मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

औडिओ कसेट्स मधील ध्वनीमुद्रणाचा कायाकल्प (!)

वारकरि रशियात · · काथ्याकूट
रामराम मंडळी, जवळजवळ दररोज मिपा वर वाचनमात्र असतो, पण आज बर्याच दिवसांनी येथे लिहितो आहे. माझ्या संग्रही काही दुर्मिळ - लाइव्ह ध्वनीमुद्रणे आहेत. (उदा. मालिनीबाईंची सातारा येथील मैफल, गजाननबुवांचे व्हायोलिन इ. तसेच काही अधिकारी व्यक्तींची गीता, भागवत इ. वरील प्रवचने ) पण ही सर्व ध्वनीमुद्रणे जुन्या काळातली असल्याने औडिओ कसेट्स वर आहेत. अनेकवार वाजवून आणि कालमानाने हळूहळू या औडिओ कसेट्स खराब होत जातील. त्यांचे दीर्घकाळ जतन व्हावे व आस्वाद घेता यावा म्हणून अधिक खराब होण्यापूर्वी ही सर्व ध्वनीमुद्रणे सी.डी. वर घ्यावीत असा विचार आहे. मला या तंत्राविषयी काहीच माहिती नाही. १) घरी (पी. सी. + आंतरजाल + कसेट्स प्लेयर आहे. ) असे करता येइल का? (असे करता येऊ शकेल असे काही सोफ्टवेअर असते का?) २) असे करून देणारी काही यंत्रणा आहे का? (शक्यतो मुंबई / ठाणे / डोंबिवली परिसरात) अंदाजे खर्च किती येइल? ३) आपणापैकी कोणी असे (ध्वनीमुद्रणाचा कायाकल्प !) करून घेतले आहे का? ४) यासंदर्भात या शिवाय अधिक माहिती वारकरि

वाचन 5111 प्रतिक्रिया 0