थोडी जाणीव हवी...

विमुक्त's picture
विमुक्त in जे न देखे रवी...
31 Aug 2009 - 3:38 pm

ट्राफिक सिग्नलवर एक मुलगा भीक मागायला येतो...
आळशी आहेत... ह्यांना भीक मागायची सवय लागलीयं असं आम्ही म्हणतो...
खीशातून २ रुपये काढून त्याच्या हातावर टेकवतो...
आज फार उपकार केले ह्या अविर्भावात मग आम्ही मिरवतो...

खरंच ते आळशी आहेत का? हे आम्ही पडताळत नाही...
आणि पडताळणार तरी कसे?... आम्हीतर नुसतेच बोलतो...
दुसर्याकडे बोट दाखवून नेहमीच हसतो...
बोलेन ते करण्याचं बळ आमच्या आत्म्यातच नाही...

जेमतेम अंग झाकेल इतक्याच चिंध्या त्यांच्या आईच्या अंगावर असतात...
मुलंबाळं तर नागडीच भीक मागत रस्त्यावर नाचतात...
कोलांटीउडी मारली की लोकं निर्लज्जपणं हसतात...
२ रुपये टाकून पुन्हा ग्रीन सिग्नलची वाट बघतात...

आम्ही मात्र दर सणाला नवे कपडे खरेदी करतो...
पावसाळ्यात, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ३ वेगळे jackets वापरतो...
पण, र्स्त्यावरच्या मुलांना नागडं बघायला आम्हाला काहीच वाटत नाही...
त्यांच्या आईला सुद्धा अब्रू आहे... ह्याची तर आम्हाला जाणीवच होत नाही...

घाणेरडे हे... ह्यांच्यामुळे लोकसंखेचा भार उगीच वाढतो...
ह्यांच्यामुळे देशाचा per capita GDP उगीचच मग घटतो...
फक्त आम्हीच देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावतो...
२ रुपये टाकून सामाजीक जवाबदारी मात्र आम्ही टाळतो...

degree certificate दाखवलं की मोठ्ठा पगार आजकाल सहजच मिळतो...
मग पार्ट्या करुन नासडी करुन आम्हीच उकिरडे भरतो...
multiplexes, malls मधे जावून पैसे उगीचच उधळतो...
आणि पैश्याच्या आड स्वताच्या व्यक्तीमत्वाचं नागडेपण झाकतो...

चांगल्या घरी जन्मलो, शिकलो म्हणून पुरुन उरेल इतकं आपण कमवतो...
मी deserve करतो म्हणून मला मिळतं... ह्या अविचारानं उर्मठपणे वागतो...
त्यांना एक संधी दिली तर ते पण deserve करतील... ह्याची जाणीव हवी...
त्यांच्या जागी आपण सुद्धा असू शकलो असतो... ह्याची जाणीव हवी...

मुक्तक

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

31 Aug 2009 - 3:44 pm | विजुभाऊ

खरेच ही जाणीव नेहमीच टोचणी लावते.

२ रुपये टाकून सामाजीक जवाबदारी मात्र आम्ही टाळतो...

आणि भुकेलेल्याला विचारतो की काम का करत नाहीस?
सभोवताली असलेले दिसू नये म्हनून डोळे मिटतो.
भिकारी आपल्या उपयोगी पडतात ते आपल्याला थोडेसे का होईना पण आपण कुठेतरी वरचढ आहोत ही सुखद जाणीव देत असतात.

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

पर्नल नेने मराठे's picture

31 Aug 2009 - 3:45 pm | पर्नल नेने मराठे

त्यांना एक संधी दिली तर ते पण deserve करतील... ह्याची जाणीव हवी...
त्यांच्या जागी आपण सुद्धा असू शकलो असतो... ह्याची जाणीव हवी...

ह्म्म :S

चुचु

मदनबाण's picture

31 Aug 2009 - 3:45 pm | मदनबाण

मुक्तक आवडले...

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

पाऊसवेडी's picture

31 Aug 2009 - 3:59 pm | पाऊसवेडी

त्यांना एक संधी दिली तर ते पण deserve करतील... ह्याची जाणीव हवी...
त्यांच्या जागी आपण सुद्धा असू शकलो असतो... ह्याची जाणीव हवी...
"जाणीव" असण खुप महत्वाच आहे
छान लिहिलि आहेस

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

प्रमोद देव's picture

31 Aug 2009 - 4:10 pm | प्रमोद देव

हल्ली भिकारी देखिल खरेखुरे भिकारी नसतात.
भीक मागणं हा एक धंदा आहे आणि ह्या धंद्याचे कर्ते-करविते एसी केबिनमध्ये बसलेले असतात. तुमच्या आमच्यासमोर येऊन भीक मागणारे हे बहुधा सगळे पगारी नोकर असतात. निदान मुंबई शहरात असणारे बहुसंख्य भिकारी तरी ह्याच प्रकारचे असतात. तेव्हा त्यांना दया-माया दाखवणे किंवा भीक घालणे म्हणजे त्या पडद्याआडच्या शेठजींना गबर करण्यासारखे आहे.
पटलं तर होय म्हणा....नाहीतर, जाणीव का काय म्हणता ती ठेवा...
आपल्याला काय?

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

विमुक्त's picture

1 Sep 2009 - 4:19 pm | विमुक्त

तसं असेलही कदाचीत... पण सगळेच मात्र तसे नसणार...

दादा कोंडके's picture

3 Sep 2009 - 1:30 pm | दादा कोंडके

खरय!
मला तर भिकार्‍यांविषयी अजिबात कीव वगैरे वाटत नाही. आपण त्यांना भीक देवून त्यांना अजूनच भिकारी करत असतो.
एकदा मी ट्रॅफिक सिग्नल व थांबलो होतो. एक उघडा लहान मुलगा चेहर्‍यावर दिनवाणे भाव आणून माझ्यासमोर हात पसरून उभा राहीला. मी त्याला म्हणालो, माझी गाडी पूस मग मी तूला दोन रुपये देईन आणि त्याला फडकं दिलं. त्यानेही मग गाडी पुसल्यासारखं केलं आणि मग मी त्याला दोन रुपये दिले. ते फडकं त्याच्याजवळच राहू दिले आणि त्याला सिग्नलला थांबलेल्या बाकिच्या गाड्या पुसण्याची खूण केली. त्यानं नंतर काय केलं माहित नाही पण लोकं मात्र विचीत्र नजरेनं माझ्याकडे बघत होते. :(

समंजस's picture

31 Aug 2009 - 5:25 pm | समंजस

सत्य!!! अर्थात कडवंच!!!