माहीत नाही खरी माती
एकसारखी नसलेली छाती
खरे रुपडच माहीत नाय
कलमी झाडाच काय खरं नाय
हापुस पण नाय पायरी पण नाय
नवीन आंब्याची जातच माहीत नाय
धड शाहण पण नाय अन येडं पण नाय
कलमी झाडाच काय खरं नाय
काय द्यायच अन काय घ्यायच माहीत नाय
मी कुठला अन मी कसला माहीत नाय
दिसतय भारी पण आतुन खोकडं
कलम केलेल झाडच वाकडं
गावात पण टिकना
अन इलायत पण जमना
अर्धे गावरान अन अर्धे इलायती रुपडं
कलम केलेल झाडच वाकडं
तिकडच्या मातीचा पण झालो नाय
अन ह्या मातीत पण उरलो नाय
नाव जरी झालं सगळीकडे
प्रेम कुठलच मिळालं नाय
प्रतिक्रिया
21 Aug 2009 - 2:44 pm | विशाल कुलकर्णी
समदंच हायब्रिड झालं ना देवा !
मस्ताय बर्का ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"