पावसाने पाठ दाखवल्याने पीके वाळून चालली आहेत. पिण्याच्या पाण्याची चिंता तर आहेच. किराणा माल आणि भाज्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. शेतकर्यांच्या आत्महत्यांना परत सुरूवात झाली आहे. मंदीचा भर तर ऐन तारुण्यात आहे. त्यामुळेच नकली नोटांचीही चलती वाढल्याचे वर्तमानपत्रात येते आहे. नेहमीच्या रोगांचे रोगी तर नेहमीपेक्षा अधिक आढळत आहेतच पण आता स्वाईन फ्लू सारख्या नव्या आक्रमक रोगांची त्यात भर पडत आहे. प्रश्न यायचेच असले की अशी सर्व बाजूंनी कोंडी करायलाच आल्यासारखे येतात याची परत एकदा प्रचिती येतेय असेच म्हणावे लागेल.
यातून मार्ग काय?
ताप आलेला असल्यास स्वाईन फ्लू आहे का ते तपासण्याकरता जी चाचणी करतात ती बरीच महागडी (५-६ हजार खर्च) आहेसे ऐकलेय. ज्यांना हा खर्च करणे शक्य आहे त्यांचे त्यातल्या त्यात तरी ठीक आहे पण ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचे? त्यांच्या स्वास्थ्य सुरक्षेचे काय? ते लोक ह्या मोठमोठ्या दवाखान्यात नसणार जात मग जरी सद्ध्याच्या स्वाईन फ्लू मुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा हा ७ सांगत असले तरी प्रत्यक्ष आकडा यापेक्षा जास्त असू शकेल का? अशातून होणारा या रोगाचा प्रसार.. त्याचे काय? स्वाईन फ्लू झालाय असे निष्पन्न झाल्यास उपचारासाठी आणि संबंधितांच्या क्वारंटाईनसाठी साधारण किती खर्च येतो?
शाळा, कॉलेज, मॉल वगैरे बंद ठेवले तरी कार्यालये बंद ठेवण्याच्या निर्णय घेतलेला दिसत नाही. तिथेसुद्धा तर लोक मोठ्या संख्येने जमा होतात. मग ते वगळण्याचे कारण?
हा विषाणू शरीरात घुसल्यावरही त्याने त्याचे काम सुरू करायला जवळपास १ ते ८ दिवस घेतो. त्यानंतर या फ्लूची लक्षणे दिसणार आणि मग उपचार... या रोगावरची लस उपलब्ध होईतो प्रतिबंधात्मक असे कुठले औषध घेऊ शकतो का... अर्थातच ज्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही?
स्वाइन फ्लुची खात्रिलायक चाचनी फक्त रीअल टाइम पी सी आर या तंत्राने करता येते. खर्च साधारण ५-६ हजार. आणि सि डी सी ने मान्यता दिलेले प्रायमर प्रोब फक्त सरकारी संस्थेत आहेत, तिथे सगळ फुकट.. तर पैशाची काळ्जी करु नका.
तात्यांच्या प्रश्नांची उत्तरे-
हा रोग असाध्य आहे का?
नाही. हा रोग साध्य आहे.
टॅम्लिन फ्लू की कायसं, एवढं एकच औषध उपयोगी आहे का?
सध्या तरी- हो. 'रेलेन्झा' हे एक दुसरे औषध आहे, पण सध्या तरी ते सहज उपलब्ध नाही.
फक्त हवेतूनच पसरतो की अन्न्-पाण्यातूनही?
हा आजार हवेतून पसरतो. अन्नातून नाही.
लक्षणं काय आहेत?
सामान्य फ्ल्यु प्रमाणेच. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे, श्वसनास त्रास होणे वगैरे. फरक इतकाच की इतर वेळा ही लक्षणे आपोआप किंवा साध्या औषधोपचाराने तीन चार दिवसात आटोक्यात येतात, स्वाईन फ्ल्यु मधे असे होत नाही.
@गोगोल- (जनरल माहिती काय देता?)
ही 'जनरल' माहितीच फार जास्त महत्त्वाची आहे. सामान्य माणूस एवढेच करू शकतो. (आणि एवढे सुद्धा करत नाही.) व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी रामबाण उपाय कुणीही सुचवू शकत नाही.
ही माहिती मिळाल्यानंतर तरी आपण रोजच्यापेक्षा व्यवस्थित हात धुण्याचे प्रमाण किती वाढवले हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारावा.
@प्रा.डॉ.-
'संशयित' म्हणजे डॉक्टरांना जे संशयित वाटतात असे रुग्ण. रुग्णाला स्वतःच संशय वाटतो की आपल्याला स्वाईन फ्ल्यु आहे म्हणून त्याने टॅमिफ्ल्यु घेणे योग्य नाही. (त्याला मिळणारही नाही.)
@वेदश्री-
पॅनिक होवू नका.
डायग्नोस झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना 'संशयित' समजले जाते. त्यांना 'टॅमिफ्ल्यू' देणे योग्यच आहे. इथे साईड ईफेक्ट्स पेक्षा इफेक्ट महत्वाचा आहे. टॅमिफ्ल्यु चा साईडईफेक्ट म्हणजे थोडीफार अॅसिडीटी, मळमळ होते. बाकी काही नाही.
तपासणीच्या खर्चाबद्दल- या तपासणीचा खर्च भरपूर असला, तरी हा खर्च सरकार करते. रुग्णाकडून आकारला जात नाही.
आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. प्रत्येक आजारी माणसाला ही तपासणी करणे गरजेचे वाटू शकते. पण आपली शंका काढण्यासाठी आधीच मर्यादित असलेल्या रिसोर्सेसवर ताण वाढवणे योग्य नाही. त्यामुळे तपासणीचा निर्णय डॉक्टरावर सोडणे उत्तम!
बाकी नितिन थत्तेंना धनंजयनी उत्तरे दिलीच आहेत. इतरांचेही प्रतिसाद छान आहेत. बालाजी तांबे यांच्याबद्दल सगळ्यांशीच सहमत आहे. ;)
काळजी घ्या. काळजी करू नका. एवढेच सांगतो.
डॉक्टर ज्ञानेश पाटील.
"Great Power Comes With Great Responssibilities"
उत्तरांबद्दल धन्यवाद!
नाही. हा रोग साध्य आहे.
तुम्हाला रोग नसून रोगनिवारण साध्य आहे असे म्हणायचे आहे, असे धरून चालतो! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
डॉक्टर,
टॅमी फ्लुचे साइड इफ्फेक्ट हे काळजीचे कारण नाही तर ability of H1N1 strain to mutate is a concern. These all strains are derivatives of general influenza. H1N1 is swine flue, H5N1 and H7N1 are avian influenza. problem is this virus is able to respond environment by changing its genome very fast. Even this epidemic will disappear without doing anything if virus changes its genome to get mild or vice a versa can also happen. If you expose this virus to wide attack of tommy flue, it will develop resistance for it. Best solution is to have immunization against it. It is in process.
माझे ते विधान वेदश्री यांना उद्देशून होते,आणि त्यांच्या प्रतिसादाचा रोख साईडैफेक्टविषयी वाटला म्हणून सांगीतले.
रेझिस्टन्स डेव्हलप होईल इतके सर्रास गोळ्यांचे वाटप सरकार करत नाही. रादर्, तसे ठरवले तरी करू शकत नाही. सरकार फक्त 'संशयितांना' त्या गोळ्या देणार आहे, आणि संशयित कोणाला म्हणावे याबद्दल शासनाचे निकष पुरेसे स्पष्ट आहेत. कुठल्याही एपिडेमिक विरुद्ध लढतांना प्रोफायलॅक्सिस पार्ट महत्वाचा असतो. शासनाचाही तोच उद्देश आहे. त्यामुळे वेदश्री यांना वाटणारी भीती निराधार आहे.
(अवांतर- tommy flue वाचून गंमत वाटली. :)) )
असो.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
"Great Power Comes With Great Responsibilities"
आत्ताच वाचले ..पुण्यात स्वाईन फ्लूचा ५ वा बळी. ..एक १३ वर्षाची नारायण पेठेतील मुलगी आहे.
पालकांनी मुलांची अधिक काळजी घ्यावी. कारण मुलांना लागण व्हायची जास्त शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे.
आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहतो.टिव्ही,स्थानीक पेपरच्या माध्यमातुन त्याविषयी माहिती मिळतेय.आजूबाजूलाही भिती आहेच्.पण या सर्वात मिडीया जास्त भिती वाढ्वत तर नाहीना?महाराष्ट्रातल्या कुठ्ल्याही शहरात येतानाही काळजी घ्यावी का?
PLEASE GO THROUGH THIS
My dear President,
I agree with you that swine flu awareness is needed, but there is no need to be panicky and join the publicity propaganda carried out by media and others which acts as a vehicle to spread misconception than to spread scientific information.
These are few facts about swine flu when discussed with the leading epidemiologists.
1) Swine flu, that is H1N1 flu is not new, first detected in 1987
2) Infective stage of flu is 5 days, 1 day before and 4 days after onset of symptoms
3) The best way to prevent it spreading is asking patients having symptoms of flu like fever, cough and running nose to take rest at home for 4 days so he does not transmit it
4) Masks are of limited value if any, in this disease, it can spread through droplets on your skin, through contact etc, and I have seen that the masks in Pune are worn as fashion statement, while walking on road today morning I saw people wearing masks coming out for a morning walk with their dogs!, many wearing masks around their necks, and so on, in fact these masks shall act as the vehicles to carry the virus, instead, avoiding crowded places or cinema halls or malls where air conditioners are on, is advisable, because you get recalculated air, where the virus density multiplies
5)Death after H1N1 flu is not common, in fact infections like measles is taking toll of thousands more every year, and we are oblivious of the facts. Swine flu is being blown out of proportion by media trying to create hysteria among lay people.
6) Fever accompanied by respiratory distress, should be immediately notified which is likely to be a complication of H1N1 flu
7)The mortality is less than .01 percent of those affected, that means may be one in 10,000 affected is likely to suffer the life loss.
8) If you remember, 2 years ago SARS was blown out of proportion, what happened? Humans develop immunity to the virus, the same is going to happen, we develop immunity in due course of time, the virus is in the air, you can not stop it, our body is already developing the immunity so nothing to panic.
We need to take care of children and elderly who have less immunity and do not let them go to crowded places that are all.
WE MUST START THIS CAMPAIGN OF NOT TO BE AFRAID OF THIS FLU AND LET YOUR DAILY WORK CONTINUE AS NORMAL, NO MASKS FOR ORDINARY CITIZENS . HEALTH CARE WORKERS OR SPECIFIC EXPOSED TO LOT OF CROWDED ENVIRONMENTS MAY BE BENEFITTED, NOT PROVEN.
I am amazed to hear that people are selling masks of RS 20 each which are available to less than Rupee 1 in the market.
See who is getting benefitted?
Please spread the scientific info, do not join the band wagon and stick to science, that should be the order of the day.
Deepak Purohit
District governor
3131
यशोदेचा घनश्याम
8) If you remember, 2 years ago SARS was blown out of proportion, what happened?
ही ई- मेल नक्की कुणी कुणाला लिहीली आहे, हे ह्यावरून समजले नाही. तरीही वरील विधान चुकिचे आहे. सार्स was not blown out of proportion. It was damn pretty serious.
सार्सने होरपळलेल्या एका देशात मी रहातो, तेव्हा हे मी स्वानुभवावरून सांगतोय.
न्युज चॅनेल्स पाहिलेत तर टेन्शन येत एवढा हाइप आहे हे खरच आहे.
त्या मानाने प्रिन्ट मेडीआ बराच बरा आहे.
पण अजुनही नीट डिटेलमध्ये काळजी काय घ्यावी हे कोणीच सांगत नाहि अस दिसतय.
असो.
सध्या पुणे आणि पिंची मध्ये तरी स्वाइन फ्ल्यु साठीची आवश्यक तपासणी (ज्याची किंमत ही माझ्या ऐकीव माहितीनुसार ५०००-१०००० आहे) फक्त एकाच सन्स्थेत होते. त्याचा खर्च शासन करत. पण अर्थातच सरसकट सगळ्यांसाठीच ही तपासणी नाही आणि तस करण शक्य देखील नाही.
तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यात जावुन तुम्ही तुम्हाला झालेला त्रास सांगा. मग काय लक्षण आहेत हे पाहुन ते लोक तुमच नाव स्वाइन फ्ल्यु च्या संशयीत मध्ये नोंद करुन तुम्हाला पुढच्या तपासणीसाठी पाठवतील. सध्या वातावरण अस आहे की लोक घाबरुन सरकारी दवाखान्यात गर्दी करत आहेत. त्यामुळे खरच एखादा स्वाइन फ्लु झालेला रुग्ण असेल त्याच्यामुळे बर्याच जणाना संसर्ग होउ शकतो. शिवाय अशा व्यक्तीचा नंबर तपासणी आणि उपचार ह्यासाठी उशीरा लागुन त्या व्यक्तीच्या जीवावर बेतु शकत.
टॅमी फ्ल्युच्या गोळ्या सरसकट सगळ्याना देत नसावेत. ज्यांची लक्षण आहेत त्यानाच देत असावेत. ह्या विस्।अयी खात्रीशीर माहिती नाहि.
काल न्युज चॅनेल वर सांगितल्याप्रमाणे स्वाइन फ्ल्यु साठीची तपासणी काहि मोठ्या दवाखान्यात करण्यासाठी व्यवस्था केली जाइल. (बहुतेक नमुने घेवुन राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यची व्यवस्था असावी) त्या तपासणीचा खर्च शासन करणार आहे पण त्या दवाखान्यातील डॉक्टरांची फी आणि जर तिथेच अॅड्मिट व्हाव लागल तर त्याचा खर्च स्वत: करायचा आहे. ह्यामुळे थोडा तरी सरकारी दवाखान्यातील ताण कमी होइल अस चिन्ह आहे.
(कालचे आकुर्डी येथील सरकारी दवाखान्यातील ऐक्वीव आकडे.
स्क्रीनींग साठी आलेले लोक ८००
त्यातील खरच ज्यांची लक्षण स्वाइन फ्लुसारखीच आहेत असे लोक २५)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
१.या लोकांनी पुण्यात शाळा बंद करयला इतका उशीर का केला कोण जाणे?.. सगळे एकामेकावर ढकलत आहेत जबाबदारी...
सरकार म्हणते, जिल्ह्याने ठरवावे, ..कोणी म्हणते शाळेने ठरवावे यात सगळा टाईमपास केला गेला असे माझे मत आहे...
२. आणि अजूनही दहीहंडी मंडळांना विनंती केली जात आहे की सध्यातरी उत्सव मोठा करू नये.
( पुण्यात एपिडेमिक अॅक्ट लगू हो ऊन ८ दिवस झाले आहेत असे ऐकतो.. तरीही )
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
मला स्वतःला साधारण महिन्याभरापूर्वी स्वाईन फ्लू झाला होता (माझे वास्तव्य उत्तर कॅलिफोर्निया मधे). लक्षणे सुरू होण्याच्या दोन दिवस आधी एका रुग्णाशी माझा संपर्क आला होता. हा रुग्ण, ज्याला आपल्याला स्वाईन फ्लू झाला आहे याची कल्पना नव्हती, केवळ काही मिनीटांच्या प्रवासासाठी माझ्या कारच्या मागच्या सीटवर बसला होता. कदाचित कारचे बंद वातावरण असेल, किंवा त्याचा स्पर्श झालेल्या कारच्या भागाला नंतर माझा स्पर्श झाला असेल (हा व्हायरस वस्तूंच्या पृष्ठभागांवर सहा ते सात तासांपर्यंत तगू शकतो) आणि मी नंतर हात धुतले नसतील, पण मला लगेच संसर्ग झाला. साधारण ३६ तासांनंतर लक्षणांना सुरवात झाली. साधारण नेहेमीच्याच फ्लूप्रमाणे लक्षणे होती. पण ताप, आणि स्नायूंचे गळलेपण जरा जास्त तीव्र होते. त्यामानाने कफ बराच कमी होता. साधारण आठवड्याभरात प्रकृती पूर्ववत ठीक झाली. सीडीसीच्या (अमेरिकेचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल - केंद्रिय रोगनिवारण संचलनालय) सूचनांनुसार लक्षणे सुरू झाल्यापासून एक आठवडा घरीच बसून काढला. क्वचित बाहेर पडावे लागलेच तर नाक आणि तोंड झाकणारा सर्जिकल मास्क घातला. नेहेमीच्या फ्लूप्रमाणे आजारी असतांना भरपूर पाणी, व्हिटॅमिन सी देणारी संत्री वगैरे फळे खाल्ली, व विश्रांती घेतली. लक्षणे सुरू झाल्यानंतर जेव्हा ताप नेहेमीच्या फ्लूप्रमाणे एक-दोन दिवसात कमी झाला नाही, आणि फ्लूचा सीझन नसतांनाही असा आजार व्हावा यांमुळे हा स्वाईन फ्लू असावा अशी शंकेची पाल मनात चुकचुकलीच होती. इतक्यात ज्या रूग्णामुळे मला संसर्ग झाला त्याने त्याचे स्वाईन फ्लूचे निदान झाल्याचे कळवले आणि मी जवळच्या हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूमकडे धाव घेतली. डॉक्टर म्ह्णाले की एच-वन-एन-वन व्हायरसच्या ज्या स्ट्रेन (प्रजाती) मुळे स्वाईन फ्लूची ही साथ सुरू आहे ती स्ट्रेन नेहेमीच्या सीझनल फ्लूपेक्षा बरीच माइल्ड आहे, त्यामुळे फारसे घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यांनी टॅमिफ्लूच्या गोळ्या प्रिस्क्राइब करण्याची तयारी दाखवली, पण लक्षणे सुरू झाल्यापासून एका दिवसाच्या आत टॅमिफ्लू घेतलीतरच फायदा होतो, नाहीतर टॅमिफ्लूचा फारसा उपयोग नाही असे त्यांचे मत पडले. मीही मग हा आजार तसा अंगावरच काढण्याचे ठरवले. फक्त लक्षणे कमी करणार्या काही गोळ्या (उदा टायलेनॉल-पॅरॅसिटामॉल) घेतल्या. आणि वर सांगितल्या प्रमाणे एका आठवड्यात सारे काही ठिक झाले.
एकूण तुम्ही सर्वसाधारपणे निरोगी प्रौढ असाल तर हा फ्लू झालातर फारसे घाबरून जाण्याचे कारण नाही. अर्थात नेहेमीच्या फ्लूप्रमाणे बालके, वृद्ध, ज्यांची अंगभूत प्रतिकारशक्ती कमी असते त्यांना धोका जास्त. ब्राँकायटिस, न्युमोनिया अशी कॉंप्लिकेशन्स होऊन मृत्यूही होऊ शकतो. पण हे सारे नेहेमीच्या हिवाळ्यातील सीझनल फ्लूमधेही होते.
Use “Nilgiri oil”drops on handkerchiefs and masks as one of the preventive measures against swine flu….(N I V)
National institute of variology. Mumbai
Help line no.for swine flu 22029070,
Kasturba hospital. 02223083901
Plzzzz,
Send 2 all your friend.
Well wisher and people whom u care.
ह्याचा बदल कोणाला काही माहिती आहे का?
साध्य हा sms जोरात फिरतोय मुंबई मधे !!
National Institute of Virology सारखी राष्ट्रीय संशोधन संस्था असा अशास्त्रीय SMS पाठवणं अशक्य आहे. त्यांच्या या संस्थळावर जाऊन खात्री करा. त्यांना या प्रकाराची माहिती कळलेली आहे, म्हणून त्यांनी खालील मेसेज फिरता ठेवला आहे!
NIV has not recommended any indigenous formulations like Nilgiri oil, etc as use against novel H1N1 (Swine Flu). Please refer to authentic public health information or call the help lines for queries.
साहेब, हे national institute of variology काय आहे? माझा पुण्यातिल National Institute of Virology बरोबर रोज संपर्क येतो. रोगनिदान व संशोधन हे त्यांचे काम आहे, औष्धोपचार नाही. त्यात असला भंपक्पणा ते कदापी करणार नाही.
बाकि निल्गिरी तेल टाकुन अंघोळ केली कि छान वाटते.. चालु द्या...
(WHO) कडील स्वाईन फ्लु साथी बाबतची सर्व माहीती http://www.who.int/csr/disease/swineflu/en/index.html येथे आहे.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
कपडे धुतल्यानंतर ते शुभ्र दिसावेत म्हणून आपण जे क्लोरीनयुक्त विरंजक (Bleach) वापरतो त्याने फ्लू, टोंसील, दमा,श्वासाचे त्रास होण्यास/वाढण्यास मदत मिळते.
While bleach is effective in killing germs, the chemical may leave children more susceptible to catching flu, tonsillitis or other infections.
Exposure to bleach was associated with a 20 per cent increase in the risk of flu and a 35 per cent rise in the risk of recurrent tonsillitis.
The study, carried out by the Centre for Environment and Health in Belgium, looked at the potential impact among more than 9,000 schoolchildren between the ages of six and 12 in the Netherlands, Finland and Barcelona.
Bleach 'linked to 20% rise in childhood infections including flu and bronchitis'
प्रतिक्रिया
सर्व बाजूंनी कोंडी
प्रश्न
स्वाइन
सविस्तर प्रतिसाद!
+१
धन्यवाद
डॉक्टर,
बरोबर!
धन्यवाद... अ
आत्ताच
अजुनही ९
स्वाईन फ्ल्यु
आमच्या company (Sasken) मधे दिलेली माहिती (letter to President)
सार्स
न्युज
सरकार आणी जबाबदारी
स्वाईन फ्लूचा माझा अनुभव
चाचण्या
निदान
Use “Nilgiri oil”drops
हा hoax आहे...! कृपया अफवा पसरवू देऊ नका!
साहेब, हे
National institute of variology. Mumbai????
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन
पुणे
PMT मधे अति
स्वाइन फ्लू (वराहज्वर)
विरंजक ( Bleach) च्या वापराने फ्लू, टोंसील,दमा, श्वासाचे त्रास