न्यास

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
21 Aug 2009 - 12:25 am

या जिवाला एक ज्याचा ध्यास होता
तोच की त्याचा खुळा आभास होता?

भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी,
सक्तमजुरी आणि कारावास होता

रंगलेल्या मैफली उधळून जाणे
हा कुणाचा सांग अट्टाहास होता?

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले,
फक्त ओल्या पालवीचा वास होता

राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी
गोंदलेला आमरण वनवास होता

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता

गझल

प्रतिक्रिया

हृषीकेश पतकी's picture

21 Aug 2009 - 10:47 am | हृषीकेश पतकी

रसायन छान जमून आलंय !!

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे |
जो दगा देऊन गेला , श्वास होता ||

उत्तम!!

आपला हृषी !!
:)

विमुक्त's picture

21 Aug 2009 - 10:52 am | विमुक्त

एकदम भारी....

अ-मोल's picture

21 Aug 2009 - 12:10 pm | अ-मोल

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले,
फक्त ओल्या पालवीचा वास होता

सुरेख.

मदनबाण's picture

21 Aug 2009 - 12:22 pm | मदनबाण

झकास्स्स्स... :)

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

विशाल कुलकर्णी's picture

21 Aug 2009 - 12:25 pm | विशाल कुलकर्णी

क्रांतीतै लगे रहो ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

श्रावण मोडक's picture

21 Aug 2009 - 12:37 pm | श्रावण मोडक

राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी
गोंदलेला आमरण वनवास होता
हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

या दोन अधिक भावल्या. एकूण रचना तुमच्या नेहमीच्या वजनातील.

अनिल हटेला's picture

21 Aug 2009 - 2:42 pm | अनिल हटेला

नेहेमी प्रमाणे उत्तमच....

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

दत्ता काळे's picture

21 Aug 2009 - 4:33 pm | दत्ता काळे

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले,
फक्त ओल्या पालवीचा वास होता

. . . . हे मस्तच.

दशानन's picture

21 Aug 2009 - 4:37 pm | दशानन

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

वाह !

काय लिहू समजत नाही आहे.... खुप सुंदर कविता.. व वरील ओळी तर क्लास... एकदम नकळत डोळ्याच्या कडा ओलावून गेल्या... !

:S

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Aug 2009 - 4:45 pm | बिपिन कार्यकर्ते

क्रांतिताई, मस्तच.

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

या ओळी खूपच आवडल्या.

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता

बर्‍याच नातेसंबंधात हे अगदी सामान्यपणे होत असते.

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

22 Aug 2009 - 1:55 am | प्राजु

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता

सर्व गझलच अप्रतिम आहे.. या ओळी तर खासच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सागर's picture

21 Aug 2009 - 4:51 pm | सागर

क्रान्तिजी शब्दच नाहीत

एकही ओळ कमी जास्त नाहिये. त्यामुळे आवडलेल्या ओळी देत नाहिये... सगळी कविताच अप्रतिम आहे...

सुरुवातच एवढी सुंदर केली आहे की अहा हा हा...

फारच सुंदर... अशाच सुंदर कविता अजून लिहा... :)

(कविताप्रेमी) सागर

अवलिया's picture

21 Aug 2009 - 6:39 pm | अवलिया

काय बोलु ?
केवळ सुरेख!

--अवलिया

विसोबा खेचर's picture

22 Aug 2009 - 1:49 am | विसोबा खेचर

सुरेख...!

तात्या.

मनीषा's picture

22 Aug 2009 - 8:25 pm | मनीषा

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले,
फक्त ओल्या पालवीचा वास होता

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता
सुंदर !!!

उत्खनक's picture

22 Apr 2013 - 10:37 pm | उत्खनक

कोणता शेर खास म्हणून निवडावा?
सर्वच एक से बढकर एक आहेत!