्टम्स वगैरे, व वस्तू घरपोच मिळते. मात्र आधी साइटवरून या पद्धतीची तसेच वस्तूची संपूर्ण माहिती घ्यावी व नंतरच व्यवहार करावा. मी फक्त साइट बघितली आहे परंतू या पद्धतीचा कसलाही व्यवहार केलेला नाही.