र्निमाल्यातिल दोन फुले--

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
26 Aug 2009 - 4:28 pm

सहज ऐकले बोलत होती
र्निमाल्यातिल दोन फुले
कालच आपण फुललो होतो
कसे विसरले लोक खुळे

जाउ दे रे सोडून दे तू
काय मनाला घेसी लावून
काय आपुले ह्यांचे नाते
जिथे सख्यांची नाही आठवण

सखे- संगती सोडून दे तू
आइ-बापही आडचण होती
नीच इतका झाला माणूस
स्वार्थास्तव रे शिवतो नाती

पाहिलास का व्रुद्धाश्रम तो
मालवणारे दिवे इथे
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे

करुणकविता

प्रतिक्रिया

sneharani's picture

26 Aug 2009 - 4:44 pm | sneharani

Chhan .... Sundar

प्रमोद देव's picture

26 Aug 2009 - 5:24 pm | प्रमोद देव

मस्त!
कविता वास्तववादी आहे.

माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Aug 2009 - 5:53 pm | llपुण्याचे पेशवेll

छान कविता.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

क्रान्ति's picture

26 Aug 2009 - 7:02 pm | क्रान्ति

पाहिलास का व्रुद्धाश्रम तो
मालवणारे दिवे इथे
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे

कमालीची वास्तवदर्शी कविता!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

प्राजु's picture

26 Aug 2009 - 7:17 pm | प्राजु

प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे

खूपच सुंदर!! खूप आवडली कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Aug 2009 - 9:06 pm | बिपिन कार्यकर्ते

कविता मस्तच आहे. मला आवडली. लिहा अजून.

बिपिन कार्यकर्ते

विदेश's picture

26 Aug 2009 - 9:16 pm | विदेश

पाहिलास का व्रुद्धाश्रम तो
मालवणारे दिवे इथे
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे


सुरेख !

हृषीकेश पतकी's picture

26 Aug 2009 - 9:27 pm | हृषीकेश पतकी

खूप खूप सुरेख आहे कविता..
शेवट तर केवळ अप्रतिम !!

आपला हृषी !!

अवलिया's picture

26 Aug 2009 - 10:29 pm | अवलिया

खूप खूप सुरेख आहे कविता..

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

हर्षद आनंदी's picture

26 Aug 2009 - 11:54 pm | हर्षद आनंदी

कविततेतील निर्माल्य आणि आई-वडील, नातेवाईक यांचा संदर्भ जरा समजावुन सांगा, पहिल्या कडव्याचा बाकीच्या कडव्यांशी संबंध आहे असे वाटत नाही.

माझ्या अल्पमतीप्रमाणे : निर्माल्य आणि कचरा यात मुलभुत फरक आहे. देव्हार्‍यात केरसुणी कोणी चालवित नाही आणि देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य होते. निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडुन दिले जाते किंवा मातीत जिरवुन उत्तम खत तयार केले जाते, पण पायाखाली तुडवले जात नाही. झाडावर राहिली म्हणुन फुले चिरायु होत नाहीत, दुसर्‍या दीवशी ती कोमेजतातच!! हा निसर्ग नियम आहे. फुले कोमेजतात, म्हणुन देवाला ताजी फुले वाहिली जातात. त्यामुळे फुलांना वाईट वाटण्याचे कारण काय?

पाहिलास का व्रुद्धाश्रम तो, मालवणारे दिवे इथे
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या, त्या वाटांचा अंत तिथे

ह्याच्याशी सहमत, निव्वळ परस्परातील हेवेदावे आणि सो कॉल्ड पुढारलेपणा जोपासण्यासाठी हा अत्यंत जीवघेणा प्रकार ज्यांच्या कडुन केला जातो त्यांना भर चौकात नागवं करुन चाबकाने फोडले पाहीजे.

फ्रॅक्चर बंड्या's picture

27 Aug 2009 - 11:09 am | फ्रॅक्चर बंड्या

प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे

मस्तच