समस्त मिपाकरहो,
नमस्कार
मला
" एकदा सार्या प्राण्यांची भरली होती सभा
पोपट होता सभापति मधोमध उभा"
हे गाणे (त्या गाण्याचा ओळी) हव्या आहेत.
माझ्या नातीला हे गाणे शाळेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांत म्हणायचे आहे.
दुर्दैवाने मला हे गाणे पूर्णत: आठवत नाही.
तेंव्हा विनंती ही की, ज्या कोणाला हे गाणे आठवत असेल
त्यांनी कृपया ते मिपावर द्यावे किंवा मला व्यनिने पाठवावे.
कळावे.
अरुण वडुलेकर.
प्रतिक्रिया
12 Aug 2009 - 2:07 pm | प्रकाश घाटपांडे
शेपटीवाल्या प्राण्यांची पुर्वी भरली सभा ...
इथे संपुर्ण गाणे वाचता येईल. मजेशीर गाण आहे. अगदी नादमय बालगीत. मला खुप आवडतं
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
12 Aug 2009 - 2:10 pm | अरुण वडुलेकर
प्रकाशजी,
एका आजोबाला तुम्ही धम्मकलाडू खाण्यापासून वाचवलेत.
मनःपूर्वक धन्यवाद.
12 Aug 2009 - 2:08 pm | मनिष
http://www.aathavanitli-gani.com/Print%20Html/450.htm
गुगल सर्च शिकुन घ्या, खूप मदत होते! :)
12 Aug 2009 - 2:18 pm | अरुण वडुलेकर
मनिष,
धन्यवाद. तुमची सूचनाही मला आवडली. तसा प्रयत्न मी करतोही.
पण कधी कधी उमजत नाही. तुम्ही दिलेल्या दुव्यावरून गाणे उतरवून
घेतले.
पुन्हा एकदा धन्यवाद.
12 Aug 2009 - 2:28 pm | यशोधरा
>>एका आजोबाला तुम्ही धम्मकलाडू खाण्यापासून वाचवलेत.
:)