फक्त पुरुषांसाठी
हॅहॅहॅ ! लगेच डोळे विस्फारु नका! हे आवाहन आहे पुरुषस्पंदन या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी पुरुष लेखकांना! मावा ( मेन अगेन्स्ट व्हायलन्स ऎन्ड अब्युज) या स्वयंसेवी संस्थेतर्फे गेली तेरा वर्षे समाजातील स्त्रियांवरील हिंसा व गैरवर्तन यांना प्रतिबंध करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. मुंबईचे हरीश सदानी हे या विषयात "वाहुन" गेलेले एक कार्यकर्ते आहेत.पुण्यातील गीताली वि म, विद्या बाळ, मंगला सामंत या स्त्री-पुरुष समता वादी करणा-या चळवळीतील महिला कार्यकत्त्यांबरोबर समांतर व पुरक काम करणारे कृतीशील विचारवंत आहेत. पुण्यात पुरुष उवाच चे काम करणारे श्री मुकुंद, हे दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सेनापती बापट रोड वर कुमार प्राईड येथील आपल्या निवासस्थानी अभ्यासवर्ग, चर्चा, सुसंवाद असे कार्यक्रम गेली अनेक वर्षे घेताहेत. गीताली-मुकुंद हे दांपत्य पुण्यातील पुरोगामी चळवळींना अपरिचित नाहीत. हरीश सदानी हे त्या वर्तुळातलेच. या वर्षीच्या विशेषांकात त्यांनी स्त्री-पुरुष संबंधातील एका पैलुवर लक्ष केंद्रित केले आहे ते म्हणजे मैत्री.
मैत्री विशेषांकासाठी २५०० शब्दांपर्यंत आपण आपले लिखाण हे १२ सप्टेंबरपुर्वी खालील पत्त्यावर पाठवावे
हरीश सदानी, ७०५, परिश्रम बिल्डिंग, भंडार गल्ली, लेडी जमशेदजी रोड, माहिम, मुंबई ४०००१६ भ्रमणध्वनी- ९८७०३०७७४८ विरोपाचा पत्त्ता- harsh267@rediffmail.com
लेखनाविषयी सविस्तर माहिती इथे पहा. चला तर मग उचला टंकनी
प्रतिक्रिया
5 Aug 2009 - 9:59 am | विसोबा खेचर
अरे प्रकाश, हे निबंधांचं अलिकडे काय फ्यॅड चालवलं आहेस तू?! :)
तात्या.
5 Aug 2009 - 10:15 am | प्रकाश घाटपांडे
हॅहॅहे तात्या इथे ल्वॊक लई भारी लिवतात. जरा त्यान्ला लिवायला प्रव्रुत्त करुनशॅन जरा हातभार लावावा म्हंतो . मिपाची लिंक हरीश सदानीना पाठवली आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
5 Aug 2009 - 9:59 am | टारझन
हॅहॅहॅ
जाता जाता : हॅहॅहॅ
-(हॅहॅहॅ) टॅहॅहॅहॅ
5 Aug 2009 - 10:14 pm | नितिन थत्ते
>>टॅहॅहॅहॅ
मूल जन्मतः ट्यॅहॅ करते असे म्हणतात. ;)
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
5 Aug 2009 - 10:05 am | विकास
सविस्तर लेखनासाठी "इथे" टिचकी मारली तर नुसती टिचकीच ऐकायला येते दिसत काहीच नाही :(
5 Aug 2009 - 10:25 am | सहज
मावा ( मेन अगेन्स्ट व्हायलन्स ऎन्ड अब्युज) अध्यक्षपदाची निवडणूक कधी असते हो? एक उच्चशिक्षीत ज्योतीषी महाराज ओळखीत आहेत त्यांना हे पद भुषवायला आवडेल. आणि हो लेख काय लेखमाला लिहतील तिथे.
5 Aug 2009 - 11:02 am | विशाल कुलकर्णी
व्हय व्हय आमी बी मत दिवु कि त्यास्नी ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
5 Aug 2009 - 11:32 pm | मिसळभोक्ता
हरीश सदानी, ७०५, परिश्रम बिल्डिंग, भंडार गल्ली, लेडी जमशेदजी रोड, माहिम, मुंबई ४०००१६
हॅ हॅ....
हरीश सदानी हे लेडी जमशेदजी रोड वर राहतात !!
हॅ हॅ...
-- मिसळभोक्ता
6 Aug 2009 - 1:08 am | _समीर_
मेन अगेन्स्ट व्हायलन्स ऎन्ड अब्युज
प्रकाशकाका ह्यावर तुम्ही तुमच्याच अनुभवावर एखादा निबंध का लिहित नाही? हॅहॅहॅ
6 Aug 2009 - 12:53 pm | हरकाम्या
सध्या व्रुत्तवाहिन्यांवर नकली मावा जप्त केला अशी दरदिवसाआड ब्रेकिंग न्युज असते. त्यातला हा कुठला "मावा "