२००९ घरगुती गणेशोत्सव

मीनल's picture
मीनल in कलादालन
23 Aug 2009 - 10:59 pm

आमच्या घरच्या गणपतीची आरास आम्ही अशी केली.

साधीशीच आहे. मागे ताजी फुल,टेबलाला ईलेक्ट्रीकचे छानसे दिवे, समोर प्रसन्न श्री गणेश मूर्ती आणि इतर साहित्य म्हणजे विड्याची पाने, सुकी,ओली फळ, नैवेद्य.

जेवणाचा बेत- चटणी, कोशींबीर,वरण ,भात, आमटी,पोळी,बटाटा भाजी, मटकी उसळ, गुलाब जाम, खव्याचे मोदक, बेसन वड्या.

तुमच्याकडे हाच बेत की दुसर काही स्पेशल?
तुमच्या घरच्या श्री गणपती ची मूर्ती कशी आहे? तुम्ही आरास कशी केलीत?
इथे फोटो टाकू शकलात तर तुमच्या घरचा उत्सव आम्हाल पाह्ता येईल.

संस्कृती

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

23 Aug 2009 - 11:04 pm | मदनबाण

मस्त... :)
गणपती बाप्पा मोरया...

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

अवलिया's picture

23 Aug 2009 - 11:17 pm | अवलिया

गणपती बाप्पा मोरया... !!!

--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?

सोनम's picture

23 Aug 2009 - 11:20 pm | सोनम

अगदी छान आरास केली आहे.

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

अनामिक's picture

23 Aug 2009 - 11:26 pm | अनामिक

अरे वा वा... मी सुद्धा आता मित्राकडे गणपती साठी आलोय. छान आरास केली आहे आणि थोड्याच वेळात पूजा करणार आहोत. सवीस्तर वृत्तांत टाकीनच. तोपर्यंत "गणपती बाप्पा.... मोरया!!!"

-अनामिक

विसोबा खेचर's picture

23 Aug 2009 - 11:43 pm | विसोबा खेचर

जेवणाचा बेत- चटणी, कोशींबीर,वरण ,भात, वरण ,भात, आमटी,पोळी,बटाटा भाजी, मटकी उसळ, गुलाब जाम, खव्याचे मोदक, बेसन वड्या.

फोटू कुठाय?

तो न टाकल्याबद्दल मिपाच्या शाळेतून तुमचं नांव कमी करायचं का? :)

तात्या.

मीनल's picture

24 Aug 2009 - 4:01 am | मीनल

जेवणाच्या ताटाच आहे फोटो तिथे. पण दूरून घेतलेला.
हा घ्या क्लोज अप...

आता नाही ना सस्पेन्शन? :S
मीनल.

विसोबा खेचर's picture

24 Aug 2009 - 2:31 pm | विसोबा खेचर

हा घ्या क्लोज अप...

धन्यवाद! कृपया आजचे मिपाचे मुखपृष्ठ पाहा! :)

तात्या.

मुक्तसुनीत's picture

23 Aug 2009 - 11:54 pm | मुक्तसुनीत

मीनलताई आणि सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !
गणपतीबाप्पा मोरया !

रेवती's picture

24 Aug 2009 - 12:45 am | रेवती

आमच्याकडे मूर्ती फक्त सासूबाईंकडे (मुख्य घरी) आणली जाते. आज पूजा करून २१ वेळा अथर्वशिर्ष नवर्‍याने म्हटले. चक्क लाल फुल कुंडीत आलेले असल्याने ते वाहिले. तोपर्यंत नैवेद्याच्या स्वयंपाक केला. वरण, भात, काकडीची कोशिंबीर, दुधी भोपळ्याची मुगाची डाळ घालून भाजी, पोळ्या, उकडीचे मोदक. आज संध्याकाळी आरतीला पंचखाद्याचा नैवेद्य करण्याची पद्धत सासरी आहे तसा तो करीन. उद्या आणखी काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवून दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन असणार आहे.
तुमच्याकडचा गणपती छान सजवला आहे. नैवेद्यही छानच!;)
गणपतीबाप्पा मोरया!!

रेवती

प्राजु's picture

24 Aug 2009 - 1:41 am | प्राजु

सेम टू सेम!!

आमच्या घरीही सांगलीला गणपती बसवतात. आम्ही घरी नुसतीच पूज केली. नवर्‍याने अथर्वशिर्षाची २१ आवर्तने केली आणि घरी.. पोळी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर, वरण - भात पापड आणि साबुदाण्याच्या पापड्या आणि मुख्य म्हणजे उकडीचे मोदक... असा झक्क मेनू होता.

नैवेद्य...

मोदक


- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्रा's picture

24 Aug 2009 - 1:14 am | चित्रा

आमच्याकडे लेकीने (आणि नवर्‍याने, तिच्याबरोबर बसून) आरास केली आहे.
मायकल्समध्ये देखावा करण्याचे एक लहान 'किट' मिळते ते घेऊन आरास केली आहे. त्याच्यामागे तिने चित्र रंगवून ठेवले आहे. आमच्याकडे चांदीची अगदी लहान मूर्ती आहे. नवर्‍याच्या घरी प्रत्येक मुला- सुनेने स्वतःचा गणपती बसवावा अशी पद्धत आहे.

मीनल's picture

24 Aug 2009 - 4:04 am | मीनल

तुमच्या घरचा श्री गणपती ,त्या भोवतालची आरास,जेवणाचा बेत यांचे फोटो टाका की मिपावर. सर्वांना पाहता येईल. :W

मीनल.

दशानन's picture

24 Aug 2009 - 9:02 am | दशानन

मंगलमुर्ती मोरया !!!!

जर का मला ह्या दहा दिवसामध्ये मोदक भेटले नाही तर देव तुम्हा सगळ्या सुगरणींना पाहून घेईल.... :W

हे मात्र अतीच होत आहे.... गणपती बसले तरी आमच्या नशीबी अजून मोदक नाही म्हणजे काय X(

लवकरात लवकर पाककृती टाकणे.... आज आम्ही स्वतःच मोदक करुन खावे म्हणतो आहे... चायाला... देवासाठी... स्वारी मोदकासाठी ही रिस्क पण घ्यायला मी तयार आहे.... :D

आय लव्ह :X मोदक ;)

स्वाती दिनेश's picture

24 Aug 2009 - 1:19 pm | स्वाती दिनेश

मीनल ,
आरास छान झाली आहे. काल आम्ही ६,७ जण एकत्र जमलो, एकाच्या घरी छानशी आरास करुन गणपतीची प्रतिष्ठापना करुन पूजा, आरती केली आणि उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला.(अर्थात येथे शाडूची मूर्ती मिळणे कठिण असल्याने धातूची मूर्ती घेतली.) आणि अर्थातच घरी फोनवून घरच्या बाप्पाला नमस्कार केला.
मंगलमूर्ती मोरया!
स्वाती

विशाल कुलकर्णी's picture

24 Aug 2009 - 1:26 pm | विशाल कुलकर्णी

गणपती बाप्पा मोरया !
आमच्या घरी विराजमान झालेले बाप्पा....

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पक्या's picture

24 Aug 2009 - 1:30 pm | पक्या

विशाल भाऊ , सुरेख आरास.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Aug 2009 - 1:31 pm | बिपिन कार्यकर्ते

यावर्षी घाईगडबडीत जमेल तेवढी आरास केली. जमेल तेवढे मोदक खाल्ले. मज्जा केली. हे ताजे फोटो...

बिपिन कार्यकर्ते

राघव's picture

24 Aug 2009 - 2:39 pm | राघव

मीनलताई, विशाल, आरास सुंदर!
अरे ते खाद्यपदार्थांचे असे फोटू टाकून वाट नका लावू रे माझ्या हापिसातल्या कामाची.. च्यायला.. ते उकडीचे मोदक बघीतले का पाण्यात साखर विरघळते तस्सा विरघळतो.. 8> :X
बिपिनदा, दुसरा फोटू अप्रतीम! बाप्पा लय ग्वाड दिसतंय बगा!

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

विंजिनेर's picture

24 Aug 2009 - 3:28 pm | विंजिनेर

तेच म्हणणार होतो. फार सुंदर मुर्ती आहे. आमचा नमस्कार ...

sneharani's picture

24 Aug 2009 - 2:45 pm | sneharani

minal tai an vishal khup sundar photo aahet. aamachyakade fakt chikhalach chhota ganoba asato mhanun rangit ganapatichi khup aavad.

me kolhapuri.

सूहास's picture

24 Aug 2009 - 3:25 pm | सूहास (not verified)

वाव....

सू हा स...

चित्रा's picture

24 Aug 2009 - 8:18 pm | चित्रा

मीनलताईंनी सुचवल्याप्रमाणे बाकी फोटो नंतर देईनच. आमच्या मुलीने काल काढलेले गणपतीचे चित्र लावते आहे.

Ganapati, 2009

चतुरंग's picture

24 Aug 2009 - 8:57 pm | चतुरंग

बाप्पा आणी मोदकांचा ढीग अगदी मस्तच दिसतोय! :) देवनागरी अक्षरही चांगले आहे. तिचे अभिनंदन.

चतुरंग

रेवती's picture

24 Aug 2009 - 9:51 pm | रेवती

मस्त चित्र!
वर मराठीत गणपती लिहिणं म्हणजे तुम्हाला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. नीरजाचे अभिनंदन!

रेवती

प्राजु's picture

24 Aug 2009 - 9:57 pm | प्राजु

मस्त काढलं आहे..!
मराठीतून लेखन!! अभिनंदन!!
लेकालाही शिकवायचा प्रयत्न चालू आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

24 Aug 2009 - 8:56 pm | क्रान्ति

मीनल, विशाल, बिपिनदा, प्राजु मस्त आरास केलीय सगळ्यांनी. मीनलच्या क्लोजअप फोटोतलं ताट उचलून घ्यावंसं वाटतंय! प्राजु मोदक पाठवता येतील का? ;) चित्रा, लेकीनं काढलेला गणपती मस्तच! :)
आमच्याकडचे बाप्पा बहिणींची वाट पहाताहेत. [ज्येष्ठा-कनिष्ठा]गुरुवारी दोघी बहिणाबाई आल्या, म्हणजे फोटोसाठी पोझ देईन असं त्यांचं म्हणणं आहे! ;) तेव्हा आमचा सविस्तर वृत्तांत पुढच्या रविवारी येईल. ;;) तोपर्यंत बाप्पा उंदीरमामासह माव्याचे मोदक, गूळ-खोबर्‍याची आवडती खिरापत, पेढे, वरण-भात, भाजी-पोळी असं साधंसुधं जेवण करताहेत.
मी आजच जयवीकडच्या गणपतीचं दर्शन घेऊन आले आणि तिचं नवं घर बधून आले.

क्रान्ति
जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात
अग्निसखा
रूह की शायरी

अश्विनीका's picture

25 Aug 2009 - 12:07 am | अश्विनीका

सासरी पुण्यात गणपती बसतो. पण त्यावेळी भारतात कधीच जाणे होत नाही. त्यामुळे मुलांना गणपतीच्या सणाची ओळख व्हावी म्हणून अमेरिकेतल्या घरी पण गणपती बसवायला सुरवात केली. हे गणपतीचे इथल्या घरातले ४थे वर्ष.

आमच्या घरचे बाप्पा

Ganapati 2009

सर्वांना गणपती सणानिमित्त शुभेच्च्छा !
- अश्विनी

मुक्ता's picture

25 Aug 2009 - 11:43 am | मुक्ता

मीनलतै,
आरास पाहुन मन प्रसन्न झाले पण जेवणाचे पान पाहुन पोट मात्र खवळ्ले.

प्राजु,
मोदक मस्तच..साचा न वापरता देखील अग्दी प्रमाणब्ध..अरे वा..!

विशाल कुलकर्णी,बिपिन कार्यकर्ते,अश्विनीका यांची देखील आरास छान आहे

..गणपती बाप्पा मोरया !

आमच्याकडे बाप्पा बहिणींची वाट पहाताहेत. वृत्तांत आणि फोटो डकवुच..

../मुक्ता

अनिल हटेला's picture

25 Aug 2009 - 3:08 pm | अनिल हटेला

वाह वाह !!

मंगलमुर्तीचे दर्शन घडवल्याबदल सर्वाना धन्यवाद !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

अमोल केळकर's picture

26 Aug 2009 - 9:16 am | अमोल केळकर

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विशाल कुलकर्णी's picture

26 Aug 2009 - 12:40 pm | विशाल कुलकर्णी

वाह, अमोलराव मस्त सजावट ! मन प्रसन्न झाले बघुन. गणपती बाप्पा मोरया !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

ऋषिकेश's picture

26 Aug 2009 - 7:46 pm | ऋषिकेश

सगळ्यांकडचे गणपतीबप्पा मस्त आहेत. बरं वाटले
चित्राताईंच्या लेकीने काढलेला बाप्पा खासच!
मोरया!

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ४५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक श्लोक "गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा...."

मैत्र's picture

26 Aug 2009 - 8:21 pm | मैत्र

पेणची शाडूची सुबक मूर्ती... प्राणप्रतिष्ठापना झालेले गणराज...

लोभस रूप...

पूजेच्या वेळची तयारी आणि आरास...

बाकरवडी's picture

26 Aug 2009 - 8:43 pm | बाकरवडी

आमच्या घरी पण गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे.

गणपती बाप्पा आणि थोडीशी सजावट !

आता उद्या गौरी येणार आहेत,त्यांचे पण फोटो टाकेन !
आरास,सजावट करणे चालू आहे.:)
|| गणपती बाप्पा मोरया ||

:B :B :B बाकरवडी :B :B :B

पूनम९९'s picture

26 Aug 2009 - 8:50 pm | पूनम९९

खूपच छान आहेत सगळ्यांचे गणपती बाप्पा : )

प्रशु's picture

28 Aug 2009 - 1:17 pm | प्रशु

श्रद्धादिनेश's picture

28 Aug 2009 - 12:57 pm | श्रद्धादिनेश

फोटो टाकायचे आहेत.. कोणी मार्गदर्शन करेल का?

प्रशु's picture

28 Aug 2009 - 1:22 pm | प्रशु

पिकासावर फोटो टाका, तिकडची एम्बेडेड लिंक इकडे चिटकवा...