शुष्क नभातुन टाहो कातर, खंडीत धरणी भेगा पाचर,
पिवळ्या सुकत्या गवतावरती, पुन्हा पाडं रे रिमझीमती सर..
मान झुकवुनी गुरे चालती, हलवीत हुंगित लाळ गाळती,
खपाटलेल्या पोटी त्यांच्या, पडेल कैसा दाणा कणभर?
भेगांमधुनी ऊसळे अंकुर, परि कोवळे का क्षणभंगुर,
आटली विहीर पान्हा तळ्भर, कसे पाजावे तान्हं वावर?
सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती?
घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..
प्रतिक्रिया
22 Aug 2009 - 6:50 pm | प्राजु
कविता खूप सुरेख आहे.
सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती?
घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..
सुरेख!!
आटली विहीर पान्हा तळ्भर, कसे पाजावे तान्हे वावरं?
कल्पना खूप सुंदर!!
(कसे पाजावे तान्हे वावर.. मध्ये एक मात्रा जास्त होते आहे.)
(कातर, पाचर, सर.. यातल्या र वर अनुस्वाराची गरज नाही.)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Aug 2009 - 7:15 pm | श्रावण मोडक
सहमत.
फक्त एकच गोष्ट - पहिल्या द्विपदीतील '..रिमझीम सर' काही या कवितेच्या बाकी वजनात न बसणारी आहे. शुष्क नभ, खंडीत धरणी, भेगा, आटलेली विहिर वगैरेमध्ये रिमझिम कुठली? रिमझिम आली काय, गेली काय कळणार नाही. तुमच्या या वर्णनात लागतो तो भिजपाऊस. तोच पाहिजे इथे. कसा ते मात्र मला सांगता येणार नाही. पण तुम्ही जरूर विचार करा. वजन टिकेल.
22 Aug 2009 - 8:04 pm | घाटावरचे भट
'कसे पाजावे तान्हे वावर' ऐवजी 'कसे भिजावे तान्हे वावर' चालू शकेल. अर्थाला फार धक्का लागत नाही. बाकी कविता उत्तम.
22 Aug 2009 - 8:04 pm | घाटावरचे भट
'कसे पाजावे तान्हे वावर' ऐवजी 'कसे भिजावे तान्हे वावर' चालू शकेल. अर्थाला फार धक्का लागत नाही. बाकी कविता उत्तम.
22 Aug 2009 - 9:28 pm | क्रान्ति
सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती?
घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..
सुरेख!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
22 Aug 2009 - 9:56 pm | पक्या
सुरेख कविता.
सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती?
घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..
ह्या ओळी तर खासच.
23 Aug 2009 - 10:18 am | शैलेन्द्र
आपणा सर्वांचे आभार...
23 Aug 2009 - 10:30 am | बिपिन कार्यकर्ते
सुरेख कविता.
बिपिन कार्यकर्ते
23 Aug 2009 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती?
घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..
सुरेख ओळी.
-दिलीप बिरुटे
23 Aug 2009 - 8:44 pm | शैलेन्द्र
मनपुर्वक आभार..
23 Aug 2009 - 9:03 pm | मदनबाण
सुटता वारा भुरभुर माती, आसवांनी का भिजेल शेती?
घाम गाळण्या त्राण राहुदे, इतके तरि दे दान पसाभर..
सुरेख...
ही ओळ वाचुन निळु भाऊंचा हा चेहरा नजरे समोर आला :--
http://www.marathimovieworld.com/preview/goshta-choti-dongraevadhi.php
http://www.marathimovieworld.com/moviestills/gosht-choti-dongara-evadhi.php
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
24 Aug 2009 - 9:03 pm | शैलेन्द्र
निळुभांउसाठी तो चित्रपट पहायचा मोह अनेकदा होतोय, पण....
25 Aug 2009 - 10:40 am | राघव
अतिशय सुंदर! वेदना कशी लिहावी याचे सुंदर उदाहरण आहे तुमची कविता!
प्राजु-श्रावणदांशी सहमत.. पण त्या फार छोट्या जागा आहेत.. तुमच्या कवितेतून जे पोचावयास हवे, ते अगदी सहज पोचतंय! पु.ले.शु.
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!