स्वाईन फ्लू चा विळखा...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
9 Aug 2009 - 4:01 pm
गाभा: 

स्वाईन फ्लू चे आत्तापर्यंत ५ बळी.

पुण्यानंतर आता मुंबईतही लागण..

उत्तर न मिळालेले काही प्रश्न -

हा रोग असाध्य आहे का?

टॅम्लिन फ्लू की कायसं, एवढं एकच औषध उपयोगी आहे का?

फक्त हवेतूनच पसरतो की अन्न्-पाण्यातूनही?

लक्षणं काय आहेत?

कुणीतरी योग्य ती वैद्यकीय माहिती पुरवावी...

तात्या.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

9 Aug 2009 - 4:09 pm | अवलिया

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4855246.cms

हे वाचा अजुन लिंक देतो

अवलिया's picture

9 Aug 2009 - 4:11 pm | अवलिया
दशानन's picture

11 Aug 2009 - 5:05 pm | दशानन

स्वाइन फ़्लू क्या है?
इंफ़्लुएंज़ा-ए (एच1 एन1) को आम बोलचाल की भाषा में स्वाइन फ़्लू कहा जाता है.

स्वाइन फ्लू के शुरूआती मामले अब से करीब दो महीने पहले मैक्सिको में सामने आए थे. तब से अब तक लगभग सौ देशों में इस संक्रमण ने लोगों को अपनी चपेट में ले लिया है.

प्रयोगशाला में किए गए परीक्षणों से पता चला कि इस वायरस के जींस उत्तरी अमरीका के सूअरों में पाए जाने वाले जींस जैसे हैं इसलिए इसे स्वाइन फ़्लू कहा जाने लगा.

वैज्ञानिक भाषा में इस वायरस को इंफ़्लुएंज़ा-ए (एच1 एन1) कहा जाता है.

कैसे फैलता है स्वाइन फ़्लू?
शुरुआत में ये माना जा रहा था कि इसके संक्रमण में सूअरों की भूमिका होती है.

लेकिन बाद में पाया गया है कि ये इंसान से दूसरे इंसान के संपर्क में आने से फैलता है.

स्वाइन फ़्लू के लक्षण क्या हैं?
इसके लक्षण आम फ़्लू से मिलते जुलते ही हैं इसलिए इसकी पहचान खून की जाँच से ही संभव है.

वैसे इसके प्रमुख लक्षण हैं- सिर में दर्द, बुखार, गले में खराश, खांसी, बदन में दर्द, सांस लेने में दिक्कत.

वैज्ञानिकों को चिंता सता रही है कि भारत सहित जिन देशों में आजकल आम फ़्लू का सीज़न चल रहा है उसके वायरस के साथ मिलकर एच1एन1 परेशानी पैदा कर सकता है.

इसके गंभीर संक्रमण के कारण शरीर के कई अंग काम करना बंद कर सकते हैं जिसके कारण मौत भी हो सकती है.

क्या इसका इलाज संभव है?
कुछ हद तक इसका इलाज संभव है. इसके मरीज़ों का उपचार टैमीफ़्लू नामक वायरसरोधी दवा से किया जा सकता है.

डॉक्टरों के अनुसार ये दवा इस फ़्लू को रोक तो नही सकतीं पर इसके ख़तरनाक असर को कम ज़रूर कर सकती है.

डॉक्टरों का कहना है कि इस समय वायरस इतना कमज़ोर है कि ज़्यादातर लोग बिना किसी दवा के उससे उबर जाते हैं.

इसके बचाव के क्या उपाय हैं?
स्वाइन प़्लू से बचने का सबसे अच्छा तरीका स्वच्छता के नियमों का पालन करना है.

भीड़-भाड़ वाली जगहों या सार्वजनिक स्थानों पर जाने से बचें, खांसते और छींकते वक्त मुंह और नाक को रूमाल या कपड़े से ढंकें.

फ्ल़ू प्रभावित व्यक्ति से दूरी बनाकर रखें और सार्वजनिक स्थानों पर जाने पर तीनस्तरीय मास्क लगाएँ.

क्या इसका टीका उपलब्ध है?
स्वाइन फ़्लू को रोकने के लिए अभी तक कोई टीका नहीं विकसित हो पाया है.

विश्व स्वास्थ्य संगठन ने घोषणा की है कि सितंबर से स्वाइन फ़्लू का टीका आम लोगों को उपलब्ध हो सकेगा.

कई दवा निर्माता कंपनियों ने एच1एन1 टीका तैयार किया है और कई देशों में इसका परीक्षण चल रहा है.

दुवा : http://www.bbc.co.uk/hindi/india/2009/08/090810_swineflu_factsheet_ac.shtml

बीबीसी !

*****

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

_समीर_'s picture

11 Aug 2009 - 5:14 pm | _समीर_

अरे हे काय आहे? एखादी ओळ/परिच्छेद अमराठी भाषेत ठीक आहे. इथे अख्खा लांबलचक प्रतिसाद हिंदीत लिहिला आहे.

अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ.????

दशानन's picture

11 Aug 2009 - 5:34 pm | दशानन

तु कोण आहेस बे :?

साला.... फुकटचा हाफ चड्डी हवलदार.... !
तुम्ही काय करु नका दुस-याला काय करु देऊ नका.... !

चड्डीछाप .... हुड !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

दशानन's picture

9 Aug 2009 - 4:14 pm | दशानन

छान दुवा !

मिडियामुळे तर आहाकार माजल्यासारखं हाल करुन ठेवला आहे... ह्यांना आधी कोणीतरी सांभाळा रे.... :(

गुडगावं मध्ये हाल ठीक आहे पण चांगला नाही आहे !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !

विशाल कुलकर्णी's picture

11 Aug 2009 - 11:23 am | विशाल कुलकर्णी

http://magevalunpahtana.wordpress.com/2009/08/11/what-is-swine-flue/

माझ्याकडे एक पी.डी. एफ. मधील बुकलेट आहे H1N1 Virus च्या संदर्भात ते इथे कसे डकवता येइल?

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

गोगोल's picture

9 Aug 2009 - 4:34 pm | गोगोल

स्वाइन फ्लु बद्दल नेमकी आणि प्रतिबंधात्मक माहिती काहीच मिळत नाही. एखादा रोग एपिडेमिक चे स्वरूप धरण करतो आणि तुम्ही रुग्ण नी घरी राहावे, हात धुवावे, त्याच्यापासून लांब राहावे अशी जनरल माहिती काय देता?

मी नेटवर थोडा फार शोध घेतला. सर्जिकल आणि नॉर्मल मास्क्स फारसे काही कामाचे नाहीत. या वाइरस ची काही लांबी असते ती नॉर्मल मास्क्स मधून फिल्टर होत नाही. असे मास्क पेशेंट लोकांनी लावले पाहिजेत ज्याणेकारून त्यांचे जंतू दुसर्यांच्या अंगावर डाइरेक्ट्ली पडणार नाहीत.
पण जर का तुम्हाला प्रिकॉशन म्हणून मास्क लावायचा असेल तर रासायनिक युध्ाच्या वेळी लावतात तसे हवबंद मुखवटे पण नानो फिल्टर सोबत लावले तारा 100 टक्के खात्री देता येईल की तुम्ही बचावाल. न-95 मास्क्स च्या सुरक्षेविषयी मत भिन्नता आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2009 - 7:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुवे फालतू वगैरे म्हणू नये, असे वाटते. कारण प्रत्येकाला जशी माहिती मिळते ते सांगण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. बाकी स्वाइन फ्लु बद्दल नेमकी आणि प्रतिबंधात्मक माहिती काहीच मिळत नाही. एखादा रोग एपिडेमिक चे स्वरूप धरण करतो आणि तुम्ही रुग्ण नी घरी राहावे, हात धुवावे, त्याच्यापासून लांब राहावे अशी जनरल माहिती काय देता? याच्याशी किंचीत सहमत आहे. हात धुवावे, रुग्णापासू दूर राहावे, हा उपाच आहेच असे वाटते. स्वाइन फ्लू च्या प्रतिबंधात्मक उपायाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. टॅम्लिन फ्लू आणि अन्य औषधी ही स्वाइन फ्लूची लागण झाल्यावर त्यानंतरचा उपाय आहे. पण तो पर्यंत या विषाणूंना प्रतिबंध व्हावीत यासाठी काही औषधी घ्यावीत का ? त्याची नेमकी माहिती मिळत नाही, ती मिळाली पाहिजे. त्यावर भर दिला पाहिजे असे वाटते.

दैनिकातून ज्या काही बातम्या वाचायला मिळत आहे, त्यात हे विषाणू एखादा माणूस शिंकल्यानंतर उडणार्‍या तुषारातून म्हणे आठ तास जिवंत राहतात आणि त्याच्या संपर्कात येणार्‍यांना त्याची लागण होऊ शकते. आता या आठ तासात गर्दीच्या ठिकाणी कितीतरी लोकांचा संपर्क येऊ शकतो तेव्हा सर्वांनाच त्याची लागण होते का ? किंवा ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, अशाच रुग्णांना याची लागण होते या बद्दलही काही माहिती मिळत नाही. गर्दी टाळणे, रुग्णाशी संपर्कात न येणे, हा उपाय आहेच.

मेक्सिकोने जे काही उपाय केले होते, ज्या 'मॅक्सिको मॉडेल' ची जागतिक आरोग्य संघटनेने प्रशंसा केली होती. [माहिती संदर्भ दै. स़काळ ] त्यात शिक्षण संस्था बंद ठेवणे, उद्रेक झालेल्या राज्यात पाच दिवस संचारबंदी, नागरिकांना फ्लू रोधक मास्क, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी, हॉटेल, बार, चित्रपटगृहे बंद, सार्वजनिक ठिकाणी दहा दिवस बंद तशाच काही उपाययोजना आपल्याला करावी लागते की काय असे वाटायला लागले आहे.

अर्थात स्वाईन फ्लू:संशयितांना देणार टॅमिफ्लू ही बातमी चांगली वाटली, तेव्हा ज्यांना स्वाइन फ्लूचा संशय वाटतो त्यांनी टॅमिफ्लू घ्यावी असे वाटते.

-दिलीप बिरुटे

वेदश्री's picture

9 Aug 2009 - 8:30 pm | वेदश्री

टॅमिफ्लूच्या गोळ्या म्हणजे काय लिमलेटच्या गोळ्या आहेत का? त्याच्या साईड इफेक्ट्सचे काय? समजा मी स्वाईन फ्लूची संशयित आहे म्हणून मला टॅमिफ्लूचा डोस दिला आणि मग निष्पन्न झालं की प्रत्यक्षात मला स्वाईन फ्लू झालेलाच नाहीये. मग? माझे काय? मला जो काही आजार झालेला आहे त्याच्या उपचाराला उशीर झाला म्हणून मी मरणार??!!! समजा मी वाचलेच तर टॅमिफ्लूच्या साईड इफेक्ट्सचे काय?

एकतर गोळ्यांचा साठा मर्यादित आहे जो योग्यप्रकारे वापरला गेला पाहिजे. असे संशयितांना देऊन औषध खलास करून प्रत्यक्षात ज्यांना गरज आहे त्यांनाच कमी पडायचे! शिवाय त्या विषाणूला या औषधाची 'सवय' झाल्यास काय होईल ते तर राम जाने!

मलातरी वाटते की चाचणी परीक्षा लवकरात लवकर कशी करून घेता येईल यावर जोर देऊन 'योग्य उपचार'च केले गेले पाहिजे. साप समजून दोरीला धोपटण्याचे प्रकार किमान स्वास्थ्याच्या क्षेत्रात तरी करू नयेत असे प्रामाणिक मत आहे.

नितिन थत्ते's picture

9 Aug 2009 - 8:53 pm | नितिन थत्ते

टॅमिफ्लू (आणि रेलेंझा) अमेरिकेत बंदी असलेली औषधे आहेत परंतु तातडीची उपाययोजना म्हणून वापरायला अमेरिकन सरकारने परवानगी दिली आहे.

पुढील प्रश्नांची उत्तरे मिळाली तर उलगडा होऊ शकेल.

  1. स्वाईन फ्लू ची लागण झाली म्हणजे माणूस मरणार असे निश्चित आहे का?
  2. (भारतात) साध्या फ्लू वर आपण अ‍ॅण्टीवायरल औषधे न घेता पॅरासिटॅमॉल/निमेसुलाइड घेतो ते पुरेसे नाही का?
  3. अ‍ॅमॉक्सिसिलिन किंवा सेफ्टम वगैरे अ‍ॅण्टीबायोटिक काम करीत नाहीत का?
  4. स्वाईन फ्लू सापडलेल्या इतर रुग्णांची स्थिती काय आहे?

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

१. स्वाईन फ्लू ची लागण झाली म्हणजे माणूस मरणार असे निश्चित आहे का?

नाही. मृत्यू अटळ नाही - प्रभावितांपैकी काही टक्के लोकांना मृत्यू येऊ शकेल. ही टक्केवारी बहुधा खूप लहान आहे. पण किती आहे, हे आता सांगता येत नाही. गणित संदिग्ध का आहे, त्याचे कारण मागच्या धाग्यात दिले होते.

काही लहान टक्केवारीलाच मृत्यू आला, तरी ही लक्ष देऊन काळजी घेण्याची स्थिती आहे.

२. (भारतात) साध्या फ्लू वर आपण अ‍ॅण्टीवायरल औषधे न घेता पॅरासिटॅमॉल/निमेसुलाइड घेतो ते पुरेसे नाही का?

बहुतेक लोकांना पुरेसे आहे. पण "श्री. क्ष"ला सौम्य आजार झाला, पॅरॅसेटामॉल पुरेसे आहे, तरी त्याची कार्यालयीन सहकारी "मिस. य", त्याचे मूल "कु. य" आणि त्याची वृद्ध आत्या "सौ. ज्ञ" यांना लागण होऊ नये अशी काळजी "श्री. क्ष" याने घ्यावी. हात धुवावेत, शिंका आवराव्यात, घरीच राहावे, इ.इ.

३. अ‍ॅमॉक्सिसिलिन किंवा सेफ्टम वगैरे अ‍ॅण्टीबायोटिक काम करीत नाहीत का?

विषाणूंविरुद्ध प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) काम करत नाहीत. विषाणूंमुळे नाजुक झालेल्या फुप्फुसांमध्ये जर कीटाणूंचा (बॅक्टेरियांचा) संसर्ग झाला, त्यातून न्युमोनिया झाला, तर त्याविरुद्ध प्रतिजैविके वापरावी लागतात. मात्र त्यांनी विषाणूंचा निचरा होत नाही. उगाच प्रतिजैविके घेऊन फ्लूचा प्रतिबंधही होत नाही.

४. स्वाईन फ्लू सापडलेल्या इतर रुग्णांची स्थिती काय आहे?

प्रश्न समजला नाही. बहुतेक रुग्ण सावरले आहेत. काही रुग्णांची स्थिती बरी आहे. काही मेले आहेत.

नितिन थत्ते's picture

10 Aug 2009 - 8:24 pm | नितिन थत्ते

>स्वाईन फ्लू सापडलेल्या इतर रुग्णांची स्थिती काय आहे?
>प्रश्न समजला नाही.
प्रश्नाचा उद्देश बहुतेक रुग्ण सावरले आहेत आणि काही मेले आहेत या सारखे (किंवा उलट) उत्तर मिळवणे हाच होता. ते आपण दिलेच आहे.

अजून एक प्रश्न. सध्या चांगले असलेल्या (ताप वगैरे काही न आलेल्या) लोकांची परीक्षा केली तर किती लोकांच्यात साध्या फ्लूचे आणि स्वाईन फ्लूचे विषाणू सापडण्याची शक्यता आहे? याचा उद्देश विषाणूची लागण झाली तरी ताप आला नाही असे होण्याची शक्यता आहे का? हे जाणण्याचा आहे. तसे होत असेल तर ते अधिक धोकादायक आहे असे वाटते कारण ताप न आल्यामुळे क्वारंटाइन वगैरे होणार नाही आणि रोग मात्र पसरत राहील.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

लिखाळ's picture

10 Aug 2009 - 8:47 pm | लिखाळ

अजून एक प्रश्न. सध्या चांगले असलेल्या (ताप वगैरे काही न आलेल्या) लोकांची परीक्षा केली तर किती लोकांच्यात साध्या फ्लूचे आणि स्वाईन फ्लूचे विषाणू सापडण्याची शक्यता आहे?

अतिशय रास्त प्रश्न.
सकाळ मध्ये आताच एक चांगला लेख आला आहे.
स्वाइन फ्लू - ओळख आणि प्रतिकार
त्यामध्ये लिहिल्या प्रमाणे ''या विषाणूंचा Incubation Period ७-८ दिवस असतो म्हणजे विषाणू शरीरात शिरल्यापासून १ ते ८ दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात.''
त्यामुळे हे आठ दिवस रोग पसरण्याचे असू शकतील असे मला वाटते.

सकाळ मधला तो लेख जरूर वाचावा.
तसेच स्वाइन फ्लू'बाबत कोणती खबरदारी घ्यावी? हा लेख सुद्धा वाचनीय.

-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

वेदश्री's picture

11 Aug 2009 - 7:41 am | वेदश्री

अनावश्यक टॅमिफ्लू घेऊ नका हा सकाळमधला लेख पाहून हुश्श झाले! कोणीतरी तर आहे या गोष्टीकडेही लक्ष देणारे..!

ऋषिकेश's picture

10 Aug 2009 - 9:40 pm | ऋषिकेश

पण तो पर्यंत या विषाणूंना प्रतिबंध व्हावीत यासाठी काही औषधी घ्यावीत का ?

माझ्या अत्यल्पशा माहितीप्रमाणे अशी कोणतीही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.

वेळोवेळी हात धुतले, दिवसात ठरविक अंतराने स्वच्छ रूपाल वापरायला घेतले, सार्वजनिक ठिकाणी खाताना (जसे कँटीन) शक्यतो घरचे ताट-वाटी-चमचा नेले, व घरी गेल्यावर ते गरम पाण्याने धुतले, ऑफीसातील कॉफीमग पिण्याआधी गरम पाण्याने नीट खंगाळून धूऊन मग पेयपान केले तरी ह्या फ्लू ची लागण होण्याची शक्यता अतिशय कमी होते.

अर्थातच ही माझ्यासारख्या एका आय्टी क्षेत्रातील काम करणार्‍या व्यक्तीची जुजबी माहिती आहे. डॉ. धनंजय, डॉ.दाढे आदी वैद्यकीय क्षेत्रातील/क्षेत्राशी निगडीत मिपाकर म्हणतीत त्यावर अधिक विश्वास ठेवेन/मिपाकरांनी ठेवावा असे वाटते

(सचिंत)ऋषिकेश

अवलिया's picture

10 Aug 2009 - 11:15 am | अवलिया

>>>दोन्ही दुवे फालतू आहेत

अगदी अगदी... सहमत आहे.
चुक झाली साहेब... थोडी आपल्याला मिळालेली माहिती सांगावी या उद्देशाने लिंक दिल्या.. पण त्या लिंक किती उपयोगी किंवा चांगल्या आहेत की फालतु आहेत हे माझ्या सुमार बुद्धिला काही उमगले नाही.
भविष्यात अशी चुक होणार नाही याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न करेल.
माझ्या मुळे झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे व आपली माफी मागत आहे... !

आमच्या सारख्या मुर्ख व गांवढळ लोकांनी दिलेले दुवे फालतु असतात तस्मात त्याकडे मिपावरील लोकांनी दुर्लक्ष करावे ही जाहीर विनंती.

--अवलिया

2. मला वाईट या गोष्टीच वाटला की पुणे यूनिवर्सिटी च्या दुव्यावर सुद्धा चांगली माहिती मिळाली नाही. पुणे यूनिवर्सिटी कडून तरी जरा बर अपेक्षा होती.
3. तुम्ही दुवे बघितले आणि ते पोस्ट केले. यात तुमची चुकी ती काहीच नाही. त्यामुळे नको त्या गोष्टी पर्सनली घेऊ नका ही विनंती. पुन्हा एकदा..मी दुवे फालतू आहेत अस म्हणालो, दुवे देणारे नाही.

दशानन's picture

9 Aug 2009 - 4:56 pm | दशानन

हे वाचा आपल्या देशाच्या स्वास्थ मंत्रीच्या अकलेचे तारे.....

ही नेता मंडळी मुर्ख असतात की निवळ मुर्खासारखे वागतात :?

काही कळत नाही.. आधीच देशात अडचणींची कमी नाही त्यात ह्यांची नाटके !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !

प्रदीप's picture

9 Aug 2009 - 4:53 pm | प्रदीप

खालील प्रतिसाद मी अन्यत्र अशाच प्रश्नांना दिला होता. विषयाच्या गांभिर्यामुळे तो इथे जसाच्या तसा उधृत करण्यास हरकत नसावी असे मला वाटते.

मी तज्ञ नाही, तरी सार्स व स्वाईन फ्ल्यू ह्या दोन्ही संसर्गजन्य रोगांच्या हल्ल्याला सामना कराव्या लागणार्‍या ठिकाणी राहतो, तेव्हा जे काही माहिती आहे, ते सर्वसाधारण व्यक्तिच्या दृष्टिकोनांतून लिहीत आहे.

स्वाईन फ्ल्यूची लक्षणे साध्या फ्ल्यू बरीचशी सारखीच असली तरी काही बाबतीत फरक आहे. स्वाईन फ्ल्यू मध्ये घसा धरतोच. आणि महत्त्वाचा फरक म्हणजे स्वाईन फ्ल्यूत उच्च स्वरूपाचा ताप (High fever) असतो, तो पॅनॅडॉलने कमी होत नाही, साध्या फ्ल्यूचे तसे नसते.

स्वाईन फ्ल्यूचे वैशिष्ट्य हे की त्याचे जीवाणू फुफुसांत वाढू शकतात, व तेथील स्नायूंवर हल्ला करून ते त्यांना कमजोर करतात. त्यामुळे खोकला व श्वासोश्वासास त्रास ही लक्षणेही चढत्या प्रमाणात असतात.

रक्ततपासण्यांनी स्वाईन फ्ल्यू आहे किंवा नाही, हे तज्ञांना समजू शकते. त्या वेळीच झालेल्या बर्‍या. वेळीच उपाययोजना करून स्वाईन फ्ल्यूवर (अद्यापतरी) मात करता येते. ओसेल्टामिविर (ब्रँड नावः टॅमिफ्ल्यू ) हा एक उपाय आहे. पण ही उपाययोजना डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच व्हावी.

साथ झपाट्यानी पसरते आहे.जर या वेगानी पसरत राहीली तर औषधाचा तुडवडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. टॅमीफ्लू सारखे आणखी एक औषध रेलांजा आहे. टॅमीफ्लूचा पुरवठा ताबडतोबीने होणे कठीण आहे.या गोळ्यांचे शेल्फ लाईफ कमी असल्यामुळे साठा मोठ्या प्रमाणात केला जात नाही.टेमीफ्लूचे साईड इफेक्ट बरेच आहेत.
अशी साथ येण्याची शक्यता हॉफमन ला रोश या कंपनीने २००५ साली वर्तवली होती.(बर्डफ्लूच्या साथ आली तेव्हा)
दाट लोकवस्तीत हा रोग फैलावण्याची शक्यता जास्त आहे.( हवेतून संक्रमण होत असल्यामुळे )हा रोग अन्नपाण्यतून पसरत नाही.शक्यतो गर्दीच्या सार्वजनीक ठिकाणी न गेल्यास प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी आहे.परंतू भारतापुरतं बोलायचं झाल्यास परीस्थिती गोंधळाची आहे.आज संध्याकाळी मंत्रीमंडळ शाळा बंद ठेवण्यासारखे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
रोगाची लक्षण इतरवेळी होणार्‍या फ्लू सारखी आहेत.त्यामुळे भितीपोटी हॉस्पीटलमध्ये गर्दी वाढण्याची आणि नवा गोंधळ होण्याची शक्यता आहे.
मी व्हिटामीन सी आणि सेप्टलीन नावाचे औषध घेतो आहे .
http://www.himalayahealthcare.com/researchpaper/septilin.htm
मिपाच्या जाणत्या सदस्यांनी आणखी माहीती द्यावी.

दशानन's picture

9 Aug 2009 - 5:12 pm | दशानन

* यदि किसी व्‍यक्ति में स्‍वाइन फ्लू के लक्षण नजर आएं और वह टैमीफ्लू नाम की एंटीवायरल दवा ले तो, क्‍या वह संक्रमण से बच सकता है।

- स्‍वाइन फ्लू से बचने के लिए एंटीवायरल दवा लेनी चाहिए, इससे संक्रमण फैलने के आसार कम हो जाते हैं। लेकिन सभी संक्रमित लोग एक ही एंटी वायरल दवा नहीं ले सकते हैं।

* यदि किसी गर्भवती स्‍त्री को इसका संक्रमण हो जाए, तो।

- गर्भावस्‍था के दौरान स्त्रियों को सलाह दी जाती है, कि वो ऐसा कुछ भी न करें, जिससे उन्‍हें सर्दी या जुकाम हो जाए। क्‍योंकि इसका सीधा असर गर्भ में पल रहे बच्‍चे पर पड़ता है। इसलिए गर्भवती महिलाओं को स्‍वाइन फ्लू के इंफेक्‍शन से बचना चाहिए।

* क्‍या बर्ड फ्लू, स्‍वाइन फ्लू और एनफ्लुएंजा एक ही बीमारी के अलग-अलग प्रकार हैं।

- नहीं यह तीनों अलग-अलग बीमारियां हैं।

* स्‍वाइन फ्लू के बारे में कैसे पता चला। क्‍या यह सामान्‍य फ्लू से ज्‍यादा खतरनाक है।

- स्‍वाइन फ्लू पहले सिर्फ सूअरों में पाया जाता था, धीरे-धीरे यह सूअरों से पक्षियों तक पहुंच और अब इनसानों में भी इसका संक्रमण होने लगा है। पहले किसी को इस बात की उम्‍मीद नहीं थी कि इसके संक्रमण से मौत भी होती होगी, पर मैक्सिको में मौत के मामले सामने आए तब इसके बारे में पता चला।

* स्‍वाइन फ्लू से बचने के लिए क्‍या सफाई रखना भी जरुरी है।

- स्‍वाइन से बचने के लिए आसपास सफाई रखने के साथ ही साथ हाथों की सफाई भी मायने रखती है। इसके लिए एल्‍कोहल मिले हुए साबुन से हाथ धोना चाहिए। लोगों को सामान्‍य से ज्‍यादा मात्रा में साबुन से हाथ धोना चाहिए और कम से कम 30 सेकंड तक हाथों को अच्‍छी तरह धोना चाहिए।

* क्‍या अस्‍थमा से पीडि़त मरीजों को विशेष क्‍योरमेंट की जरुरत है।

- इसके लिए अपने डॉक्‍टर से सलाह लें।

(स्‍वाइन फ्लू के बारे में यह जानकारी मात्र है। किसी भी प्रकार की दवा या प्रिकॉशन के लिए अपने डॉक्‍टर से सलाह लें।)

दैनिक भास्करहून सभार.

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
तुझ सम नाही दुसरा ध्वज
रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !

मराठमोळा's picture

9 Aug 2009 - 6:02 pm | मराठमोळा

माझ्या ओळखीतल्या एका डॉक्टरच्या माहितीप्रमाणे हा रोग सामन्य फ्लु पेक्षा थोडा वेगळा आणी धोकादायक आहे. झपाट्याने पसरतो आणी रोग्याला असाध्य अवस्थेपर्यंत नेऊ शकतो विकिपेडियावर याची पुर्ण माहिती उपलब्ध आहे.
स्वाईन फ्लु बद्दल माहिती

लहान मुले, वयोवृद्ध आणी अशक्त व्यक्तींना हा रोग झाल्यास ते दगावण्याची शक्यता वाढते. तरुण आणी सशक्त लोक यातुन लवकर बरे होऊ शकतात.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा स्वाईन फ्लू होऊ देऊ नये ;) !!

शैलेन्द्र's picture

9 Aug 2009 - 6:08 pm | शैलेन्द्र

अजुन काहि महत्वाचे...

वरिल सर्व गोष्टी तर कराच पण आधी शरिराची तट्बंदी म्हणजे इम्युन सिस्टीम बळकट करा. असे काहिही करु नका ज्याने तुम्ही आजारी पडाल. जर आपण आधीच आजारी असाल तर सरळ दुरच्या, कमी लोक्वस्तिच्या गावी निघुन जा.

विकास's picture

9 Aug 2009 - 6:54 pm | विकास

सेंटर फॉर डिसिज कंट्रोल च्या संकेतस्थळावर याची खूप माहीती विविध पद्धतीने ठेवली आहे. लेखी, वेबकास्ट, पॉडकास्ट (ध्वनीमुद्रीत), व्हिडीओ (चित्रफीत) आणि ते फेसबूक, ट्विटर, ब्लॉग्ज सगळ्याचाच उपयोग करत विविध पद्धतीने जनतेला सांगत आहेत.

हात धुणे, लांब रहावे वगैरे माहीती साधी वाटते (आणि आहे सुद्धा), पण जनतेने तेच करणे अधिक महत्वाचे असते. नाहीतर घबराटीमुळे अधिक वाईट परीणाम होऊ शकतात.

सिडीसीने केलेली माहीतीपत्रके पहाण्यासारखी आहेत. त्यातील एका माहीतीपत्रकातील थोडी मधील माहीती खाली देत आहे, (संपुर्ण माहीती येथे पहा):

203075-A HEALTH ALERT
Novel H1N1 Flu

Look for these symptoms:

FEVER AND
• Cough
• Sore throat
• Runny or stuffy nose
Other symptoms may include:
• Body aches
• Headache
• Fatigue
• Chills
• Diarrhea
• Vomiting

People with certain chronic medical conditions, adults 65 years or older, children younger
than 5 years old, and pregnant women may be at higher risk for severe illness.

हे दुसरे माहीतीपत्रक. फ्लूसंदर्भातील पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वाईन फ्लूला पण ही माहीती लागू आहे.

Flu is a serious contagious disease.
Each year in the United States, on average, more than 200,000 people are hospitalized and 36,000 people die from seasonal flu complications.

This flu season could be worse. (अमेरिकेत सप्टेंबर नंतर फ्लू सिझन चालू होईल).

There is a new and very different flu virus
spreading worldwide among people called novel or new H1N1 flu. This virus may cause more illness or more severe illness than usual.

Flu-like symptoms include:
■ fever (usually high)
■ headache
■ extreme tiredness
■ dry cough
■ runny or stuffy nose
■ muscle aches
■ sore throat
■ vomiting
■ sometimes diarrhea

सगळ्यात शेवटी शिंकणे अथवा खोकणे कसे करावे याचे एक चित्र!

प्राजु's picture

9 Aug 2009 - 8:10 pm | प्राजु

पुणेकर , मुंबईकर मिपाकरांनी सांभाळून रहावे.
सगळ्यांनी हात वरचेवर धुवातेत..
हात अँन्टीबॅक्तेरिअल ने वरचेवर धुण्याने या रोगाचा प्रसार बराच आटोक्यात येऊ शकते असे इथल्या तज्ञांचे म्हणणे आहे. खास करून लहान मुलांसाठी. साधी गोष्ट आहे ही पण फार परिणाम कारक आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पक्या's picture

10 Aug 2009 - 2:40 am | पक्या

आता तर गणेशोत्सव जवळ येत आहे. हा तर गर्दी जमण्याचा सार्वजनिक सण . पण लोकांनी भान ठेवून गर्दीत जाणे टाळले पाहिजे.
गर्दी टाळणे, शेकहँड करणे शक्यतो टाळणे , वारंवार अन्टीबॅक्टेरिअल सोलूशन ने हात धुणे हे प्राथमिक उपाय केलेच पाहिजेत. वारंवार इतर लोकांचा संपर्क होतो अशा वस्तूंना आपण हात लावण्याचे जेवढे टाळता तेवढे चांगले . उदा, खुर्ची, टेबलं, पेन, संगणकाचा की-बोर्ड -माउस; तसेच दरवाजाच्या मुठी, कठडे व टेलिफोन ... (हे सर्व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वस्तूंबद्द्ल बोलतोय. पर्सनल वस्तूंबाबत नाही.)

दशानन's picture

10 Aug 2009 - 8:30 am | दशानन

पुण्यामध्ये तिसरा मृत्यु !
डॉक्टर बाबासाहेब माने !

*
पुणेकरांनो जपुन रहा !
स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्या !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

दशानन's picture

10 Aug 2009 - 9:27 am | दशानन

सहावा मृत्यु !
:(
चैन्ने मध्ये !

एक काम करा रे सर्वजण... टॉमीफ्लुच्या गोळ्याचा साठा करा !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

समंजस's picture

10 Aug 2009 - 11:09 am | समंजस

लवकरात लवकर संभाव्य रूग्णाच्या घशाची तपासणी हे होणे खूपच आवश्यक आहे. आणि हे झालं तरंच वेळेवर योग्य उपचार होउन रूग्ण वाचू शकतो(Tamiflu) च्या गोळ्या घेउन (सध्यातरी फक्त हेच एकमेव औषध उपलब्ध आहे या रोगावर) :(

मात्र गंभीर समस्या ही आहे की, ही तपासणी महाग आहे.(साधारण रूपये ५००० ते ६५०० दर रूग्ण), आणि ती सुदधा फक्त मोजक्याच प्रयोग शाळेत(Labs) मध्ये. त्यामुळे अर्थातच रूग्णालयात येणार्‍या सर्वच रूग्णांवर ही तपासणी सरकार नाही करू शकणार/करणार नाही. पण यामुळे दोन शक्यता आहेत एक, रूग्णांवर उशीरा तपासणी होउन, औषधोपचाराला उशीर होउ शकतो. दोन, हे कळायला उशीर झाल्यामुळे, जवळचे नातेवाइक आणि संर्पकात आलेल्या इतर व्यक्तीना सुदधा ह्या रोगाची लागण होउ शकते.
(ह्या रोगाच्या तपासणीचा खर्च कमी करण्या करीता संबधीत व्यक्तीनी काही तरी करायला हवे)

स्वाइन फ्लूची रोगनिदान चाचणी कोणकोणत्या इस्पितळांत केली जाऊ शकते याची शहरनिहाय यादी मिळू शकेल काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन's picture

10 Aug 2009 - 12:35 pm | दशानन

कोणी तरी सांगितले आहे की व्हिस्की मुळे पण बचाव होऊ शकतो... खरं आहे का ???

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

_समीर_'s picture

11 Aug 2009 - 6:42 am | _समीर_

ओ राजे जरा गप बसा आता!! अर्धवट माहितीवर काहीतरी अफवा पसरवू नका.

शैलेन्द्र's picture

11 Aug 2009 - 8:22 am | शैलेन्द्र

माहीती बरोबर आहे हो... फक्त ती व्हीस्की श्व्सन मार्गाने (नाकाने) आणि तोंडानेही घशापर्यंत आणि फुफ्फुस्सात न्यायची... पोटात नाही,

बाकी अन्टीसेप्टीक ऐवजी अब्सोलुट अल्कोहोलने हात वरचेवर साफ करणे हा उत्तम उपाय आहे.

अश्विनीका's picture

11 Aug 2009 - 12:30 am | अश्विनीका

बापरे !
आम्ही पुण्यात २ छोट्या मुलांसह नोव्हेंबर चा शेवटचा आठवडा आणि डिसेंबर पूर्ण महिना सुट्टीसाठी येत आहोत. आता ही ट्रिप पुढे ढकलावी की काय?

>> पुणेकरांनो जपुन रहा !
>>स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्या !
असेच म्हणते

- अश्विनी

सकाळ मधे आज बालाजी तांब्यांचा सल्ला आला आहे. त्यात आयुर्वेदाबद्दल नेहमी म्हणले जाते त्याप्रमाणे उपाय झाला नाही तरी अपाय नक्की होणार नाही असे वाटते म्हणून शक्यतितका तो सर्वांनी पाळावा असे म्हणावेसे वाटत आहे. लोकशिक्षणासंदर्भातील माहीती असल्याने मी जशीच्या तशी येथे चिकटवत आहे (अर्थात मूळ स्त्रोताचा दुवा देऊन).

सकाळ वृत्तसेवा

* Posted: 11/08/2009 12:17 AM IST

भरपूर पाणी प्या; पंधरा मिनिटे प्राणायाम करा
पुणे - "भरपूर पाणी प्या, किमान पंधरा मिनिटे प्राणायाम करा; घरात, कार्यालयात धूप जाळून धूर करा आणि सार्वजनिक ठिकाणांचा सहभाग शक्‍यतो टाळा, "मास्क'चा आवर्जून वापर करा,'' असे आवाहन ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी केले आहे. "स्वाइन फ्लू'च्या वेगाने पसरणाऱ्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी नागरिकांना हे आवाहन केले आहे.
वातावरणातील असंतुलनामुळे हवेच्या माध्यमातून जंतुसंसर्गाचे संकट येऊ शकते, याची जाणीव डॉ. तांबे यांनी "फॅमिली डॉक्‍टर'मधून यापूर्वीच करून दिली होती. पावसाळ्यात हवेत खूप आर्द्रता असते; शिवाय सूर्यप्रकाश कमी असतो. हे सर्व वातावरण कृमी व जंतूंना पोषक असते. म्हणूनच या काळात जंतुसंसर्गजन्य रोगराईचे प्रमाण बरेच वाढते. पावसाळ्यात पाणी दोषयुक्‍त होऊ शकते, अग्नी मंद झाला म्हणजेच शरीरातील एकंदर तेजस्विता कमी होते, शरीराचे स्वाभाविक बल कमी झाले, की रोगप्रतिकारशक्‍ती कमी होते आणि यातून अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
उद्याचे नागरिक असलेल्या मुलांना या साथीपासून वाचवणे ही आपली पहिली जबाबदारी आहे, असे स्पष्ट करून डॉ. तांबे म्हणाले, ""मुलांमध्ये ही साथ वेगाने पसरत आहे. त्यांना वाचविण्यास प्राधान्य द्यायला हवे. त्याचबरोबर इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्यायला हवी. या दृष्टीने सार्वजनिक हित लक्षात घेऊन या समस्येकडे पाहायला हवे.''
सार्वजनिक ठिकाणांचा सहभाग शक्‍यतो टाळण्याचे आवाहन डॉ. तांबे यांनी केले आहे. त्याचबरोबर साथ आटोक्‍यात येईतोवर "मास्क' आवर्जून वापरण्यासही त्यांनी सुचवले आहे. शाळांमध्ये आरोग्यासंदर्भातील दक्षता खूपच कमी घेतल्या जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शाळांमध्ये पाच-सहा तास मुले असतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे करायला हवे ते प्रत्यक्षात केले जात नाही. ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्राथमिक तत्त्वावर सर्व शाळा दहा दिवस बंद ठेवायला हव्यात. या काळात शाळांमधील सर्व स्वच्छतागृहे नीट साफ करून घ्यायला हवीत. पाण्याच्या टाक्‍या स्वच्छ करून मुलांना पिण्यासाठी मुबलक पाणी द्यायला हवे. मुलांनी वारंवार स्वच्छतागृहात जाऊ नये, म्हणून कित्येक शाळांत मुलांना पुरेसे पाणी पिऊ दिले जात नाही, हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे, याकडेही डॉ. तांबे यांनी लक्ष वेधले, तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ज्या ज्या भागांत "स्वाइन फ्लू'चा प्रादुर्भाव झाला आहे, अशा सर्व भागांत व उपनगरांत तसेच या भागाशी संपर्क येणाऱ्या गावांमध्येही ही दक्षता घेतली जावी, असे आवाहन डॉ. तांबे यांनी केले आहे.
""कोणत्याही कारणाने शाळा सुरू असतील, तर मुलांनी भरपूर पाणी घरून न्यावे व शाळेत भरपूर पाणी प्यावे. प्रार्थनेच्या वेळी किमान पंधरा मिनिटे मुलांकडून प्राणायाम करून घ्यावा, म्हणजे मुलांची श्‍वसनक्षमता वाढायला मदत होईल. वर्गांमधून, कार्यालयातील दालनांतून, घरात, थिएटरमध्ये, धूप जाळून धूर पसरेल असे करावे; त्यामुळे हवेतील संसर्ग किमान कमी व्हायला मदत होईल. गोमूत्र प्राशन करावे. गोमूत्र क्षाराच्या गोळ्यांचा किंवा गोमूत्र अर्काचा वापरही करता येईल. हे घरोघरी करण्याजोगे उपाय आहेत.
पाणी पिताना त्यात सितोपलादी चूर्ण टाकावे, त्यामुळे शुद्धता वाढेल. चहा किंवा तत्सम पेय घेताना तुळशीची पाने, गवती चहा, वावडिंग, सुंठ पावडर टाकून त्याचा काढा करावा. दूधही अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून प्यावे,'' असे डॉ. तांबे यांनी सुचवले आहे.
विमानतळांवरील तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करावी. कमी वेळात व नेमकेपणाने तपासणी होईल, अशी यंत्रणा सर्व विमानतळांवर कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

_समीर_'s picture

11 Aug 2009 - 8:08 am | _समीर_

जुनी /नवी, हिंदी/मराठी अशी कोणकोणती गाणी स्वाईन फ्लू वरती गुणकारी ठरू शकतात ते तांबेंनी कुठे दिले आहे का?

गोमूत्र प्राशन करावे. गोमूत्र क्षाराच्या गोळ्यांचा किंवा गोमूत्र अर्काचा वापरही करता येईल. हे घरोघरी करण्याजोगे उपाय आहेत.

शिवांबू घेतली तर चालेल का?

विकास's picture

11 Aug 2009 - 8:14 am | विकास

जुनी /नवी, हिंदी/मराठी अशी कोणकोणती गाणी स्वाईन फ्लू वरती गुणकारी ठरू शकतात ते तांबेंनी कुठे दिले आहे का?

मस्त!

गोमूत्र प्राशन करावे. गोमूत्र क्षाराच्या गोळ्यांचा किंवा गोमूत्र अर्काचा वापरही करता येईल. हे घरोघरी करण्याजोगे उपाय आहेत.

शिवांबू घेतली तर चालेल का?

त्या भागाकडे दुर्लक्ष केले तर भरपूर पाणी पिणे आणि प्राणायम नक्कीच (कधिही) चांगले आहे असे वाटते...

शैलेन्द्र's picture

11 Aug 2009 - 8:29 am | शैलेन्द्र

प्राणायाम चांगला पण शाळेत करु नये, खोल श्वास घेताना, इतरांचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त.

एक घरगुती आयुर्वेदिक उपाय, नाकात थोडे तुप किंवा खोबरेल तेल टाकायचे, आणि थोड्या थोड्या वेळाने शिंकरुन टाकायचे... हवेतिल धुलिकण- माय्क्रोब्स ५०-६०% ट्रॅप होतात.

केवळ माहीतीम्हणून देत आहे, endorsement म्हणून नाही :-)

गोमुत्र अर्क व पंचगव्यघृताचा स्वाईन फ्लूवर उपाय -डॉ. चक्रवर्ती
नागपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी
पुण्यासह भारतातील इतर शहरात मोठय़ा प्रमाणात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले असून यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोमुत्र अर्क व पंचगव्यघृताचा उपयोग केल्यास मनुष्याची प्रतिकारक्षमता वाढू शकेल, असे मत नीरीचे संचालक व शास्त्रज्ञ डॉ. तपन चक्रवर्ती यांनी पत्रकारांशी बोलताना

व्यक्त केले.
गो विज्ञान अनुसंधान केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तपन चक्रवर्ती म्हणाले, नीरीच्या प्रयोगशाळेत पंचगव्यघृत हे शरीराची प्रतिकारक्षमता वाढवून व्याधींपासून मुक्ती मिळवून देणारे असल्याचे सिद्ध झाले आहे. पंचगव्यघृताचा वापर करून रुग्णाचा आजार बरा होऊ शकतो. गेल्या महिन्यातच नीरीने केलेल्या गोमुत्र अर्काच्या संशोधनाला चीनचे पेटेंट मिळाले आहे. या पेटेंटला जगभरातील १४० देशांची मान्यता आहे.
गोमुत्र अर्क अ‍ॅन्टीमायक्रोबायल अँटीफंगल असून त्याला यापूर्वीच अमेरिकेच्या पेटंटची मान्यता होती. आता त्यात अँटीऑक्सीडंट प्रश्नॅपर्टीचादेखील समावेश करण्यात आला असून त्यास चीनच्या पेटंटद्वारे मान्यता मिळाल्याची माहिती डॉ. चक्रवर्ती यांनी दिली.
यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता मीरा औरंगाबादकर यांनी सांगितले, स्वाईन फ्ल्यू ही विषमज्वराशी संबंधित व्याधी आहे. संधीपात ज्वर किंवा संक्रमक विकाराचा हा एक प्रकार असू शकतो. याला जनपदोध्वंसक व्याधी म्हणता येईल. या सर्व व्याधींची लक्षणे एकमेकांशी मिळतीजुळती आहेत. शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली की या व्याधी होण्याची शक्यता जास्त असते. विशेषत कफ, सर्दी, वात, आंगपाय दुखणे ही त्याची लक्षणे आहेत. त्यावर उपाय म्हणून पंचगव्यापासून तयार करण्यात आलेल्या गोमुत्र अर्क किंवा पंचगव्यघृताचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली.
गोमुत्र गंधाचा उपयोग केल्यास घरातील वातावरण शुद्ध होते. पंचघृताचे दोन थेंब दोन्ही नाकपुडीत दिवसातून तीन वेळा घालणे, पंचघृत गाईच्या दुधात मिसळून त्याचे सेवन करणे, त्रिफळाचा, आल्याचा काढा करुन गुळण्या करणे, आलं आणि गुळाचे एकत्र सेवन करण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते, असेही डॉ. औरंगाबादकर यांनी सांगितले. आयुर्वेदाने वेगवेगळ्या औषधी वेगवेगळ्या अवस्थांसाठी सांगितल्या आहेत. नुसते गायीचे तूपसुध्दा आपली प्रतिकारक्षमता वाढवण्यास उपयुक्त आहे, असे डॉ. औरंगाबादकर म्हणाल्या.
यावेळी गोविज्ञान केंद्राचे प्रभारी सुनील मानसिंहका यांनी पंचगव्याच्या संशोधानात्मक कार्याची आणि स्वाईन फ्ल्यूवर पंचगव्याचा प्रभाव यासंबंधीची माहिती दिली. घसा खवखवणे, श्वासकष्टता, थकवा येणे, अंग दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजणे, नाकातून पाणी येणे, पातळ संडास, उलटय़ा अशी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
पंचगव्यासंबंधी अधिक माहितीसाठी गो विज्ञान अनुसंधान केंद्र, महाल, नागपूर किंवा २७७२२७३ व २७३४१८२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. पत्रकार परिषदेला सुरेश डवले, डॉ. कृष्णमुर्ती गिरी, वैद्या अनुराधा गोसावी, वैद्य रवींद्र कोमेजवार व वैद्य प्रगती चोरघडे उपस्थित होत्या.

शैलेन्द्र's picture

11 Aug 2009 - 2:24 pm | शैलेन्द्र

कुठल्याही मुत्रामधे, अ‍ॅन्टिबॅक्टेरिअल व अ‍ॅन्टिफंगल गुण असतात.. गाय, म्हैस डुक्कर, माणुस सर्वांच्या...

These are primary/secondary immune system barriers. not only urine, but even body fluids like eye drops have these properties. They protect body channels from fungal/bacterial growths.

म्हणुन मुत्रच वापरायचे असेल तर गायीकडे कशाला जा?

विंजिनेर's picture

11 Aug 2009 - 9:10 am | विंजिनेर

त्यात आयुर्वेदाबद्दल नेहमी म्हणले जाते त्याप्रमाणे उपाय झाला नाही तरी अपाय नक्की होणार नाही असे वाटते म्हणून शक्यतितका तो सर्वांनी पाळावा असे म्हणावेसे वाटत आहे.

आयुर्वेदाबद्दल मला आदर आहे. किंबहुना रोगनिवारण/आरोग्य वर्धन करण्यासाठी ज्या ज्या औषध पद्धती आहेत त्यांच्याशी माझे काहिही वाकडे नाही.

तरी सुद्धा एखाद दुसरा उपायाचा अपवाद वगळता (जसे सार्वजनिक/वैयक्तिक स्वच्छता) वरील माहितीत दिलेले उपाय वराहज्वरावर कसे उपयुक्त ठरतील याचा काहिच ठोस पुरावा/हवाला श्री. तांब्यांनी द्यायची तसदी घेतलेली दिसत नाही.(किमान मला तरी तो लेख वाचून सहज समजले नाहीत).
शास्त्रीय समुहात एक म्हण प्रचलित आहे - जितका मोठा शोधा(चा दावा) तितकेच भक्कम प्रमाण/पुरावा... (An extra ordinary concept needs an equally extra ordinary proof) आणि हे प्रमाण देण्याची जबाबदारी शोध कर्त्यावर असते (burden of proof is on the proponents )

अर्थात वराह ज्वरावर त्वरेने (खात्रीशीर/ आधीच सिद्ध झालेले)उपाय करण्या ऐवजी आपण तांब्यांच्या विधानांना प्रमाण शोधत बसणे अंमळ वेडगळ पणाचे ठरेल.

असो. हा लेख म्हणजे श्री. तांब्यांनी आयुर्वेदावर असलेल्या लोकांच्या गाढ विश्वासाचा (स्व प्रसिद्धी साठी)गैर फायदा घेतला आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

अर्थात असे सल्ले कितपत मानायचे हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा झाला...

Nile's picture

11 Aug 2009 - 9:18 am | Nile

जर तुम्ही त्यांचे लेख नियमित वाचलेत तर तुमचे वरील मत दृढ होइल. जास्त बोलत नाहि. :)

विकास's picture

11 Aug 2009 - 9:35 am | विकास

तुमच्या तांब्यांच्या संदर्भातील मुद्यांशी पुर्ण सहमत आहे.

बाकी तांब्यांनी सांगितलेले उपाय हे केवळ वराहज्वरासाठी म्हणून मी पाहीले नाहीत तर व्हायरस इन्फेक्शन होऊ नये म्हणून जे असतात त्याच्या संदर्भात बघितले. (preventative actions).

पाणी पिणे हे कुठल्याही व्हायरस इन्फेक्शनसंदर्भात बर्‍याचदा इथले डॉक्टर्सही सांगतात. (माझे डॉक्टर भारतीय नसूनही ते देखील तेच सांगतात). त्याच्या मुळे आपली सिस्टीम सतत साफ होत रहाते आणि व्हायरस सहजतेने शरीराबाहेर जाऊ शकतो.

थोडक्यात हे वर म्हणल्याप्रमाणे preventative actions मधे बसते असेच मी समजतो. त्यात तांब्यांनी कुठला शोध लावला असे म्हणत नाही की आयुर्वेद म्हणजे ग्रेट असे समजत नाही की ज्याच्या पोतडीत सगळ्याला औषधे आहेत. पण औषधे घेयची वेळ येऊ नये म्हणून काय करता येईल हे पहाण्यासाठी उपयोग नक्कीच आहे. स्वाईन फ्लूच्या बाबतीत श्वासोच्छवासाला त्रास होऊ शकतो असे सिडीसीच्या एका पानावर पण वाचले. अर्थात प्राणायमाने तसे होण्यापासून टाळता येऊ शकते...
परत सिडीसीच्या preventative actions पानावर पहा. स्वच्छतेचे, संसर्गापासून दूर रहाण्याचे नियम सांगून झाले की शेवटी असेच म्हणले आहे:

Get plenty of sleep, be physically active, manage your stress, drink plenty of fluids, and eat nutritious food.

विंजिनेर's picture

11 Aug 2009 - 9:50 am | विंजिनेर

उपाय हे केवळ वराहज्वरासाठी म्हणून मी पाहीले नाहीत तर व्हायरस इन्फेक्शन होऊ नये म्हणून जे असतात त्याच्या संदर्भात बघितले.

हा अर्थातच महत्वाचा मुद्दा आहे.
लेखकालासुद्धा हाच अर्थ अभिप्रेत असेल तर तसे तांब्यांनी लेखात तसे अधिक जोरकसपणे मांडायला हवे होते.

विसोबा खेचर's picture

11 Aug 2009 - 9:54 am | विसोबा खेचर

डॉ बालाजी तांबे?

हा हा हा! चालू द्या..... :)

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

शाहरुख's picture

11 Aug 2009 - 8:20 am | शाहरुख

हे जे ७ मृत्यू झाले आहेत त्यांची सरकार दफ्तरी 'स्वाईन फ्लू ने मृत्यू' अशी नोंद झालीय का ? त्यांना काही ना काही इतर आजार होते आधी..

आणि माध्यमं "सरकारचा निष्काळजीपणा" वगैरे जी बोंब ठोकत आहेत ती कितपत खरी आहे ?? सरकारला (म्हणजे कोणत्याही संस्थेला) विषाणूंचे संक्रमण होऊ न देणे कितपत शक्य आहे ?

विकास's picture

11 Aug 2009 - 8:26 am | विकास

त्यांना काही ना काही इतर आजार होते आधी..

यातील प्रत्येकाला काही ना काही आजार होते?

आणि असले तरी देखील जर स्वाईन फ्लू झाला नसता तर त्यांचे जीवन धोक्यात होते का? नसल्यास त्यांच्या मृत्यूस स्वाईन फ्लू हेच धरावे लागेल.

सरकारला (म्हणजे कोणत्याही संस्थेला) विषाणूंचे संक्रमण होऊ न देणे कितपत शक्य आहे ?

सुरवातीला कदाचीत जमणार नाही. पण नंतर अर्थातच तात्काळ पाऊले पडली पाहीजेत. तसे होताना दिसत नाही...

(खालच्या दुव्यावर बातमी पहायला जरा स्क्रोल करून खाली जावे लागेल).

स्वाइन फ्लू’ प्रतिबंधास आता कार्यकर्ता प्रशिक्षण
पुणे, ९ ऑगस्ट / खास प्रतिनिधी, लोकसत्ता, मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

‘स्वाइन फ्लू’ च्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण रक्तपेढीने ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ च्या सहकार्याने कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. त्यामधून प्रशिक्षित झालेले ७५ कार्यकर्ते वैद्यकीय मदतनीस म्हणून १५ उपचार केंद्रांवर कार्यरत राहणार आहेत. ‘आयएमए’ चे डॉ. शरद आगरखेडकर व माया तुळपुळे यांनी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले. २२ स्वयंसेवी संस्थांमधील ७५ कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले. पालिकेच्या उपचार केंद्रांबरोबरच गृहसंकुले, कार्यालये आदी ठिकाणी जनजागृती करण्यासाठी हे कार्यकर्ते उद्यापासून मोहीम हाती घेणार आहेत. पुढील रविवारीसुद्धा प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार असून त्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा - डॉ. अतुल कुलकर्णी - ९२२६८२४३३६, सचिन कुलकर्णी - ९७६३७०४८१८ आणि बाळासाहेब फाटक - ९८२२६१००२४.

मि माझी's picture

11 Aug 2009 - 10:17 am | मि माझी

मी पुण्यात राहते. प्रचंड टेन्शनच वातावरण आहे इथे. ऑफिस मधे पण तेच विषय चालू असतात.. लहान मुलांची अजुन जास्त काळजी वाटते.शाळांना सुट्टी दिली तरी रस्त्यावरची गर्दी कमी नाहीये. सगळ्यांनी काळजी घ्या.

वेदश्री's picture

11 Aug 2009 - 10:49 am | वेदश्री

पावसाने पाठ दाखवल्याने पीके वाळून चालली आहेत. पिण्याच्या पाण्याची चिंता तर आहेच. किराणा माल आणि भाज्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना परत सुरूवात झाली आहे. मंदीचा भर तर ऐन तारुण्यात आहे. त्यामुळेच नकली नोटांचीही चलती वाढल्याचे वर्तमानपत्रात येते आहे. नेहमीच्या रोगांचे रोगी तर नेहमीपेक्षा अधिक आढळत आहेतच पण आता स्वाईन फ्लू सारख्या नव्या आक्रमक रोगांची त्यात भर पडत आहे. प्रश्न यायचेच असले की अशी सर्व बाजूंनी कोंडी करायलाच आल्यासारखे येतात याची परत एकदा प्रचिती येतेय असेच म्हणावे लागेल.

यातून मार्ग काय?

वेदश्री's picture

11 Aug 2009 - 11:05 am | वेदश्री

ताप आलेला असल्यास स्वाईन फ्लू आहे का ते तपासण्याकरता जी चाचणी करतात ती बरीच महागडी (५-६ हजार खर्च) आहेसे ऐकलेय. ज्यांना हा खर्च करणे शक्य आहे त्यांचे त्यातल्या त्यात तरी ठीक आहे पण ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचे? त्यांच्या स्वास्थ्य सुरक्षेचे काय? ते लोक ह्या मोठमोठ्या दवाखान्यात नसणार जात मग जरी सद्ध्याच्या स्वाईन फ्लू मुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा हा ७ सांगत असले तरी प्रत्यक्ष आकडा यापेक्षा जास्त असू शकेल का? अशातून होणारा या रोगाचा प्रसार.. त्याचे काय? स्वाईन फ्लू झालाय असे निष्पन्न झाल्यास उपचारासाठी आणि संबंधितांच्या क्वारंटाईनसाठी साधारण किती खर्च येतो?

शाळा, कॉलेज, मॉल वगैरे बंद ठेवले तरी कार्यालये बंद ठेवण्याच्या निर्णय घेतलेला दिसत नाही. तिथेसुद्धा तर लोक मोठ्या संख्येने जमा होतात. मग ते वगळण्याचे कारण?

हा विषाणू शरीरात घुसल्यावरही त्याने त्याचे काम सुरू करायला जवळपास १ ते ८ दिवस घेतो. त्यानंतर या फ्लूची लक्षणे दिसणार आणि मग उपचार... या रोगावरची लस उपलब्ध होईतो प्रतिबंधात्मक असे कुठले औषध घेऊ शकतो का... अर्थातच ज्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही?

शैलेन्द्र's picture

11 Aug 2009 - 5:53 pm | शैलेन्द्र

स्वाइन फ्लुची खात्रिलायक चाचनी फक्त रीअल टाइम पी सी आर या तंत्राने करता येते. खर्च साधारण ५-६ हजार. आणि सि डी सी ने मान्यता दिलेले प्रायमर प्रोब फक्त सरकारी संस्थेत आहेत, तिथे सगळ फुकट.. तर पैशाची काळ्जी करु नका.

ज्ञानेश...'s picture

11 Aug 2009 - 12:12 pm | ज्ञानेश...

तात्यांच्या प्रश्नांची उत्तरे-

हा रोग असाध्य आहे का?
नाही. हा रोग साध्य आहे.

टॅम्लिन फ्लू की कायसं, एवढं एकच औषध उपयोगी आहे का?
सध्या तरी- हो. 'रेलेन्झा' हे एक दुसरे औषध आहे, पण सध्या तरी ते सहज उपलब्ध नाही.

फक्त हवेतूनच पसरतो की अन्न्-पाण्यातूनही?
हा आजार हवेतून पसरतो. अन्नातून नाही.

लक्षणं काय आहेत?
सामान्य फ्ल्यु प्रमाणेच. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे, श्वसनास त्रास होणे वगैरे. फरक इतकाच की इतर वेळा ही लक्षणे आपोआप किंवा साध्या औषधोपचाराने तीन चार दिवसात आटोक्यात येतात, स्वाईन फ्ल्यु मधे असे होत नाही.

@गोगोल- (जनरल माहिती काय देता?)
ही 'जनरल' माहितीच फार जास्त महत्त्वाची आहे. सामान्य माणूस एवढेच करू शकतो. (आणि एवढे सुद्धा करत नाही.) व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी रामबाण उपाय कुणीही सुचवू शकत नाही.

ही माहिती मिळाल्यानंतर तरी आपण रोजच्यापेक्षा व्यवस्थित हात धुण्याचे प्रमाण किती वाढवले हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारावा.

@प्रा.डॉ.-
'संशयित' म्हणजे डॉक्टरांना जे संशयित वाटतात असे रुग्ण. रुग्णाला स्वतःच संशय वाटतो की आपल्याला स्वाईन फ्ल्यु आहे म्हणून त्याने टॅमिफ्ल्यु घेणे योग्य नाही. (त्याला मिळणारही नाही.)

@वेदश्री-
पॅनिक होवू नका.
डायग्नोस झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना 'संशयित' समजले जाते. त्यांना 'टॅमिफ्ल्यू' देणे योग्यच आहे. इथे साईड ईफेक्ट्स पेक्षा इफेक्ट महत्वाचा आहे. टॅमिफ्ल्यु चा साईडईफेक्ट म्हणजे थोडीफार अ‍ॅसिडीटी, मळमळ होते. बाकी काही नाही.
तपासणीच्या खर्चाबद्दल- या तपासणीचा खर्च भरपूर असला, तरी हा खर्च सरकार करते. रुग्णाकडून आकारला जात नाही.
आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. प्रत्येक आजारी माणसाला ही तपासणी करणे गरजेचे वाटू शकते. पण आपली शंका काढण्यासाठी आधीच मर्यादित असलेल्या रिसोर्सेसवर ताण वाढवणे योग्य नाही. त्यामुळे तपासणीचा निर्णय डॉक्टरावर सोडणे उत्तम!

बाकी नितिन थत्तेंना धनंजयनी उत्तरे दिलीच आहेत. इतरांचेही प्रतिसाद छान आहेत. बालाजी तांबे यांच्याबद्दल सगळ्यांशीच सहमत आहे. ;)

काळजी घ्या. काळजी करू नका. एवढेच सांगतो.

डॉक्टर ज्ञानेश पाटील.

"Great Power Comes With Great Responssibilities"

सुनील's picture

11 Aug 2009 - 12:32 pm | सुनील

उत्तरांबद्दल धन्यवाद!

नाही. हा रोग साध्य आहे.
तुम्हाला रोग नसून रोगनिवारण साध्य आहे असे म्हणायचे आहे, असे धरून चालतो! ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Aug 2009 - 12:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सविस्तर प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद डॉक्टरसाहेब.

अदिती

शैलेन्द्र's picture

11 Aug 2009 - 5:44 pm | शैलेन्द्र

डॉक्टर,

टॅमी फ्लुचे साइड इफ्फेक्ट हे काळजीचे कारण नाही तर ability of H1N1 strain to mutate is a concern. These all strains are derivatives of general influenza. H1N1 is swine flue, H5N1 and H7N1 are avian influenza. problem is this virus is able to respond environment by changing its genome very fast. Even this epidemic will disappear without doing anything if virus changes its genome to get mild or vice a versa can also happen. If you expose this virus to wide attack of tommy flue, it will develop resistance for it. Best solution is to have immunization against it. It is in process.

ज्ञानेश...'s picture

11 Aug 2009 - 10:22 pm | ज्ञानेश...

माझे ते विधान वेदश्री यांना उद्देशून होते,आणि त्यांच्या प्रतिसादाचा रोख साईडैफेक्टविषयी वाटला म्हणून सांगीतले.

रेझिस्टन्स डेव्हलप होईल इतके सर्रास गोळ्यांचे वाटप सरकार करत नाही. रादर्, तसे ठरवले तरी करू शकत नाही. सरकार फक्त 'संशयितांना' त्या गोळ्या देणार आहे, आणि संशयित कोणाला म्हणावे याबद्दल शासनाचे निकष पुरेसे स्पष्ट आहेत. कुठल्याही एपिडेमिक विरुद्ध लढतांना प्रोफायलॅक्सिस पार्ट महत्वाचा असतो. शासनाचाही तोच उद्देश आहे. त्यामुळे वेदश्री यांना वाटणारी भीती निराधार आहे.

(अवांतर- tommy flue वाचून गंमत वाटली. :)) )

असो.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

"Great Power Comes With Great Responsibilities"

शैलेन्द्र's picture

12 Aug 2009 - 9:24 am | शैलेन्द्र

धन्यवाद...

अतिअवांतर...
आणि त्या औषधाचा खरचं टॉमी झालाय हो, सगळे त्याला "यु यु" करतायेत.

पक्या's picture

11 Aug 2009 - 12:35 pm | पक्या

आत्ताच वाचले ..पुण्यात स्वाईन फ्लूचा ५ वा बळी. ..एक १३ वर्षाची नारायण पेठेतील मुलगी आहे.

पालकांनी मुलांची अधिक काळजी घ्यावी. कारण मुलांना लागण व्हायची जास्त शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे.

बाकरवडी's picture

11 Aug 2009 - 12:43 pm | बाकरवडी

अजुनही ९ जण ससून मध्ये चिंताजनक अवस्थेत आहेत.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

11 Aug 2009 - 3:16 pm | भाग्यश्री कुलकर्णी

आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहतो.टिव्ही,स्थानीक पेपरच्या माध्यमातुन त्याविषयी माहिती मिळतेय.आजूबाजूलाही भिती आहेच्.पण या सर्वात मिडीया जास्त भिती वाढ्वत तर नाहीना?महाराष्ट्रातल्या कुठ्ल्याही शहरात येतानाही काळजी घ्यावी का?

यशोदेचा घनश्याम's picture

11 Aug 2009 - 3:39 pm | यशोदेचा घनश्याम

PLEASE GO THROUGH THIS

My dear President,

I agree with you that swine flu awareness is needed, but there is no need to be panicky and join the publicity propaganda carried out by media and others which acts as a vehicle to spread misconception than to spread scientific information.

These are few facts about swine flu when discussed with the leading epidemiologists.

1) Swine flu, that is H1N1 flu is not new, first detected in 1987
2) Infective stage of flu is 5 days, 1 day before and 4 days after onset of symptoms
3) The best way to prevent it spreading is asking patients having symptoms of flu like fever, cough and running nose to take rest at home for 4 days so he does not transmit it
4) Masks are of limited value if any, in this disease, it can spread through droplets on your skin, through contact etc, and I have seen that the masks in Pune are worn as fashion statement, while walking on road today morning I saw people wearing masks coming out for a morning walk with their dogs!, many wearing masks around their necks, and so on, in fact these masks shall act as the vehicles to carry the virus, instead, avoiding crowded places or cinema halls or malls where air conditioners are on, is advisable, because you get recalculated air, where the virus density multiplies
5)Death after H1N1 flu is not common, in fact infections like measles is taking toll of thousands more every year, and we are oblivious of the facts. Swine flu is being blown out of proportion by media trying to create hysteria among lay people.
6) Fever accompanied by respiratory distress, should be immediately notified which is likely to be a complication of H1N1 flu
7)The mortality is less than .01 percent of those affected, that means may be one in 10,000 affected is likely to suffer the life loss.
8) If you remember, 2 years ago SARS was blown out of proportion, what happened? Humans develop immunity to the virus, the same is going to happen, we develop immunity in due course of time, the virus is in the air, you can not stop it, our body is already developing the immunity so nothing to panic.
We need to take care of children and elderly who have less immunity and do not let them go to crowded places that are all.

WE MUST START THIS CAMPAIGN OF NOT TO BE AFRAID OF THIS FLU AND LET YOUR DAILY WORK CONTINUE AS NORMAL, NO MASKS FOR ORDINARY CITIZENS . HEALTH CARE WORKERS OR SPECIFIC EXPOSED TO LOT OF CROWDED ENVIRONMENTS MAY BE BENEFITTED, NOT PROVEN.

I am amazed to hear that people are selling masks of RS 20 each which are available to less than Rupee 1 in the market.
See who is getting benefitted?

Please spread the scientific info, do not join the band wagon and stick to science, that should be the order of the day.

Deepak Purohit
District governor
3131
यशोदेचा घनश्याम

प्रदीप's picture

12 Aug 2009 - 10:46 am | प्रदीप

8) If you remember, 2 years ago SARS was blown out of proportion, what happened?

ही ई- मेल नक्की कुणी कुणाला लिहीली आहे, हे ह्यावरून समजले नाही. तरीही वरील विधान चुकिचे आहे. सार्स was not blown out of proportion. It was damn pretty serious.

सार्सने होरपळलेल्या एका देशात मी रहातो, तेव्हा हे मी स्वानुभवावरून सांगतोय.

झकासराव's picture

11 Aug 2009 - 4:01 pm | झकासराव

न्युज चॅनेल्स पाहिलेत तर टेन्शन येत एवढा हाइप आहे हे खरच आहे.
त्या मानाने प्रिन्ट मेडीआ बराच बरा आहे.
पण अजुनही नीट डिटेलमध्ये काळजी काय घ्यावी हे कोणीच सांगत नाहि अस दिसतय.
असो.
सध्या पुणे आणि पिंची मध्ये तरी स्वाइन फ्ल्यु साठीची आवश्यक तपासणी (ज्याची किंमत ही माझ्या ऐकीव माहितीनुसार ५०००-१०००० आहे) फक्त एकाच सन्स्थेत होते. त्याचा खर्च शासन करत. पण अर्थातच सरसकट सगळ्यांसाठीच ही तपासणी नाही आणि तस करण शक्य देखील नाही.
तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यात जावुन तुम्ही तुम्हाला झालेला त्रास सांगा. मग काय लक्षण आहेत हे पाहुन ते लोक तुमच नाव स्वाइन फ्ल्यु च्या संशयीत मध्ये नोंद करुन तुम्हाला पुढच्या तपासणीसाठी पाठवतील. सध्या वातावरण अस आहे की लोक घाबरुन सरकारी दवाखान्यात गर्दी करत आहेत. त्यामुळे खरच एखादा स्वाइन फ्लु झालेला रुग्ण असेल त्याच्यामुळे बर्‍याच जणाना संसर्ग होउ शकतो. शिवाय अशा व्यक्तीचा नंबर तपासणी आणि उपचार ह्यासाठी उशीरा लागुन त्या व्यक्तीच्या जीवावर बेतु शकत.
टॅमी फ्ल्युच्या गोळ्या सरसकट सगळ्याना देत नसावेत. ज्यांची लक्षण आहेत त्यानाच देत असावेत. ह्या विस्।अयी खात्रीशीर माहिती नाहि.
काल न्युज चॅनेल वर सांगितल्याप्रमाणे स्वाइन फ्ल्यु साठीची तपासणी काहि मोठ्या दवाखान्यात करण्यासाठी व्यवस्था केली जाइल. (बहुतेक नमुने घेवुन राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यची व्यवस्था असावी) त्या तपासणीचा खर्च शासन करणार आहे पण त्या दवाखान्यातील डॉक्टरांची फी आणि जर तिथेच अ‍ॅड्मिट व्हाव लागल तर त्याचा खर्च स्वत: करायचा आहे. ह्यामुळे थोडा तरी सरकारी दवाखान्यातील ताण कमी होइल अस चिन्ह आहे.
(कालचे आकुर्डी येथील सरकारी दवाखान्यातील ऐक्वीव आकडे.
स्क्रीनींग साठी आलेले लोक ८००
त्यातील खरच ज्यांची लक्षण स्वाइन फ्लुसारखीच आहेत असे लोक २५)

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

भडकमकर मास्तर's picture

11 Aug 2009 - 4:28 pm | भडकमकर मास्तर

१.या लोकांनी पुण्यात शाळा बंद करयला इतका उशीर का केला कोण जाणे?.. सगळे एकामेकावर ढकलत आहेत जबाबदारी...
सरकार म्हणते, जिल्ह्याने ठरवावे, ..कोणी म्हणते शाळेने ठरवावे यात सगळा टाईमपास केला गेला असे माझे मत आहे...
२. आणि अजूनही दहीहंडी मंडळांना विनंती केली जात आहे की सध्यातरी उत्सव मोठा करू नये.
( पुण्यात एपिडेमिक अ‍ॅक्ट लगू हो ऊन ८ दिवस झाले आहेत असे ऐकतो.. तरीही )
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

मला स्वतःला साधारण महिन्याभरापूर्वी स्वाईन फ्लू झाला होता (माझे वास्तव्य उत्तर कॅलिफोर्निया मधे). लक्षणे सुरू होण्याच्या दोन दिवस आधी एका रुग्णाशी माझा संपर्क आला होता. हा रुग्ण, ज्याला आपल्याला स्वाईन फ्लू झाला आहे याची कल्पना नव्हती, केवळ काही मिनीटांच्या प्रवासासाठी माझ्या कारच्या मागच्या सीटवर बसला होता. कदाचित कारचे बंद वातावरण असेल, किंवा त्याचा स्पर्श झालेल्या कारच्या भागाला नंतर माझा स्पर्श झाला असेल (हा व्हायरस वस्तूंच्या पृष्ठभागांवर सहा ते सात तासांपर्यंत तगू शकतो) आणि मी नंतर हात धुतले नसतील, पण मला लगेच संसर्ग झाला. साधारण ३६ तासांनंतर लक्षणांना सुरवात झाली. साधारण नेहेमीच्याच फ्लूप्रमाणे लक्षणे होती. पण ताप, आणि स्नायूंचे गळलेपण जरा जास्त तीव्र होते. त्यामानाने कफ बराच कमी होता. साधारण आठवड्याभरात प्रकृती पूर्ववत ठीक झाली. सीडीसीच्या (अमेरिकेचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल - केंद्रिय रोगनिवारण संचलनालय) सूचनांनुसार लक्षणे सुरू झाल्यापासून एक आठवडा घरीच बसून काढला. क्वचित बाहेर पडावे लागलेच तर नाक आणि तोंड झाकणारा सर्जिकल मास्क घातला. नेहेमीच्या फ्लूप्रमाणे आजारी असतांना भरपूर पाणी, व्हिटॅमिन सी देणारी संत्री वगैरे फळे खाल्ली, व विश्रांती घेतली. लक्षणे सुरू झाल्यानंतर जेव्हा ताप नेहेमीच्या फ्लूप्रमाणे एक-दोन दिवसात कमी झाला नाही, आणि फ्लूचा सीझन नसतांनाही असा आजार व्हावा यांमुळे हा स्वाईन फ्लू असावा अशी शंकेची पाल मनात चुकचुकलीच होती. इतक्यात ज्या रूग्णामुळे मला संसर्ग झाला त्याने त्याचे स्वाईन फ्लूचे निदान झाल्याचे कळवले आणि मी जवळच्या हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूमकडे धाव घेतली. डॉक्टर म्ह्णाले की एच-वन-एन-वन व्हायरसच्या ज्या स्ट्रेन (प्रजाती) मुळे स्वाईन फ्लूची ही साथ सुरू आहे ती स्ट्रेन नेहेमीच्या सीझनल फ्लूपेक्षा बरीच माइल्ड आहे, त्यामुळे फारसे घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यांनी टॅमिफ्लूच्या गोळ्या प्रिस्क्राइब करण्याची तयारी दाखवली, पण लक्षणे सुरू झाल्यापासून एका दिवसाच्या आत टॅमिफ्लू घेतलीतरच फायदा होतो, नाहीतर टॅमिफ्लूचा फारसा उपयोग नाही असे त्यांचे मत पडले. मीही मग हा आजार तसा अंगावरच काढण्याचे ठरवले. फक्त लक्षणे कमी करणार्‍या काही गोळ्या (उदा टायलेनॉल-पॅरॅसिटामॉल) घेतल्या. आणि वर सांगितल्या प्रमाणे एका आठवड्यात सारे काही ठिक झाले.

एकूण तुम्ही सर्वसाधारपणे निरोगी प्रौढ असाल तर हा फ्लू झालातर फारसे घाबरून जाण्याचे कारण नाही. अर्थात नेहेमीच्या फ्लूप्रमाणे बालके, वृद्ध, ज्यांची अंगभूत प्रतिकारशक्ती कमी असते त्यांना धोका जास्त. ब्राँकायटिस, न्युमोनिया अशी कॉंप्लिकेशन्स होऊन मृत्यूही होऊ शकतो. पण हे सारे नेहेमीच्या हिवाळ्यातील सीझनल फ्लूमधेही होते.

प्रदीप's picture

12 Aug 2009 - 10:41 am | प्रदीप

तुमच्या चाचण्या होऊन तुम्हाला स्वाईन फ्य्लू झाला होता असे नक्की निदान झाले होते का?

नंदा's picture

13 Aug 2009 - 3:13 am | नंदा

होय.

कशिद's picture

11 Aug 2009 - 8:18 pm | कशिद

Use “Nilgiri oil”drops on handkerchiefs and masks as one of the preventive measures against swine flu….(N I V)

National institute of variology. Mumbai

Help line no.for swine flu 22029070,

Kasturba hospital. 02223083901

Plzzzz,

Send 2 all your friend.

Well wisher and people whom u care.

ह्याचा बदल कोणाला काही माहिती आहे का?

साध्य हा sms जोरात फिरतोय मुंबई मधे !!

National Institute of Virology सारखी राष्ट्रीय संशोधन संस्था असा अशास्त्रीय SMS पाठवणं अशक्य आहे. त्यांच्या या संस्थळावर जाऊन खात्री करा. त्यांना या प्रकाराची माहिती कळलेली आहे, म्हणून त्यांनी खालील मेसेज फिरता ठेवला आहे!
NIV has not recommended any indigenous formulations like Nilgiri oil, etc as use against novel H1N1 (Swine Flu). Please refer to authentic public health information or call the help lines for queries.

शैलेन्द्र's picture

12 Aug 2009 - 12:57 pm | शैलेन्द्र

साहेब, हे national institute of variology काय आहे? माझा पुण्यातिल National Institute of Virology बरोबर रोज संपर्क येतो. रोगनिदान व संशोधन हे त्यांचे काम आहे, औष्धोपचार नाही. त्यात असला भंपक्पणा ते कदापी करणार नाही.

बाकि निल्गिरी तेल टाकुन अंघोळ केली कि छान वाटते.. चालु द्या...

बहुगुणी's picture

12 Aug 2009 - 4:36 am | बहुगुणी

variology!!! आणि Mumbai?? गंमत वाटली ;)

NIV पुण्याला आहे.

प्रसन्न केसकर's picture

12 Aug 2009 - 1:24 pm | प्रसन्न केसकर

(WHO) कडील स्वाईन फ्लु साथी बाबतची सर्व माहीती http://www.who.int/csr/disease/swineflu/en/index.html येथे आहे.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

निखिलराव's picture

13 Aug 2009 - 12:02 pm | निखिलराव

पुण्यात PMT बंद केल्या.

शैलेन्द्र's picture

13 Aug 2009 - 12:19 pm | शैलेन्द्र

PMT मधे अति गर्दि असते हे म न पाने मान्य केलय...

आयुर्हित's picture

30 Mar 2015 - 11:20 am | आयुर्हित

साभार: फॅमिली डॉक्टर सकाळ

स्वाइन फ्लू (वराहज्वर)

कपडे धुतल्यानंतर ते शुभ्र दिसावेत म्हणून आपण जे क्लोरीनयुक्त विरंजक (Bleach) वापरतो त्याने फ्लू, टोंसील, दमा,श्वासाचे त्रास होण्यास/वाढण्यास मदत मिळते.

While bleach is effective in killing germs, the chemical may leave children more susceptible to catching flu, tonsillitis or other infections.

Exposure to bleach was associated with a 20 per cent increase in the risk of flu and a 35 per cent rise in the risk of recurrent tonsillitis.

The study, carried out by the Centre for Environment and Health in Belgium, looked at the potential impact among more than 9,000 schoolchildren between the ages of six and 12 in the Netherlands, Finland and Barcelona.

Bleach 'linked to 20% rise in childhood infections including flu and bronchitis'