झोपडपट्टी ही
तोडावया हवी
झाली मज घाई
सौंदर्याची
उगारले हात
शेवटचे शस्त्र
विनाशाचे अस्त्र
कोसळले
रोडरोलर ते
खोपट्याशी नेले
शिव्याशाप दिले
जमावाने
पहिले खोपटे
तोडूनिया देता
होईल शांतता
कायमची
इतक्यात तिथे
मजला दिसली
उभी भांडीवाली
आमचीच
त्याच गर्दीत हो
माझा वॉचमन,
बघतो रोखून
माझ्याकडे
बायको मुलांच्या
उभा बरोबर
माझा ड्रायव्हर
घोळक्यात
माझ्या तान्ह्याला जी
आंघोळ घालते
आज ती रडते
घरासाठी
अचानक माझ्या
मनी काय आले
यंत्र बंद केले
शांतपणे
अर्थ श्रीमंतीचा
क्षणात बदले
मनात पसरे
संभ्रमच
ह्या झोपडपट्ट्या
कशा तोडायच्या
खूणा श्रीमंतीच्या
तिच्याकडे
माझ्या श्रीमंतीच्या
खूणाच पुसल्या
म्हणू कसा मला
श्रीमंत मी?
प्रतिक्रिया
30 Jul 2009 - 7:04 pm | llपुण्याचे पेशवेll
अंतर्मुख करणारी कविता आहे. पण झोपडपट्ट्या चांगल्या का वाईट कळत नाही. :( जेव्हा पुण्यातली ४०% पाण्याची गळती या झोपडपट्ट्यांमधे दिलेल्या बेकायदेशीर नळजोडींमुळे होते तेव्हा झोपडपट्ट्या नसाव्यात असे वाटते. आणि फार कमी लोक असे असतात जे झोपडपट्ट्यांमधून शिकून वरती येऊन झोपडपट्ट्यांबाहेर पडायचा प्रयत्न करतात.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
30 Jul 2009 - 7:33 pm | क्रान्ति
माझ्या श्रीमंतीच्या
खूणाच पुसल्या
म्हणू कसा मला
श्रीमंत मी?
वा! खरंच अंतर्मुख करणारी कविता.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
30 Jul 2009 - 11:37 pm | बेसनलाडू
वगैरे कसे म्हणावे कळत नाही; पण कविता फारच प्रभावी आहे हे नक्की!
(अंतर्मुख)बेसनलाडू
31 Jul 2009 - 2:49 am | धनंजय
असेच म्हणतो
31 Jul 2009 - 3:18 am | स्वाती२
हम्म
31 Jul 2009 - 6:05 am | पाषाणभेद
सरेगमप जिंकल्यापासून चांगले लिहीतोस, ऋषिकेश
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
31 Jul 2009 - 6:33 am | एकलव्य
साधे प्रश्न आणि सोपी मांडणी (गुंतागुंतीची उत्तरे आणि अवघड निवाडा) मनाला भावली.
धन्यवाद!
31 Jul 2009 - 11:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रश्न सोपे दिसले तरी उत्तरं सोपी नक्कीच नसतात.
अजूनही अनेक गोष्टी कळत नाहीत पण नकळतच कपडे विकत घेताना घासाघीस करते, पण भाजीवालीकडे तिने मागितलेले पैसे निमूटपणे देते.
अदिती
31 Jul 2009 - 12:10 pm | सहज
झोपडपट्टीवरुन एकदम भावुक झाल्यामुळे तुम्हाला नक्की काय प्रतिसाद द्यायचा लक्षात येत नाही आहे.
श्रम करुन पैसे कमावणारे कष्टकरी जसे भांडीवाली, ड्रायव्हर, वॉचमन इं. रहाण्यायोग्य जागा नक्कीच मिळावी, झोपडपट्टी नाही असे नक्कीच वाटते.
हा प्रश्न वेगळा आहे गुंतागुंतीचा आहे. झोपडपट्टी प्रकार चुकीचा वाटतो लो कॉस्ट हाउसिंग व सर्व नागरी सुविधा पैसे देउन पुरवणारी आवश्यक आहे. कविता अजुन लहान करता आली असती तर अजुन प्रभावी वाटली असती.
31 Jul 2009 - 2:28 pm | विशाल कुलकर्णी
सहमत ! माझेही मत झोपडपट्ट्या नसाव्यात असेच आहे. पण म्हणजे त्या सर्व लोकांना राहायला त्यापेक्षा चांगली सोय असायला हवी.
(या प्रश्नावर नेहेमीच हॅम्लेट होणारा)
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
31 Jul 2009 - 2:27 pm | विशाल कुलकर्णी
सहमत ! माझेही मत झोपडपट्ट्या नसाव्यात असेच आहे. पण म्हणजे त्या सर्व लोकांना राहायला त्यापेक्षा चांगली सोय असायला हवी.
अवांतरः सरकारी कोट्यातुन अलॉट झालेली सोसायट्यामधली घरे भाड्याने देवुन पुन्हा नवी झोपडी उभारणार्यांबद्दल काय म्हणायचे? बरं, नुसते चांगले घर देवुन उपयोग नाही. उपजिविकेचा प्रश्न जर जिथल्या तिथेच राहणार असेल तर चांगले, चांगल्या वस्तीतले घर काय कामाचे? :-(
(या प्रश्नावर नेहेमीच हॅम्लेट होणारा)
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
31 Jul 2009 - 2:04 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता छान आहे. पण प्रश्न गहन आणि अनेक पैलू असलेला आहे.
बिपिन कार्यकर्ते
31 Jul 2009 - 3:26 pm | विनायक प्रभू
हं
31 Jul 2009 - 2:16 pm | टारझन
:(
1 Aug 2009 - 1:05 am | विसोबा खेचर
झोपड्यांचा प्रश्न गहन आहे खरा...!
वास्तववादी कविता...
तात्या.
1 Aug 2009 - 1:15 am | भाग्यश्री
आवडली कविता!
प्रश्न न सुटणारा आहे.. त्यामुळे त्यावर भाष्य करत नाही!
http://www.bhagyashree.co.cc/
1 Aug 2009 - 8:10 am | नितिन थत्ते
छान कविता. आणि योग्य जाणीव.
>>झोपड्यांचा प्रश्न गहन आहे खरा...!
>>माझेही मत झोपडपट्ट्या नसाव्यात असेच आहे. पण म्हणजे त्या सर्व लोकांना राहायला त्यापेक्षा चांगली सोय असायला हवी
>>रहाण्यायोग्य जागा नक्कीच मिळावी, झोपडपट्टी नाही
काही डेटा गोळा करतोय. त्यानंतर या विषयावर लेख लिहिणार आहे.
>>नकळतच कपडे विकत घेताना घासाघीस करते, पण भाजीवालीकडे तिने मागितलेले पैसे निमूटपणे देते.
साधारणपणे लोक वागतात त्याच्या बरोब्बर उलटे वागणे आहे. लोक रॉबॉक असे (किंवा तत्सम कोणतेही) नाव 'छापलेल्या' वस्तूला विचार न करता २-३ हजार रु (म्हणजे योग्य व्हॅल्यूपेक्षा ५००-१००० रु जास्त) सहज देतात. भाजीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी मात्र २-४ रुपयांवरून वाद घालतात.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
2 Aug 2009 - 7:56 pm | ऋषिकेश
सर्वांचे प्रतिक्रीयांबद्दल आभार. अनेकांच्या मताप्रमाणे कविता कमी शब्दात अधिक परिणामकारक ठरली असती याच्याशी सहमत आहे.
(उशीर आभार मानण्याने धागा विनाकारण वर येतोय त्याबद्दल क्षमस्व)
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ५६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."