बर्याच आधी देवास नरबळी देत असत...पण ते लोकांना पटेना..काहीतरी शाकाहारी अर्पण करावं पण भाव तोच रहावा
त्यापेक्षा शाकाहारी नरांचा बळी दिला असता तर ?
ता. क. नरबळीच का ? मादीबळी का नाही ? युयुत्सुंनी प्रकाश टाकावा.
-- मिसळभोक्ता
तो वाय आकार म्हणजे मिश्या समजायच्या का? मग मिशीवालेच बळी जायचे का? काळेप्रणाली काय सांगते?
का मिशीवाल्या "नार" बळी जायच्या? का पुरुषप्रधान संस्कृतीला नेस्तनाबुत केल्यावर नार बळीचा, मुक्त स्त्रीयांनी नारळबळी केला? युयुत्सुंनी खुलासा करावा.
मी पुण्याच्या टिमवि मध्ये संस्कृत विशारद करत होतो तेव्हा आम्हाला परांजपे नावाच्या एक बाई ऋग्वेद शिकवायच्या. त्यानी आम्हाला वैदिक दैवतशास्त्राची थोडी ओळख करून दिली होती. त्यात बळी विस्तृत पणे चर्चिला गेलेला विषय आहे. त्यात असेही सांगितल्याचे आठवते की पुरूष देवतांना स्त्री बळी आणि स्त्री देवतांना पुरुषबळी द्यायची प्रथा होती. याशिवाय कोणत्या देवाला कसा बळी 'आवडतो' याचे सविस्तर वर्णन जुन्या ग्रंथात सापडते (मी ते वाचलेले नाही). अशा यज्ञाना सर्व साधारण पणे 'नरमेध' असे संबोधले गेले आहे.
युयुत्सुंच्या नव्या लेखाचा मुख्य मसुदा.
नरबळीची कल्पना रद्द होवुन नारळ वाढवणे चालु झाले त्यामुळे संतापलेल्या महिलांनी नव-यांना त्रास द्यायला सुरवात केली असल्याचे संशोधन विदासह स्पष्टीकरण.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
देवाला अर्पण करताना नारळास ब्राम्हण (ब्रम्हस्वरूप) मानले गेले आहे- नरबळी नाही, ब्रम्ह म्हणुन त्याची शेंडी काढत नाहीत.
नारळ वाढवताना, नारळ हे पुर्णान्न आहे या शास्त्रीय बाबीचा आधार घेऊन, नेवैद्य म्हणुन तो वाढविला जातो.
फक्त देवालाच नाही तर, अवसे-पुनवेला, गावच्या वेशीवरच्या पिंपळापाशी नारळ, दही-बुक्का-गुलाल-भात, कणकेचा दीवा ठेवतात बरेच गावकरी. पुण्यात सुध्दा बर्याच तिठ्यांवर असे प्रकार असतात, त्यात अर्धा वा अख्खा नारळ तर असतोसच. फार आधी (शेकडो वर्षांपुर्वी जेव्हा म्हसोबा, मुंज्या, आसरा यांची काल्पनीक भीती \ अस्तीत्व जोरावर होते, तेव्हा नरबळी दीला जायचा, त्यातील अडचणी पाहुन हा उपाय निघाला असावा)
एका नारळाचे अनेक ऊपयोग...
नारळ हा नरबळीला पर्याय आहे........
नारळाच्या सात्विक माहितीसाठी एखाद्या सनातन प्रभात वाल्याला भेटावे.. तो यच्चयावत माहिती देईल........
शेन्डीवाला नारळ भारतातच मिळतो... इथे मालदिव मध्ये तुम्ही फोटोत दिलाय तसलाच बिन शेन्डीचा ( की सुन्ता केलेला ? )नारळ मिळतो... :)
असे म्हणतात कि नारळ हे एक अध्यात्मिक प्रतीक आहे!! त्याचे कवच हे मानवी शरीर, आतील खोबरे म्हणजे आपला आत्मा! गोड पाणी हे परब्रह्माचे प्रतीक आहे.
ज्या प्रमाणे नारळ फोड्ल्यानंतर आपल्याला गोड खोबरे व मधूर पाणी याचा लाभ मिळतो त्या प्रमाणे मानवाने शारिरीक वासनांचा त्याग करुन आत्म्यापर्यंत पोहोचून परब्रह्माची प्राप्ती करुन घ्यावी असा त्या मागचा उद्देश आहे!!!
पूजा करतांना फलाच्या अपेक्शेबरोबरच अध्यात्मिक भावना ही मनात असावी म्हणून देवाला नारळ अर्पण करतात.
प्रतिक्रिया
नारळाची
पूर्ण चकोट
पूर्ण चकोट
बहुतेक...
शाकाहारी
तुम्हाला एक प्रश्न फार ब्वॉ मिभो! ;)
शिवाय
मी
होउन जाऊ द्या
ते मात्र
तात्या..
नरबळी
युयुत्सुं
खरे आहे
उपयोग
नारळ हा
असे
थोडं थोडं..