नारळ

प्रभो's picture
प्रभो in काथ्याकूट
31 Aug 2009 - 10:05 pm
गाभा: 

परवा घरी गौरीपूजेनंतर आई-बाबा-आज्जी सोबत गप्प मारत बसलो होतो...
असंच विषय निघाला की देवाला नारळ का वाढतात?

आमच्या तिर्थरूपांचं म्हणण पडलं की...बर्‍याच आधी देवास नरबळी देत असत...पण ते लोकांना पटेना..काहीतरी शाकाहारी अर्पण करावं पण भाव तोच रहावा म्हणून नारळाचा पर्याय समोर आला....

आला.... पण तो कसा???

नारळ पूर्ण जर सोलला (शेंडी न ठेवता), तर त्यावर २ गोल आकर आणी उल्टा 'Y' तयार झालेला दिसतो...तर त्यातील २ गोल म्हणजे २ डोळे, उरलेला गोल म्हणजे तोंड..उल्ट्या Y चा पाय म्हणजे नाक आणी व्ही शेप म्हणजे मिशी..असा हा नर...(फोटू खाली अहेच...)...आणी नार॑ळ फोडणे/वाढणे म्हणजे नरबळी चा ऑपश्यन..

तर जाणकार आणी माझ्यासारखेच अजाणकार यांची यावर मते काय आहेत???

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

31 Aug 2009 - 10:13 pm | नितिन थत्ते

नारळाची पूर्ण शेंडी काढीत नाहीत त्याचे कारण हेच असावे काय?

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

युयुत्सु's picture

1 Sep 2009 - 4:06 pm | युयुत्सु

पूर्ण चकोट फक्त मृत्युनंतरच्या श्राद्धादि विधीं मध्ये करतात. म्हणून शुभकार्यात पूर्ण मुंडण करायची पद्धत नाही. नारळाची शेंडी म्हणूनच ठेवली जाते.

युयुत्सु's picture

1 Sep 2009 - 4:06 pm | युयुत्सु

पूर्ण चकोट फक्त मृत्युनंतरच्या श्राद्धादि विधीं मध्ये करतात. म्हणून शुभकार्यात पूर्ण मुंडण करायची पद्धत नाही. नारळाची शेंडी म्हणूनच ठेवली जाते.

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2009 - 10:25 pm | बिपिन कार्यकर्ते

मी पण असेच कुठेतरी ऐकले होते खूप पूर्वी.

बिपिन कार्यकर्ते

मिसळभोक्ता's picture

31 Aug 2009 - 10:29 pm | मिसळभोक्ता

बर्‍याच आधी देवास नरबळी देत असत...पण ते लोकांना पटेना..काहीतरी शाकाहारी अर्पण करावं पण भाव तोच रहावा

त्यापेक्षा शाकाहारी नरांचा बळी दिला असता तर ?

ता. क. नरबळीच का ? मादीबळी का नाही ? युयुत्सुंनी प्रकाश टाकावा.

-- मिसळभोक्ता

(असोल्या)चतुरंग

सहज's picture

1 Sep 2009 - 9:03 am | सहज

तो वाय आकार म्हणजे मिश्या समजायच्या का? मग मिशीवालेच बळी जायचे का? काळेप्रणाली काय सांगते?

का मिशीवाल्या "नार" बळी जायच्या? का पुरुषप्रधान संस्कृतीला नेस्तनाबुत केल्यावर नार बळीचा, मुक्त स्त्रीयांनी नारबळी केला? युयुत्सुंनी खुलासा करावा.

युयुत्सु's picture

1 Sep 2009 - 2:43 pm | युयुत्सु

मी पुण्याच्या टिमवि मध्ये संस्कृत विशारद करत होतो तेव्हा आम्हाला परांजपे नावाच्या एक बाई ऋग्वेद शिकवायच्या. त्यानी आम्हाला वैदिक दैवतशास्त्राची थोडी ओळख करून दिली होती. त्यात बळी विस्तृत पणे चर्चिला गेलेला विषय आहे. त्यात असेही सांगितल्याचे आठवते की पुरूष देवतांना स्त्री बळी आणि स्त्री देवतांना पुरुषबळी द्यायची प्रथा होती. याशिवाय कोणत्या देवाला कसा बळी 'आवडतो' याचे सविस्तर वर्णन जुन्या ग्रंथात सापडते (मी ते वाचलेले नाही). अशा यज्ञाना सर्व साधारण पणे 'नरमेध' असे संबोधले गेले आहे.

प्रभो's picture

1 Sep 2009 - 3:09 pm | प्रभो

एक लेख होऊन जाउदे या विषयावर युयुत्सुराव...

युयुत्सु's picture

1 Sep 2009 - 3:14 pm | युयुत्सु

ते मात्र सांगु नका... तात्या मला इथून delete करतील.

प्रभो's picture

1 Sep 2009 - 3:23 pm | प्रभो

तात्या ,

एक ईनंती हाय की तुमी युयुत्सूरावांना मागणी घाला...एक लेख लिहिण्याची... :)

सखाराम_गटणे™'s picture

1 Sep 2009 - 9:39 am | सखाराम_गटणे™

नरबळी दोन्ही येते.
नर आणि मादी.
ह्याच्यावर एक 'आक्रीत' नावाचा चित्रपट आहे.

अवलिया's picture

31 Aug 2009 - 10:42 pm | अवलिया

युयुत्सुंच्या नव्या लेखाचा मुख्य मसुदा.

नरबळीची कल्पना रद्द होवुन नारळ वाढवणे चालु झाले त्यामुळे संतापलेल्या महिलांनी नव-यांना त्रास द्यायला सुरवात केली असल्याचे संशोधन विदासह स्पष्टीकरण.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

हर्षद आनंदी's picture

1 Sep 2009 - 7:56 am | हर्षद आनंदी

देवाला अर्पण करताना नारळास ब्राम्हण (ब्रम्हस्वरूप) मानले गेले आहे- नरबळी नाही, ब्रम्ह म्हणुन त्याची शेंडी काढत नाहीत.

नारळ वाढवताना, नारळ हे पुर्णान्न आहे या शास्त्रीय बाबीचा आधार घेऊन, नेवैद्य म्हणुन तो वाढविला जातो.

फक्त देवालाच नाही तर, अवसे-पुनवेला, गावच्या वेशीवरच्या पिंपळापाशी नारळ, दही-बुक्का-गुलाल-भात, कणकेचा दीवा ठेवतात बरेच गावकरी. पुण्यात सुध्दा बर्‍याच तिठ्यांवर असे प्रकार असतात, त्यात अर्धा वा अख्खा नारळ तर असतोसच. फार आधी (शेकडो वर्षांपुर्वी जेव्हा म्हसोबा, मुंज्या, आसरा यांची काल्पनीक भीती \ अस्तीत्व जोरावर होते, तेव्हा नरबळी दीला जायचा, त्यातील अडचणी पाहुन हा उपाय निघाला असावा)

एका नारळाचे अनेक ऊपयोग...

प्रकाश घाटपांडे's picture

1 Sep 2009 - 10:10 am | प्रकाश घाटपांडे

अजुन एक उपयोग बोळवण करण्यासाठी चपलेला सात्विक पर्याय ;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

JAGOMOHANPYARE's picture

1 Sep 2009 - 10:33 am | JAGOMOHANPYARE

नारळ हा नरबळीला पर्याय आहे........

नारळाच्या सात्विक माहितीसाठी एखाद्या सनातन प्रभात वाल्याला भेटावे.. तो यच्चयावत माहिती देईल........

शेन्डीवाला नारळ भारतातच मिळतो... इथे मालदिव मध्ये तुम्ही फोटोत दिलाय तसलाच बिन शेन्डीचा ( की सुन्ता केलेला ? )नारळ मिळतो... :)

रोचीन's picture

1 Sep 2009 - 1:53 pm | रोचीन

असे म्हणतात कि नारळ हे एक अध्यात्मिक प्रतीक आहे!! त्याचे कवच हे मानवी शरीर, आतील खोबरे म्हणजे आपला आत्मा! गोड पाणी हे परब्रह्माचे प्रतीक आहे.
ज्या प्रमाणे नारळ फोड्ल्यानंतर आपल्याला गोड खोबरे व मधूर पाणी याचा लाभ मिळतो त्या प्रमाणे मानवाने शारिरीक वासनांचा त्याग करुन आत्म्यापर्यंत पोहोचून परब्रह्माची प्राप्ती करुन घ्यावी असा त्या मागचा उद्देश आहे!!!
पूजा करतांना फलाच्या अपेक्शेबरोबरच अध्यात्मिक भावना ही मनात असावी म्हणून देवाला नारळ अर्पण करतात.

प्रभो's picture

1 Sep 2009 - 2:19 pm | प्रभो

थोडं थोडं समजायला लागलय आता...